विविध चायनिजचे पदार्थ करता येतात. त्यापैकी एक पदार्थ म्हणजे फ्राइड राइस घरी केलेला चांगला. विकतचा पौष्टिक नसतो. व्हेज फ्राईड राईस हा असा पदार्थ आहे, जो चवीनेही जबरदस्त आणि आरोग्यासाठीही हलकाआणि पौष्टिक असतो. (Make better and more nutritious fried rice at home than hotel- kids will love it, must try)घरच्या घरी केला तर त्याची चव आणखीच खुलते, कारण आपण आपल्या आवडीनुसार त्यात ताज्या भाज्या घालू शकतो. हा पदार्थ दिसायला रंगीत आणि खायला मस्त लागतो, त्यामुळे मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांनाच आवडतो. लसूण घालून एकदा या पद्धतीने करुन पाहा. करायला वेळही जास्त लागत नाही.
साहित्य सिमला मिरची, हिरवी मिरची, शेजवान चटणी, बासमती तांदूळ, लसूण, गाजर, कांदा, कोबी, तेल, जिरे, मीठ, रेड चिली सॉस, काळीमिरी पूड
कृती१. बासमती तांदूळ धुवायचा. छान परतून घ्यायचा. जास्त परतायचा नाही फक्त हलकासा शिजेल एवढाच परतायचा. सिमला मिरची बारीक चिरायची. लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या आणि ठेचून घ्यायच्या. भरपूरशी लसूण वापरायची. गाजर सोलायचे आणि बारीक चिरायचे. हिरवी मिरची लांब - लांब चिरायची. कोबी पातळ चिरायचा.
२. कांदा सोलायचा आणि लांब- लांब पातळ चिरायचा. इतरही तुमच्या आवडत्या भाज्या घेऊ शकता. काळीमिरीची पूड तयार करायची.
३. एका कढईत तेल घ्यायचे. तेल जरा तापल्यावर त्यात चमचाभर जिरे घालायचे. लसूण परतून घ्यायचा. तसेच त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. व्यवस्थित परतायचे मग त्यात कांदा घालायचा. गाजर घालायचे, कोबी घालायचा नंतर सिमला मिरची घालायची आणि ढवळून घ्यायचे. भात शिजवून घ्यायचा. पाणी जरा कमी घालायचे.
४. त्यात चमभर रेड चिली सॉस घालायचा. शेजवान सॉस घालायचा तसेच मीठ घालायचे ढवळून घ्यायचे आणि मग त्यात शिजलेला भात घालायचा. काळीमिरी पूड घालायची आणि ढवळून घ्यायचे. मस्त मोकळा आणि चविष्ट भात होतो.
Web Summary : Make delicious and nutritious fried rice at home with fresh vegetables. This kid-friendly recipe involves cooking rice, stir-frying vegetables like carrots, cabbage, and capsicum with ginger, garlic, and sauces. A quick, colorful, and flavorful dish perfect for everyone.
Web Summary : घर पर ताज़ी सब्जियों से स्वादिष्ट और पौष्टिक फ्राइड राइस बनाएं। यह बच्चों के अनुकूल रेसिपी है जिसमें चावल पकाना, गाजर, पत्ता गोभी और शिमला मिर्च जैसी सब्जियों को अदरक, लहसुन और सॉस के साथ भूनना शामिल है। यह झटपट, रंगीन और स्वादिष्ट व्यंजन सभी के लिए एकदम सही है।