Join us

वेटलॉस करताय, मखाना चाट खायला विसरू नका! रेसिपी सोपी, फायदे 5

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2022 14:34 IST

Low Calorie Breakfast Recipe: लो कॅलरी ब्रेकफास्ट हवा आणि तो देखील अतिशय चवदार... अशी डिमांड असेल तर करा मखाना चाट (makhana chat), वेटलॉस करणाऱ्यांसाठी अतिशय पौष्टिक

ठळक मुद्दे शुगर, बीपी असा त्रास असणाऱ्यांसाठीही हा एक उत्तम ब्रेकफास्ट आहे.

वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणारे किंवा आपल्या आहाराबाबत, वजनाबाबत अतिशय कॉन्शस असणारे जे लोक असतात, ते नेहमीच लो कॅलरी डाएट (low calorie diet) घेणं पसंत करतात. मीठ, तेल- तूप यांचा कमीतकमी वापर असणारे पदार्थ खाण्यास त्यांचे प्राधान्य असते. त्याचं कारण म्हणजे कमीत कमी कॅलरी पोटात जाव्या आणि वजन वाढीवर किंवा तब्येतीवर त्याचा परिणाम होऊ नये. अशा सर्वांसाठीच ही मखाना चाट रेसिपी अतिशय उत्तम ठरणारी आहे. यासोबतच शुगर, बीपी (blood pressure) असा त्रास असणाऱ्यांसाठीही हा एक उत्तम ब्रेकफास्ट आहे. शिवाय अवघ्या काही मिनिटांत हा नाश्ता तयार करता येतो. 

 

मखाना खाण्याचे फायदे (benefits of makhana)- मखाना हा सुकामेव्याचाच एक प्रकार मानला जातो. Lotus seed, fox seed किंवा कमळ बी म्हणूनही मखाना ओळखला जातो.- मखानामध्ये अतिशय कमी कॅलरी असतात. त्यामुळे वेटलॉस करणाऱ्यांसाठी किंवा लो कॅलरी डाएट ज्यांच्यासाठी गरजेचे आहे, अशा सगळ्यांनाच मखाना खाण्याचा सल्ला दिला जातो. - मखानामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हाडांसाठी ते फायदेशीर ठरते. म्हणूनच वयस्कर व्यक्तिनींही हाडांचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी नियमितपणे मखाना खावा.

- प्रोटीन्स आणि लोह देखील मखानामध्ये भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे अशक्त व्यक्तींसाठीही मखाना उपयुक्त ठरतो.- मॅग्नेशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन्स मखानामध्ये योग्य प्रमाणात असते.- मखाना खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांनाही मखाना खाणे फायदेशीर ठरते. 

 

मखाना चाट रेसिपी (makhana chat recipe)मखाना चाट रेसिपी करण्यासाठी लागणारं साहित्य१ वाटी रोस्टेड मखाना, कांदा, टोमॅटो, काकडी, सिमला मिरची, पत्ताकोबी, कोथिंबीर या सगळ्या भाज्या बारीक चिरून एक वाटी घेणे. अर्धा टेबलस्पून लिंबाचा रस, अर्धा टी स्पून चाट मसाला आणि चवीनुसार मीठ व लाल तिखटकसा करायचा मखाना चाट?- मखाना चाट करण्यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यात रोस्टेड मखाना घ्या. - त्यात सगळ्या चिरलेल्या भाज्या, चाट मसाला, लिंबाचा रस आणि तिखट मीठ टाका. - हे सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घेतले की झाला चटपटीत मखाना चाट तयार. - सकाळचा नाश्ता किंवा सायंकाळच्या वेळी ऑफिसमधून आल्यानंतर थोडी भूक लागली असेल तर रात्रीच्या जेवणाआधी हा पदार्थ उत्तम आहे. - लहान मुलांनाही स्नॅक्सच्या डब्यात हा पौष्टिक पदार्थ देता येईल. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सवेट लॉस टिप्स