महाशिवरात्रीच्या (Mahashivratri 2026) उपवासाला काहीजण फळांचा आहार घेतात तर काहीजण साबुदाण्याच्या पदार्थांचा आहारात समावेश करतात. साबुदाण्याची खिचडी करण्याची करण्याची विशिष्ट पद्धत माहिती करून घेतली तर परफेक्ट चवीची साबुदाणा खिचडी घरीच करता येईल. साबुदाणा भिजवण्यापासून ते खिचडी करण्यापर्यंत अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. तेव्हाच हॉटेलमध्ये मिळतात तसे परफेक्ट चवीचे साबुदाणे होतात. (Mahashivratri Upvas Special Sabudana Khichdi Making Tips)
साबुदाणा खिचडी परफेक्ट होण्यासाठी टिप्स
साबुदाणा दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्या. पाणी पूर्णपणे काढून टाका आणि फक्त साबुदाणा बुडेल इतकंच पाणी ठेवा. किमान ५ ते ६ तास किंवा रात्रभर भिजत ठेवा. सकाळी साबुदाणा हातानं दाबून पाहा. तो पूर्णपणे मऊ झालेला असायला हवा.
भिजवलेल्या साबुदाण्यांमध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर कूट, मीठ आणि थोडी साखर एकत्र करून हातानं व्यवस्थित एकत्र करून घ्या. यामुळे खिचडी मोकळी होण्यास मदत होते. जर साबुदाणा जास्त कोरडा वाटत असेल तर फोडणीत घालण्यापूर्वी त्यावर थोड्या पाण्याचा हबका मारा. यामुळे साबुदाणा आतून मऊ राहतो आणि कडक होत नाही.
महाशिवरात्रीच्या उपवासाला करा कुरकुरीत उपवासाचा डोसा; सोपी रेसिपी- परफेक्ट होईल डोसा
शेंगदाणे भाजताना ते जास्त करपवू नका. नाहीतर खिचडीचा रंग काळपट दिसतो. शेंगदाण्याचे कूट खूप बारीक नसावे. थोडं जाडसर ठेवल्यास खिचडीला छान टेक्स्चर येते आणि ती मोकळी राहते. कढईत तूप गरम करून त्यात जीरं आणि मिरच्यांची फोडणी द्या. त्यानंतरच बटाट्याच्या फोडी घालून त्या वाफेवर १० ते १२ मिनिटं छान शिजवून घ्या. बटाटा शिजल्यावरच त्यात साबुदाणा घाला.
साबुदाण्याचे मिश्रण कढईत घातल्यावर मध्यम आचेवर सतत हलवत राहा. साबुदाण्याचा रंग पारदर्श झाला की समजा की खिचडी तयार आहे. शेवटी झाकण ठेवून फक्त २ मिनिटं वाफ काढा. साबुदाणा जास्तवेळ परतू नका अन्यथा चिवट होऊ शकतो.
महाशिवरात्र स्पेशल ८ सुंदर पांढऱ्या साड्या, साधेपणातलं सौंदर्य
शेवटी वरून लिंबू पिळा आणि ओलं खोबरं, कोथिंबीर घालून सर्व्ह करा. साबुदाण्याच्या खिचडीसोबत खाण्यासाठी तुम्ही शेंगदाण्याची आमटी किंवा दह्याची कोशिंबीर ट्राय करू शकता.
