lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > वाफवण्याचं टेन्शन सोडा, कमी वेळात करा खमंग कोथिंबीर वडी! १५ मिनिटांत झटपट वडी

वाफवण्याचं टेन्शन सोडा, कमी वेळात करा खमंग कोथिंबीर वडी! १५ मिनिटांत झटपट वडी

Maharashtrian tea time snack | crispy Indian kothimbir vadi without Steaming : कोथिंबीर वडी करण्याची सोपी पद्धत, न वाफवता चविष्ट कोथिंबीर होईल तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2023 12:39 PM2023-09-22T12:39:12+5:302023-09-23T15:36:40+5:30

Maharashtrian tea time snack | crispy Indian kothimbir vadi without Steaming : कोथिंबीर वडी करण्याची सोपी पद्धत, न वाफवता चविष्ट कोथिंबीर होईल तयार

Maharashtrian tea time snack | crispy Indian kothimbir vadi without Steaming | वाफवण्याचं टेन्शन सोडा, कमी वेळात करा खमंग कोथिंबीर वडी! १५ मिनिटांत झटपट वडी

वाफवण्याचं टेन्शन सोडा, कमी वेळात करा खमंग कोथिंबीर वडी! १५ मिनिटांत झटपट वडी

सणावाराच्या दिवसात अनेक विशिष्ट पदार्थ केले जातात. महाराष्ट्रीयन थाळीमध्ये चपाती, भाजी, भात, वरणासोबत तोंडी लावण्यासाठी लोणचं, पापड किंवा वडी असते. वडी अनेक प्रकारची केली जाते. कोथिंबीर, पालक, मेथी, कांदा वडी चवीने खाल्ली जाते. वडी करण्याची प्रोसेस खूप मोठी आहे.

भाजी चिरण्यापासून ते वाफवून - तळण्यापर्यंत वडी परफेक्ट तयार होत नाही. जर घरात पाहुणे आले असतील, व त्यांनी कोथिंबीर वडीची फर्माईश केली असेल, तर झटपट वडी तयार कशी कराल? यासाठी ही रेसिपी नक्की आपल्याला मदत करेल. न वाफवता जर झटपट कोथिंबीर वडी तयार करायची असेल तर, ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. न वाफवता कोथिंबीर वडी कशी करायची पाहूयात(Maharashtrian tea time snack | crispy Indian kothimbir vadi without Steaming).

न वाफवता वडी करण्यासाठी लागणारं साहित्य

कोथिंबीर

बेसन

मीठ

पाणी

भाकरी कडक किंवा वातड होतात, १ चमचाभर १ पदार्थ घालून करा भाकरी, शिळी भाकरीही राहील मऊ

तेल

लाल तिखट

हळद

गरम मसाला

शेंगदाण्याचं कूट

मीठ

हिरवी मिरची-लसूण पेस्ट

कृती

सर्वप्रथम, कोथिंबीर धुवून चिरून घ्या. चिरलेली कोथिंबीर एका बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर दुसऱ्या बाऊलमध्ये दीड कप बेसन, अर्धा टेबलस्पून मीठ आणि ३ कप पाणी घालून सरसरीत बॅटर तयार करा. नंतर कढईत २ टेबलस्पून तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा टेबलस्पून जिरं घाला, जिरं तडतड्ल्यानंतर त्यात एक टेबलस्पून हिरवी मिरची-लसूण पेस्ट घालून भाजून घ्या. नंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, एक टेबलस्पून लाल तिखट, चिमुटभर हळद, अर्धा टेबलस्पून गरम मसाला, ३ टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट व चवीनुसार मीठ घालून साहित्य एकजीव करा.

फ्लॉवरमध्ये अळ्या असतात, फार वेळ जातो चिरायला? ५ सोप्या टिप्स, पटकन चिरा फ्लॉवर

२ मिनिटानंतर त्यात बेसनाचे सरसरीत बॅटर ओतून सतत ढवळत राहा, व मध्यम आचेवर शिजवून घ्या. ५ मिनिटानंतर गॅस बंद करा. ट्रे ला किंवा एका ताटाला तेल लावून ग्रीस करा. त्यावर तयार बॅटर ओतून एकसमान पसरवा. मिश्रण थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या कापून घ्या. आपण वड्यांना आपल्या आवडीनुसार आकार देऊ शकता. नंतर कढईत तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात वडी सोडून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. अशा प्रकारे न वाफवता खमंग कोथिंबीर वडी खाण्यासाठी रेडी.

Web Title: Maharashtrian tea time snack | crispy Indian kothimbir vadi without Steaming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.