Lokmat Sakhi >Food > Maharashtra food : ज्वारीचं थालीपीठ चवीला असं खमंग की बाकी सारे नाश्त्याचे पदार्थ पडतील फिके

Maharashtra food : ज्वारीचं थालीपीठ चवीला असं खमंग की बाकी सारे नाश्त्याचे पदार्थ पडतील फिके

Maharashtra food: millet recipes, sorghum thalipeeth recipe, delicious food tasty and healthy : पौष्टिक पदार्थ तर खायलाच हवेत. ज्वारीचे असे थालीपीठ एकदा नक्की करुन पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2025 17:24 IST2025-07-16T17:15:40+5:302025-07-16T17:24:20+5:30

Maharashtra food: millet recipes, sorghum thalipeeth recipe, delicious food tasty and healthy : पौष्टिक पदार्थ तर खायलाच हवेत. ज्वारीचे असे थालीपीठ एकदा नक्की करुन पाहा.

Maharashtra food: millet recipes, sorghum thalipeeth recipe, delicious food tasty and healthy | Maharashtra food : ज्वारीचं थालीपीठ चवीला असं खमंग की बाकी सारे नाश्त्याचे पदार्थ पडतील फिके

Maharashtra food : ज्वारीचं थालीपीठ चवीला असं खमंग की बाकी सारे नाश्त्याचे पदार्थ पडतील फिके

पौष्टिक आणि स्वादिष्ट असे पदार्थ घरी करायलाच हवेत. नाश्त्यासाठी एकदम मस्त आणि आवडीने केला जाणारा पदार्थ म्हणजे थालीपीठ. भाजणीचे थालीपीठ फार आवडीने खाल्ले जाते. (Maharashtra food:  millet recipes, sorghum thalipeeth recipe, delicious food tasty and healthy)तसेच इतरही काही पीठांचे थालीपीठ करता येते. एकदा ज्वारीच्या पीठाचे हे पौष्टिक थालीपीठ खाऊन बघा. नक्की आवडेल.   

साहित्य 
ज्वारी, पाणी, कांदा, हिरवी मिरची, मीठ, कोथिंबीर, गाजर, दही, तेल, आलं, लसूण, हळद, लाल तिखट, जिरे पूड, धणे पूड 

कृती
१. गाजर सोलून घ्यायचे. नंतर किसून घ्यायचे. कांदाही सोलून घ्यायचा आणि बारीक चिरायचा. एकदम बारीक चिरा. हिरवी मिरची घ्यायची तसेच लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. आल्याचा लहान तुकडा घ्यायचा मिक्सरच्या भांड्यात घेऊन वाटायचे. मस्त झणझणीत पेस्ट तयार करायची. कोथिंबीर बारीक चिरायची. 

२. एका पातेल्यात ज्वारीचे पीठ घ्यायचे. त्यात चिरलेला कांदा घालायचा आणि तयार केलेली आलं-लसूण-मिरची पेस्टही त्यात घालायची. किसलेले गाजर घालायचे आणि बारीक चिरलेली कोथिंबीरही घालायची. सगळे पदार्थ छान एकजीव करायचे. त्यात दोन चमचे छान गोड दही घालायचे. तसेच चमचाभर जिरे पूड घालायची आणि चमचाभर लाल तिखट घालायचे. धणे पूड घालायची आणि ढवळून घ्यायचे. थोडे गरम तेल घालायचे. सगळे पदार्थ मस्त ढवळून झाल्यावर त्यात कोमट पाणी घालून पीठ मळून घ्यायचे. जास्त पातळ भिजवायचे नाही. मऊसर घट्ट भिजवायचे. जसे थालीपीठासाठी नेहमी भिजवता अगदी तसेच. 

३. पीठ भिजवून झाल्यावर पोळपाटाला तेल लावायचे आणि त्यावर प्लास्टीकचा पेपर ठेवायचा. थालीपीठ थापून घ्यायचे. गॅसवर तवा गरम करत ठेवायचा. तवा तापल्यावर त्यावर चमचाभर तेल घालायचे आणि मग थापलेले थालीपीठ लावायचे. मस्त खमंग परतायचे. दोन्ही बाजूंनी छान कुरकुरीत करायचे. आलटून पालटून परतायचे आणि गरमागरम खायचे. सोबत दही, लोणचे जे आवडते ते घ्या.    

तुमच्या आवडत्या इतरही भाज्या त्यात घालू शकता. तसेच ज्वारी प्रमाणेच बाजरीचेही थालीपीठ करता येते. चवीला ते ही मस्त लागते.     

Web Title: Maharashtra food: millet recipes, sorghum thalipeeth recipe, delicious food tasty and healthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.