Lokmat Sakhi >Food > इटुकलं-पिटुकलं फळ चवीला गोड आणि आरोग्यासाठी पोषणाचा खजिना, आजच आणा विकत..

इटुकलं-पिटुकलं फळ चवीला गोड आणि आरोग्यासाठी पोषणाचा खजिना, आजच आणा विकत..

lychee healthy fruit, eating healthy, this fruit is sweet in taste, nutrition for health : आवडीने खाल हे चविष्ट फळ. आरोग्यासाठी अगदी मस्त. पोटासाठी आरामदायी ठरेल. रोज खा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2025 17:49 IST2025-06-19T17:47:12+5:302025-06-19T17:49:12+5:30

lychee healthy fruit, eating healthy, this fruit is sweet in taste, nutrition for health : आवडीने खाल हे चविष्ट फळ. आरोग्यासाठी अगदी मस्त. पोटासाठी आरामदायी ठरेल. रोज खा.

lychee healthy fruit, eating healthy, this fruit is sweet in taste, nutrition for health, | इटुकलं-पिटुकलं फळ चवीला गोड आणि आरोग्यासाठी पोषणाचा खजिना, आजच आणा विकत..

इटुकलं-पिटुकलं फळ चवीला गोड आणि आरोग्यासाठी पोषणाचा खजिना, आजच आणा विकत..

काही फळे आपण कायम खातो. जसे की केळी, सफरचंद, संत्री इत्यादी मात्र अनेक फळे सारखी खाल्ली जात नाहीत. त्यांचे फायदे आपल्याला माहिती नसतात. (lychee healthy fruit, eating healthy, this fruit is sweet in taste, nutrition for health, )ही फळे कायम खाल्ली जात नाहीत. तसेच किंमतही जरा जास्त असते. मात्र त्या फळांमध्ये गुणधर्म भरपूर असतात. एक फळ खाल्ले तरी औषधाप्रमाणे फायदा मिळतो. जसे की किवी, चेरी, नासपती इत्यादी फळे आहेत. डॉक्टर सांगतात किवी खाणे फार पौष्टिक असते. शरीरातील पेशींचे प्रमाण वाढण्यासाठी हे फळ उपयुक्त ठरते. तसेच आणखी एक चविष्ट फळ आहे जे फार खाल्ले जात नाही. ते म्हणजे लिची. दिसायला अगदी छान टवटवीत असणारी लिची फार पौष्टिक आहे. 

१. लिचीमध्ये जीवनसत्त्व सी असते तसेच फोलेट, रिबोफ्लेविन आणि बीटा-कॅरोटीन यांसारखे पोषक घटक असतात. जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. हे घटक आपल्या शरीराला संसर्गांपासून संरक्षण देतात. रोगराईपासून बचाव करतात. 

२. हृदयासाठी लिची पौष्टिक असते. लिचीमध्ये पोटॅशियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि कोलेस्टेरॉलची पातळी सुधारण्यास मदत होते. या दोन्ही गोष्टी नियंत्रित राहिल्यावर हृदय छान निरोगी राहते.

३. लिचीचे ब्यूटी प्रॉडक्ट्स बाजारात मिळतात. कारण लिची केसांसाठी आणि त्वचेसाठी फार उपयुक्त असते. लिचीमध्ये असलेली जीवनसत्वे आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेसाठी मस्त असतात. ते त्वचेच्या कोलाजेन निर्मितीस मदत करतात आणि त्वचेला चमकदार बनवतात. तसेच लिचीमुळे केसांची वाढ सुधारते आणि केस छान मजबूत होतात. गळणेही कमी होते. 

४. पोटाचे त्रास असतील तर दोन ते तीन लिची खाणे फार फायद्याचे ठरते. लिचीमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे पचनक्रिया सुधारते. पोट छान साफ होते. तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर आराम मिळवण्यास मदत होते. पोटाच्या साऱ्या प्रक्रिया छान सुरळीत होतात. 

५. वजन कमी करण्यासाठी हे चविष्ट फळ नक्कीच फायद्याचे आहे. लिचीमध्ये कॅलरिज अगदी कमी असतात आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे वजन कमी करण्यसाठी आहारात लिची उपयुक्त ठरते. लिची खाल्यावर भूक कमी लागते तसेच  शरीर हायड्रेटेड राहते.

Web Title: lychee healthy fruit, eating healthy, this fruit is sweet in taste, nutrition for health,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.