उन्हाळा म्हणजे आइस्क्रिम हवंच. गोड खायची इच्छा झाली की लगेच आइस्क्रिम आठवतं, पण त्याच वेळी साखर, कॅलरी आणि हेल्थची काळजीही डोक्यात येते. अशावेळी गिल्ट फ्री नो शुगर आईस्क्रीम हा परफेक्ट पर्याय ठरू शकतो. (Love ice cream but worried about weight? Now eat it without hesitation, get a special recipe for sugar-free ice cream)खास करून खजूर वापरून केलेलं आइस्क्रिम नैसर्गिक गोडी देतं आणि शरीरालाही फायदेशीर ठरतं. शिवाय तयार करणंही अगदी सोपं आहे. पाहा घरीच छान थंडगार आइस्क्रिम कसे करायचे.
साहित्य :खजूर, केळी, दूध, बदाम, व्हॅनिला एसेंस, काजू , कोको पावडर (अगोड)
कृती :१. सर्वात आधी खजूर कोमट दुधात किंवा पाण्यात १५-२० मिनिटं भिजत ठेवा, जेणेकरून ते मऊ होतील. बिया आधीच काढून घ्यायच्या. जरा खजूर मऊ झाल्यावर मिक्सरमध्ये हे खजूर घ्यायचे. त्यात थोडं दूध घालायचं. त्याची पेस्ट वाटून घ्यायची.
२. आता केळी सोलून तुकडे करून घ्यायचे. छान ताजी आणि गोड केळी वापरा. आता मिक्सरच्या भांड्यात केळी, खजूर पेस्ट, दूध आणि व्हॅनिला एसेंसघालून छान स्मूथ वाटून घ्यायचे. मस्त जरा घट्ट अशी पेस्ट तयार करायची. त्यात सगळे पदार्थ एकजीव झाले की चमचाभर कोको पावडर घाला आणि मिक्स करा किंवा एकदा परत वाटून घ्या.
३. तयार मिश्रण एका एअरटाइट डब्यात काढून घ्यायचे. वरून बदाम किंवा अक्रोड छान तुकडे करुन घालायचे इतर कोणता सुकामेवा आवडत असल्यास तो ही घाला. डबा फ्रीजरमध्ये ५–६ तास सेट होण्यासाठी ठेवा. झाकण लावून ठेवून द्यायचा. मध्ये एकदा बाहेर काढून हलकं ढवळलं तर आईस्क्रीम अधिक क्रीमी तयार होतं.
हे आईस्क्रीम पूर्णपणे नो शुगर आहे, कारण गोडीसाठी खजूर आणि केळीचाच वापर केला आहे. खजूरमध्ये नैसर्गिक साखर, फायबर आणि मिनरल्स असतात, तर केळीमुळे आईस्क्रीमला क्रीमी टेक्स्चर मिळतं. असं घरगुती, हेल्दी आणि गिल्ट फ्री आईस्क्रीम केवळ चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही उत्तम ठरतं.
Web Summary : Enjoy delicious, healthy, sugar-free ice cream at home using dates and bananas. This simple recipe offers a guilt-free dessert, naturally sweetened and packed with fiber. It's easy to make and perfect for summer!
Web Summary : खजूर और केले का उपयोग करके घर पर स्वादिष्ट, स्वस्थ, चीनी-मुक्त आइसक्रीम का आनंद लें। यह आसान रेसिपी एक अपराध-मुक्त मिठाई प्रदान करती है, जो स्वाभाविक रूप से मीठी और फाइबर से भरपूर है। यह बनाने में आसान और गर्मी के लिए बिल्कुल सही है!