पदार्थ एक असला तरी तो करण्याची रेसिपी प्रांतानुसार बदलत जाते. त्या रेसिपीमध्ये काही पदार्थ घातले जातात तर काही पदार्थ वगळले जातात. त्यामुळे प्रांतानुसार पदार्थांची चवही बदलत जाते. कुरडईची भाजी हा पदार्थही त्याला अपवाद नाही. महाराष्ट्रात जवळपास सगळीकडेच कुरडईच्या भुग्याची किंवा चुऱ्याची भाजी करतात. पण ती भाजी करण्याची पद्धत मात्र प्रांतवार वेगवेगळी आहे. आता मराठवाड्याच्या लोकांना थोडं तिखट चवीचं जेवण आवडतं (Marathwada special recipe). त्यामुळे त्यांच्याकडची भाजीही तिखट असते. तुम्हालाही कुरडईच्या भाजीत थोडा चवबदल आणि तिखटपणा हवा असेल तर ही मराठवाडी रेसिपी एकदा ट्राय करून पाहा.(kurdai chi bhaji recipe in Marathi)
कुरडईची भाजी करण्याची रेसिपी
२ वाट्या कुरडईचा चुरा
१ मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो
४ ते ५ हिरव्या मिरच्या आणि ७ ते ८ लसूण पाकळ्या
कार्तिकी एकादशी: उपवासाच्या दिवशी खायलाच हवे 'हे' पौष्टिक पदार्थ- ॲसिडीटी, अपचन होणार नाही
फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग आणि कडिपत्ता
अर्ध्या लिंबाचा रस
१ टेबलस्पून कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ
कृती
एका पातेल्यामध्ये गरम पाणी करा आणि त्या पाण्यामध्ये कुरडईचा भुगा १५ ते २० मिनिटांसाठी भिजत ठेवा. यानंतर कुरडईमधले पाणी निथळून घ्या.
एक्सपर्ट सांगतात जेवण झाल्यानंतर १ छोटीशी लवंग काही वेळ चघळा, कमालीचे फायदे मिळतील
लसूण आणि मिरची तसेच थोडी कोथिंबीर, जिरे मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यात तेल घालून फोडणी करून घ्या. फोडणी झाल्यानंतर कांदा परतून घ्या.
कांदा परतून झाल्यानंतर लसूण आणि मिरचीची पेस्ट घाला. लसणाचा कच्चा वास गेल्यानंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घाला आणि एखाद्या मिनिटासाठी परतून घ्या.
किचनमधले ४ पदार्थ एकत्र करून खा! हाडांसाठी मस्त टॉनिक, म्हातारे झालात तरीही हाडं राहतील ठणठणीत
यानंतर त्यामध्ये पाण्यात भिजवलेल्या कुरडया घाला. चवीनुसार मीठ घाला आणि सगळं हलवून घ्या. कढईवर झाकण ठेवून वाफ आली की कुरडईची गरमागरम खमंग भाजी तयार.
