शरीराला तंदुरुस्त ठेवण्यात कोमट किंवा गरम पाणी खूप मदत करू शकतं. फिटनेस फ्रीक आणि सेलिब्रिटी देखील याच्याशी सहमत आहेत आणि त्यांच्या चाहत्यांसोबत निरोगी राहण्याच्या टिप्स शेअर करत राहतात. गरम पाणी शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करतं आणि शरीरातील अनेक आजार बरे करू शकतं. पण ते पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहिती आहे का? बहुतेक लोकांना गरम पाणी पिण्याची योग्य वेळ माहीत नसते. गरम पाणी पिण्याची योग्य वेळ आणि दररोज पिण्याचे काही आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊया.
गरम पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?
दिवसभरात तुम्ही कधीही गरम पाणी पिऊ शकता. परंतु सकाळी उठल्यानंतर, झोपण्यापूर्वी आणि जेवणापूर्वी गरम पाणी पिण्याची सर्वोत्तम वेळ आहे. सकाळी गरम पाणी प्यायल्याने पचन आणि हायड्रेशन सुधारण्यास मदत होते. गरम पाणी पिताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत जसं की पाण्याचं तापमान तुमच्यासाठी आरामदायक असलं पाहिजे, खूप गरम पाणी हानिकारक ठरू शकतं. तुम्ही तुमच्या गरम पाण्यात मध आणि लिंबाचा रस, दालचिनीचा तुकडा, बडीशेप इत्यादी देखील घालू शकता. या सर्व गोष्टी मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत करतात. जेवणाच्या किमान ३० मिनिटं आधी किंवा नंतर गरम पाणी पिणं चांगलं मानलं जातं.
गरम पाणी पिण्याचे फायदे?
- कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.
- गरम पाणी पिण्यामुळे शरीरातील मेटाबॉलिज्म वाढू शकतं.
- कॅलरीज लवकर बर्न होण्यास मदत होते.
- गरम पाणी प्यायल्याने आराम मिळतो.
- गरम पाणी ताण कमी करण्यास आणि शरीराला आराम देण्यास मदत करू शकतं.
- सकाळी गरम पाणी प्यायल्याने तुमची पचनसंस्था चांगली होते आणि विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.
उपाशी पोटी गरम पाणी प्यायल्याने काही लोकांना अस्वस्थता किंवा वेदना होऊ शकतात, विशेषतः ज्यांना पचनाच्या समस्या असतील. जर तुमच्यासोबत असं घडत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच ते प्या.