Lokmat Sakhi >Food > कतरीना कैफचा आवडता मऊसूत, जाळीदार नीर डोसा करण्याची खास रेसिपी-वजनही मेंटेन राहील

कतरीना कैफचा आवडता मऊसूत, जाळीदार नीर डोसा करण्याची खास रेसिपी-वजनही मेंटेन राहील

Katrina Kaif Favorite Neer Dosa Recipe : अभिनेत्री कतरीना कैफला नीर डोसा खूप आवडतो. उड्डपीचा नीर डोसा (Neer Dosa) खूपच प्रसिद्ध आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 21:55 IST2025-08-25T21:53:44+5:302025-08-25T21:55:14+5:30

Katrina Kaif Favorite Neer Dosa Recipe : अभिनेत्री कतरीना कैफला नीर डोसा खूप आवडतो. उड्डपीचा नीर डोसा (Neer Dosa) खूपच प्रसिद्ध आहे.

Katrina Kaif Favorite Neer Dosa Recipe It Feels As Soft As Cotton Easy To Make At Home | कतरीना कैफचा आवडता मऊसूत, जाळीदार नीर डोसा करण्याची खास रेसिपी-वजनही मेंटेन राहील

कतरीना कैफचा आवडता मऊसूत, जाळीदार नीर डोसा करण्याची खास रेसिपी-वजनही मेंटेन राहील

साऊथ इंडीयन (South Indian) पदार्थ हे कमी तेलाचे आणि कमीत कमी मसाल्यात बनवले जातात. याच कारणामुळे वजन कमी करण्याच्या प्रवासात जास्तीत जास्त साऊथ इंडीयन पदार्थांचा समावेश तुम्ही करू शकता. अभिनेते आणि अभिनेत्रीसुद्धा हे  पदार्थ खाणं पसंत करतात. अभिनेत्री कतरीना कैफला नीर डोसा खूप आवडतो. उड्डपीचा नीर डोसा (Neer Dosa) खूपच प्रसिद्ध आहे.

मऊ-मुलायम नीर डोसा तुम्ही तांदळापासून पटापट बनवू शकता. घरच्याघरी नीर डोसा बनवणं खूपच सोपं आहे. या डोश्याचं नाव नीर डोसा आहे कारण या पीठात पाणी जास्त असते. नीर डोसा करण्याची सोपी रेसिपी नक्की ट्राय करा. (How To Make Neer Dosa At Home)

नीर डोसा करण्याची रेसिपी  (Neer Dosa Recipe)

नीर डोसा करण्यासाठी सगळ्यात आधी १ कप तांदूळ घ्या. रोज भात करण्यासाठी जो तांदूळ घेता तो घेतला तरी चालेल. तांदूळ जवळपास २ ते ३ तांसासाठी पाण्यात भिजवायला ठेवा. त्यानंतर त्याचं पाणी काढून व्यवस्थित धुवून  घ्या नंतर बारीक वाटून याची पेस्ट बनवा. नंतर भिजवलेल्या तांदूळाचं पाणी काढून मिक्सरमध्ये वाटून बारीक पेस्ट बनवून घ्या. तांदूळ वाटताना त्यात २ चमचे किसलेलं खोबरं घाला. मीठ घालून हे मिश्रण अजून पातळ करा. (कमी ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले, पाहा १० नाजूक-सुंदर डिजाईन्स, रोज वापरता येतील)

नीर डोसा करण्यासाठी बॅटर एकदम पाण्यासारखं असायला हवं. ज्यामुळे डोसे खूपच मऊ बनतात. डोश्याचा तवा गरम करून घ्या मग तेल लावा. तव्यावर बॅटर पसरवा नंतर कव्हर १ मिनिटासाठी शिजू द्या. पातळ डोसा घाला आणि सर्व बाजूंनी पसरवा. एका बाजूनं शेकल्यानंतर  डोसा उतरवून घ्या. 

नीर डोसा मध्यम आचेवर शेकून घ्या. नीर डोसा एकाच बाजूनं शेकून बनवला जातो. पण तुम्ही वाटल्यास दोन्ही बाजूंनी शेकूनही बनवू शकता. तयार आहे एकदम स्वादीष्ट उड्डपी स्टाईल नीर डोसा. हा डोसा तुम्ही सांबार, नारळाची चटणी किंवा टोमॅटोच्या चटणीबरोबर खाऊ  शकता. नाश्ता, दुपारचं जेवण किंवा रात्रीच्या जेवणामध्ये खाऊ शकता. (दुधावर जाडजूड साय येण्यासाठी पाहा दूध तापवण्याची खास ट्रिक, घरीच करा भरपूर साजूक तूप)

Web Title: Katrina Kaif Favorite Neer Dosa Recipe It Feels As Soft As Cotton Easy To Make At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.