एरवी बरेच जण उपवास करत नाहीत. पण आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीचा उपवास मात्र अनेकजण करतात. यानिमित्ताने जर तुम्हाला उपवासाला खाण्यासाठी शेंगदाण्याचे लाडू करायचे असतील तर पुढे सांगितलेली रेसिपी एकदा ट्राय करून पाहा. कारण अनेकजणांचा असा अनुभव आहे की शेंगदाण्याचे लाडू खूपच ठिसूळ होतात. कधी कधी तर अगदी खातानाही मध्येच फुटतात आणि सगळा कूट इकडे- तिकडे सांडतो. असं होऊ द्यायचं नसेल तर दाण्यांचे लाडू करताना गूळ, तूप आणि शेंगदाण्याचा कूट यांचं प्रमाण परफेक्ट असणं गरजेचं आहे. ते कसं ठेवायचं ते पाहा..(Karthiki Ekadashi Special Sheng dana Laddu)
शेंगदाण्याचे लाडू करण्याची रेसिपी
२ वाट्या शेंगदाणे
अर्धी ते पाऊण वाटी गूळ
ट्विंकल खन्ना सांगते एक सोपा उपाय, मुलं मोबाइल बाजूला ठेवून पुस्तकं वाचू लागतील रोज
२ टेबलस्पून तूप
१ टीस्पून वेलची पूड
कृती
शेंगदाण्याच्या लाडूंना खमंग चव येण्यासाठी शेंगदाणे भाजून घेेणं खूप गरजेचं आहे. मध्यम आचेवर जेवढे खरपूस शेंगदाणे भाजून घ्याल तेवढी छान चव लाडूंना येते. त्यामुळे शेंगदाणे भाजून घ्या. त्यानंतर ते थंड झाले की त्यांची टरफलं काढून टाका.
यानंतर गूळ थोडा किसून घ्या. आता भाजून घेतलेले शेंगदाणे, किसून घेतलेला गूळ, वेलची पूड आणि थोडे गरम केलेले तूप हे सगळे पदार्थ मिक्सरच्या भांड्यात घाला आणि त्याचा एकत्रितपणे कूट करून घ्या.
बघा केस गळण्याचा नेमका संबंध कशाशी असतो, कारणांकडे दुर्लक्ष कराल तर तब्येतीवर बेतेल....
आता हा कूट एका मोठ्या भांड्यात काढा. त्यातला थोडासा भाग हातात घेऊन दाबून पाहा. दाबल्यानंतर जर तो एकजीव होत असेल तर त्याचे लाडू वळा. आणि जर तसं होत नसेल तर त्यात आणखी थोडं तूप घाला. तूप आणि गुळाचं प्रमाण व्यवस्थित झालं की शेंगदाण्याचा लाडू छान एकजीव होतो. मध्येच तुटून त्याचा भुगा होत नाही. एकदा ट्राय करून पाहा.



