lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > Jaljeera Recipe: उन्हाळ्यात जलजिरा पिण्याचे 5 फायदे; बघा रेसिपी- पचनास उत्तम, वेटलॉससाठी फायदेशीर

Jaljeera Recipe: उन्हाळ्यात जलजिरा पिण्याचे 5 फायदे; बघा रेसिपी- पचनास उत्तम, वेटलॉससाठी फायदेशीर

Food And Recipe: लिंबू, पुदिना, जीरे आणि सोडा... यांच्या वेगवेगळ्या फ्लेवर्सपासून तयार झालेला थंडगार जलजिरा उन्हाळ्यात प्यायलाच हवा.. त्यासाठीच बघा ही खास रेसिपी (5 health benefits of jaljeera)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2022 02:04 PM2022-05-16T14:04:46+5:302022-05-16T14:05:45+5:30

Food And Recipe: लिंबू, पुदिना, जीरे आणि सोडा... यांच्या वेगवेगळ्या फ्लेवर्सपासून तयार झालेला थंडगार जलजिरा उन्हाळ्यात प्यायलाच हवा.. त्यासाठीच बघा ही खास रेसिपी (5 health benefits of jaljeera)

Jaljeera- Best digestive drink for summer, How to make summer special chilled jaljeera?  | Jaljeera Recipe: उन्हाळ्यात जलजिरा पिण्याचे 5 फायदे; बघा रेसिपी- पचनास उत्तम, वेटलॉससाठी फायदेशीर

Jaljeera Recipe: उन्हाळ्यात जलजिरा पिण्याचे 5 फायदे; बघा रेसिपी- पचनास उत्तम, वेटलॉससाठी फायदेशीर

Highlightsजलजिरा अतिशय चवदार तर लागतोच, पण शरीरासाठी अतिशय फायदेशीरही असतो.

कैरीचं पन्ह, ताक, लस्सी, वेगवेगळी सरबते, फळांचे रस यांची उन्हाळ्यात चांगलीच रेलचेल असते. खरंतर अशा थंडगार, चवदार पदार्थांमुळेच उन्हाळा सुसह्य होत जातो. उन्हाळ्यात अनेक जणांना उष्णतेचा, अपचनाचा त्रास हाेतो. हा त्रास कमी करायचा असेल आणि उन्हाळ्यातही (special drink for summer) शरीराला, मनाला थंडावा मिळावा, असं वाटत असेल तर ही जलजिरा रेसिपी एकदा ट्राय करून बघाच. लिंबू, जिरे, पुदिना, सोडा यांच्यापासून तयार झालेला जलजिरा (jaljeera recipe) अतिशय चवदार तर लागतोच, पण शरीरासाठी अतिशय फायदेशीरही असतो. 

 

जलजिरा करण्यासाठी लागणारं साहित्य
२ मोठे चमचे भाजलेले जिरे, १ टीस्पून लिंबू सत्व, पुदिन्याची १० ते १५ पाने, थोडीशी कोथिंबीर, २ चमचे लिंबाचा रस, चवीनुसार काळे मीठ, अर्धा लीटर सोडा आणि गरजेनुसार बर्फाचे तुकडे.
कसा करायचा जलजिरा
- जीरे, काळेमीठ आणि लिंबूसत्व हे एकत्र करून मिक्सरमधून फिरवून घ्या. 
- यानंतर त्यामध्ये पुदिन्याची पानं, थोडीशी कोथिंबीर टाका, थोडंसं पाणी टाकून हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्या.
- आता हे मिश्रण गाळून घ्या आणि ग्लासमध्ये टाका. त्यात लिंबू पिळा.
- अर्धा ग्लास या मिश्रणाने भरावा तर अर्ध्या ग्लासात सोडा टाका. 
- वरतून बर्फाचे तुकडे टाकले की तयार झाला थंडगार जलजिरा..लिंबाचे तुकडे टाकून त्याला छान टॉपिंग करा. 

 

जरजिला पिण्याचे फायदे (5 health benefits of jaljeera)
- लिंबू, पुदिना यामध्ये व्हिटॅमिन सी (vitamin c) मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती (immunity) वाढविण्यासाठी हे पेय फायदेशीर ठरते.
- पुदिना आणि जिरे हे दोन्हीही पचनक्रिया आणि चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम (metabolism) सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे आपोआपच कॅलरी बर्न होऊन वेटलॉस करण्यासाठी जलजिरा उपयुक्त ठरतो. 


- पुदिना, कोथिंबीर, जीरे हे थंड प्रकृतीचे असतात. त्यामुळे उन्हाळ्यात शरीरातील दाह कमी करून शरीराला थंडावा देण्यासाठी जलजिरा उपयुक्त आहे.
- जलजिरा करताना जे पदार्थ वापरले जातात, त्यांच्या माध्यमातून शरीराला भरपूर प्रमाणात लोह मिळते. त्यामुळे उन्हाळ्यात थकवा येत असेल, अशक्तपणा जाणवत असेल किंवा ॲनिमियाचा त्रास होत असेल, तर जलजिरा पिणे फायद्याचे ठरते.
- एक ग्लास जलजिरा प्यायल्यास त्यातून भरपूर प्रमाणात फायबर मिळते. तसेच प्रोटीन्सचे प्रमाणही चांगले असते. 
 

Web Title: Jaljeera- Best digestive drink for summer, How to make summer special chilled jaljeera? 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.