lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > Is Rice Harmful For Health : भात खाल्ल्याशिवाय जेवल्यासारखंच वाटतंच नाही? जास्त भात खाण्याचेही आहेत ५ तोटे

Is Rice Harmful For Health : भात खाल्ल्याशिवाय जेवल्यासारखंच वाटतंच नाही? जास्त भात खाण्याचेही आहेत ५ तोटे

Is Rice Harmful For Health : जास्त भात खाल्ल्याने तुम्हाला पौष्टिक घटकांची कमतरता जाणवू शकते. आरोग्याची स्थिती आणि तुमच्या वयानुसार, आहारात प्रामुख्याने विविध फळे, भाज्या आणि प्रथिनांचा समावेश असावा.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 12:33 PM2022-06-01T12:33:35+5:302022-06-01T12:56:55+5:30

Is Rice Harmful For Health : जास्त भात खाल्ल्याने तुम्हाला पौष्टिक घटकांची कमतरता जाणवू शकते. आरोग्याची स्थिती आणि तुमच्या वयानुसार, आहारात प्रामुख्याने विविध फळे, भाज्या आणि प्रथिनांचा समावेश असावा.

Is Rice Harmful For Health : White rice disadvantages higher glycemic index score may be increased diabetes risk | Is Rice Harmful For Health : भात खाल्ल्याशिवाय जेवल्यासारखंच वाटतंच नाही? जास्त भात खाण्याचेही आहेत ५ तोटे

Is Rice Harmful For Health : भात खाल्ल्याशिवाय जेवल्यासारखंच वाटतंच नाही? जास्त भात खाण्याचेही आहेत ५ तोटे

भात नसेल तर जेवल्यासारखं वाटतचं नाही असं अनेकांचं म्हणणं असतं.  काहींना तर रात्री भात खाल्ल्याशिवाय व्यवस्थित झोपच येत नाही. भात तुम्ही रोज खात असाल तर त्याचं प्रमाण आहारातून कमी करायला हवं. कारण तुमच्या या सवयीमुळे तुम्ही अनेक आजारांना आमंत्रण देत आहात. (Is Rice Harmful For Health) यामध्ये हृदयविकाराचा धोका देखील समाविष्ट आहे. याशिवाय मधुमेहाच्या रुग्णांनी जास्त भात खाणे योग्य नाही. त्यामुळे रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.  मेडिकल न्यूज टुडे या पोर्टलने प्रसिध्द केलेल्या लेखानुसारही पांढरा भात जास्त खाणं ( ब्राऊन किंवा हातसडीचा नव्हे, तर पॉलिश केलेला) आणि कोलेस्टेरॉल यांचा संबंध दिसून येतो.  (White rice disadvantages higher glycemic index score may be increased diabetes risk)

1) हार्ट अटॅकचा धोका

तांदळात तुमच्या शरीराला आवश्यक असलेले कोणतेही पोषक तत्व कमी प्रमाणात असतात. त्यामुळे जर तुम्ही रोज भात खात असाल तर काळजी घ्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जास्त भात खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका जास्त असतो. त्यामुळे पांढऱ्या तांदळाच्या जास्त वापरावर नियंत्रण ठेवावे लागेल. अन्यथा तुम्हाला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात.

 त्वचेवर ग्लो नाही, केस पांढरे व्हायला लागलेत? करा चिंचेचा ‘असा’ वापर

2) पोषक घटकांची कमतरता

जास्त भात खाल्ल्याने तुम्हाला पौष्टिक घटकांची कमतरता जाणवू शकते. आरोग्याची स्थिती आणि तुमच्या वयानुसार, आहारात प्रामुख्याने विविध फळे, भाज्या आणि प्रथिनांचा समावेश असावा. असे मानले जाते की पांढऱ्या भाताऐवजी तुम्ही ब्राऊन राइस खाऊ शकता.

3) ब्लड शुगर वाढते

याशिवाय पांढरा भात खाल्ल्याने डायबिटीसचा धोका वाढू शकतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारातून भाताचे सेवन वगळ्यापेक्षा सुरूवातील कमी प्रमाणात खा. 

4) मेटोबॉलिक सिंड्रोम

पांढरा भात खाल्ल्याने मेटाबॉलिक सिंड्रोमची समस्या देखील उद्भवू शकते. त्यामुळे महिन्यातून एकदाच पांढरा भात खाण्याचा प्रयत्न करा. याच्या मदतीने तुम्ही मेटाबॉलिक समस्या टाळू शकता.

5) वजन वाढू शकतं

जर तुम्हाला लठ्ठपणाचा त्रास होत असेल तर तुम्हाला पांढरा भात खाणे ताबडतोब बंद करावे लागेल. कारण त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता जास्त असते. पोटाचा घेर वाढू शकतो, भात खाल्या खाल्या लगेच झोपू नका. जेवल्यानंतर रात्री चालायला जा आणि मग थोड्या वेळानं झोपा.

Web Title: Is Rice Harmful For Health : White rice disadvantages higher glycemic index score may be increased diabetes risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.