Join us
Daily Top 2Weekly Top 5

फ्रिजमध्ये ठेवलेली कणिक ’इतक्या’ तासांनंतर होते खराब, तुम्हीही फ्रिजमध्ये भिजवलेली कणिक ठेवता का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2026 18:20 IST

Cooking Tips: नेहमीच फ्रिजमध्ये ठेवलेली कणिक खात असाल तर त्यापुर्वी थोडी काळजी घ्यायलाच हवी...(Is Leftover Atta Dough Safe To Use?)

बऱ्याचदा असं होतं की गरजेपेक्षा जास्त कणिक भिजवली जाते आणि त्यामुळे मग पुरेशा पोळ्या झाल्यानंतरही ती उरते. आता कणिक उरली तर ती आपण सहज फ्रिजमध्ये ठेवून देतो आणि दुसऱ्यादिवशी तिच्या पोळ्या करून खातो. बऱ्याच जणींच्या बाबतीत तर असंही होतं की त्यांच्यामागे सकाळची खूप धावपळ, गडबड असते. त्यामुळे मग सकाळची थोडी पळापळ कमी करण्यासाठी त्या रात्रीच कणिक भिजवून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी तिच्या पोळ्या करतात (Is Leftover Atta Dough Safe To Use?). यामुळे काम निश्चितच सोपं होतं पण त्याचा आरोग्यावर काही वेगळाच परिणाम होत तर नाही ना याची काळजीही घेणं गरजेचं आहे..(how long can we keep Leftover Atta Dough in fridge?)

 

फ्रिजमध्ये ठेवलेली कणिक किती तासांत खराब होते?

भिजवून ठेवलेली कणिक किती वेळात खराब होण्याची प्रक्रिया सुरू होत जाते याविषयी स्वयंपाक करणाऱ्या प्रत्येकानेच जाणून घेणं गरजेचं आहे. फूड एक्सपर्ट असं सांगतात की जर भिजवून ठेवलेली कणिक तुम्ही रुम टेम्परेचरवर ठेवत असाल तर ती २ ते ३ तास चांगली राहाते आणि नंतर मात्र त्यावर बॅक्टेरिया तयार होण्यास सुरुवात होते.

८ दिवसांत चेहऱ्यावर येईल तेज! 'या' पद्धतीने वापरा बडिशेप, वेलची- त्वचा होईल तेजस्वी 

जर तीच कणिक तुम्ही फ्रिजमध्ये ठेवत असाल तर मात्र ती १२ ते २४ तासांत संपवून टाकायला हवी. कारण कणिक फ्रिजमध्ये ठेवल्याने तिच्यावर बॅक्टेरिया जमा होतच नाहीत,  असं नसतं. फक्त ते तयार होण्याची प्रक्रिया हळुवार होत जाते. शिवाय कणिक फ्रिजमध्ये ठेवतानाही थोडी काळजी घ्यायला  हवी. तुम्ही ज्या डब्यात कणिक ठेवणार आहात तो अजिबात ओलसर नको. शिवाय तिला काही खरकटे पदार्थही लागायला नको. नाहीतर ती लवकर खराब होते.

 

फ्रिजमध्ये ठेवलेली कणिक वापरण्यापुर्वी काय काळजी घ्यावी?

फ्रिजमध्ये ठेवलेली कणिक कुठेही काळसर झालेली नाही ना हे एकदा तपासून घ्या. कारण कणिक काळसर झाली आहे, याचा अर्थ ती खराब होऊन खाण्यायोग्य राहिलेली नाही.

युरीक ॲसिड वाढल्याने अंग दुखतंय? ५ योगासनं करा, युरीक ॲसिड राहील कंट्रोलमध्ये

तसेच फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेच्या लगेच पोळ्या करायला घेऊ नयेत. कणिक थोडा वेळ फ्रिजच्या बाहेर काढून ठेवावी. ती रुम टेम्परेचरवर आल्यावर थोडं कोमट पाणी आणि थोडंसं तेल लावून ती १- २ मिनिटे मळून घ्यावी. त्यानंतर पुन्हा १० ते १५ मिनिटे ती झाकून ठेवावी आणि मग तिच्या पोळ्या लाटाव्या.

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सआरोग्य