Lokmat Sakhi >Food > साबुदाणा न भिजवता प्रेशर कुकरमध्ये करा साबुदाण्याची खिचडी! फक्त ४ शिट्टयांमध्ये - मऊ, मोकळी खिचडी तयार...

साबुदाणा न भिजवता प्रेशर कुकरमध्ये करा साबुदाण्याची खिचडी! फक्त ४ शिट्टयांमध्ये - मऊ, मोकळी खिचडी तयार...

instant sabudana khichdi recipe : sabudana khichdi without soaking : quick sabudana khichdi in cooker : साबुदाणा न भिजवता प्रेशर कुकरमध्येही तितकीच चविष्ट, मऊ, मोकळी साबुदाणा खिचडी करण्याची भन्नाट ट्रिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2025 12:08 IST2025-09-26T11:52:49+5:302025-09-26T12:08:49+5:30

instant sabudana khichdi recipe : sabudana khichdi without soaking : quick sabudana khichdi in cooker : साबुदाणा न भिजवता प्रेशर कुकरमध्येही तितकीच चविष्ट, मऊ, मोकळी साबुदाणा खिचडी करण्याची भन्नाट ट्रिक...

instant sabudana khichdi recipe sabudana khichdi without soaking quick sabudana khichdi in cooker How to make soft sabudana khivchdi in Cooker | साबुदाणा न भिजवता प्रेशर कुकरमध्ये करा साबुदाण्याची खिचडी! फक्त ४ शिट्टयांमध्ये - मऊ, मोकळी खिचडी तयार...

साबुदाणा न भिजवता प्रेशर कुकरमध्ये करा साबुदाण्याची खिचडी! फक्त ४ शिट्टयांमध्ये - मऊ, मोकळी खिचडी तयार...

सध्या नवरात्रीचे उपवास सुरु असल्याने, साबुदाणा व त्याचे अनेक पदार्थ भरपूर खाल्ले जातात. साबुदाण्याची खिचडी, वडे कोणताही पदार्थ करायचा म्हटलं तर साबुदाणे आधी पाण्यांत भिजत (quick sabudana khichdi in cooker) घालून फुलवून घ्यावे लागतात. साबुदाणे जर पाण्यांत व्यवस्थित भिजले तर कोणताही पदार्थ अप्रतिम होतोच. अनेकदा आपण कामाच्या गडबडीत साबुदाणे पाण्यांत भिजवायला विसरतो. अशा परिस्थितीत, आयत्यावेळी नेमकं काय करावं असा प्रश्न पडतो( sabudana khichdi without soaking).

साबुदाणा न भिजवताच आयत्यावेळी खिचडी कशी करावी अशी पंचाईत होते. परंतु काळजी करू नका, जर साबुदाणे भिजवायला विसरलात तरी देखील आपण प्रेशर कुकरच्या मदतीने अगदी १० ते १५ मिनिटांत मऊ, मोकळी साबुदाणा खिचडी तयार करु शकतो. साबुदाणा न भिजवताही आपण सहजपणे झटपट साबुदाण्याची खिचडी तयार करु शकतो. साबुदाणा न भिजवताच झटपट प्रेशर कुकरमध्ये तितकीच चविष्ट आणि मऊ, मोकळी साबुदाणा खिचडी करण्याची भन्नाट ट्रिक पाहूयात. 

साबुदाणा न भिजवता प्रेशर कुकरमध्ये साबुदाण्याची खिचडी कशी करावी ? 

१. एक कप साबुदाणा २ ते ३ वेळा चांगला स्वच्छ धुवून घ्या, जेणेकरून त्यातील सर्व स्टार्च निघून जाईल. आता त्यातील पाणी पूर्णपणे निथळून काढून टाका, साबुदाणा कोरडा दिसला पाहिजे. यानंतर, त्यात एक चमचा तेल आणि अर्धा चमचा मीठ टाकून चांगले मिसळून घ्या. हा साबुदाणा एका लहान स्टीलच्या डब्यात  भरा, त्यानंतर वरून ४ चमचे पाणी घालून डब्याचे झाकण घट्ट लावून घ्या.

२. कुकरमध्ये साबुदाणा भरलेला स्टीलचा डबा आणि तुम्हाला हवे असल्यास बटाटे देखील कापून ठेवा. थोडे पाणी टाकून कुकरचे झाकण लावा आणि ४ शिट्ट्या होईपर्यंत शिजू द्या. साबुदाण्याची खिचडी करण्यासाठी एकाचवेळी साबुदाणा आणि बटाटे देखील व्यवस्थित शिजवून होतील.  गॅस बंद करून, कुकर थंड झाल्यावर झाकण उघडा आणि बटाटे बाहेर काढून त्यांचे छोटे तुकडे करून घ्या. साबुदाण्याचा डबा देखील कुकमधून बाहेर काढा.

राजगिरा रताळ्याच्या खुसखुशीत पुऱ्या! ‘अशी’ करा टम्म फुगलेली पूरी, गार झाल्यावरही होणार नाही मऊ आणि तेलकट...

साजूक तुपासाठी साठवलेल्या सायीला येते दुर्गंधी? सायीत मिसळा ८ पदार्थ - कुबट वास होईल कमी...

३. प्रेशर कुकरमधून साबुदाणा शिजवून घेतल्यानंतर पुन्हा एकदा त्याला थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे साबुदाणा एकमेकांना चिकटून राहणार नाही. धुवून झाल्यावर तो चाळणीत घालूंन, त्यातील सर्व पाणी काढून टाका आणि चाळणीतच पसरवून ठेवा. यामुळे साबुदाण्याचा प्रत्येक दाणा मऊ आणि मोकळा   होईल आणि खिचडी तयार करताना तो चिकट होणार नाही.

४. बटाटे आणि साबुदाणा शिजत असताना, दुसऱ्या बाजूला शेंगदाणे भाजून घ्या आणि त्यांची साले काढून ते मिक्सरमध्ये जाडसर वाटून त्याचे कुट तयार करुन घ्या. साबुदाणा खिचडी मोकळी आणि चविष्ट होण्यासाठी शेंगदाण्याचा कूट फायदेशीर ठरतो. याव्यतिरिक्त, हिरवी मिरची कापून घ्या आणि खिचडी तयार करण्यासाठी लागणारे उर्वरित साहित्य काढून तयार ठेवा.

५. एका पॅनमध्ये तेल गरम करा, त्यामध्ये एक चमचा जिरे आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून परतून घ्या. मग कडीपत्ता आणि बटाटे घालूंन तेलात परतवून घ्या. थोड्यावेळ तेलात शिजवल्यानंतर त्यात साबुदाणा, शेंगदाण्याचा कूट, मीठ आणि तुम्हाला आवडत असल्यास चवीसाठी थोडी साखरही घालू  शकता. मग खिचडी चमच्याने कालवून एकजीव करुन घ्यावी थोडा वेळ शिजवल्यास साबुदाण्याची खिचडी खाण्यासाठी तयार आहे.

Web Title : तुरंत साबूदाना खिचड़ी: बिना भिगोए प्रेशर कुकर में बनाएं

Web Summary : बिना भिगोए प्रेशर कुकर में झटपट साबूदाना खिचड़ी बनाएं। बस धोकर, स्टील के कंटेनर में पानी के साथ चार सीटी आने तक पकाएं, फिर मूंगफली और मसालों के साथ तड़का लगाकर मिनटों में नवरात्रि के लिए अनुकूल व्यंजन तैयार करें।

Web Title : Instant Sabudana Khichdi: Pressure Cooker Recipe Without Soaking Overnight

Web Summary : Make fluffy Sabudana Khichdi quickly in a pressure cooker without pre-soaking. Simply wash, cook with water in a steel container for four whistles, then temper with peanuts and spices for a Navratri-friendly dish in minutes.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.