बऱ्याचदा नाश्त्याला काय करावं हा प्रश्न पडतोच. शिवाय दिवाळी सुटीनंतर आता मुलांच्या शाळाही सुरू होणार आहेत. त्यामुळे मुलांच्या डब्यात काय द्यावं हा प्रश्न पुन्हा एकदा मुलांच्या आईसमोर उभा राहणार आहे. त्यासाठीच हा एक मस्त पर्याय पाहा. अगदी १० मिनिटांत आटा उत्तप्पा तयार होतो. शिवाय तो अतिशय चवदार असल्याने लहान मुलांपासून ते घरातल्या वयस्कर मंडळींपर्यंत सगळ्यांनाच चालू शकतो. आटा उत्तप्पाची आणखी एक खासियत म्हणजे रेसिपी अतिशय सोपी असून त्यासाठी कोणतीही पुर्वतयारी करण्याची गरज नाही (instant atta uthappam recipe by chef Kunal Kapoor). आटा उत्तप्पा रेसिपी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.(how to make atta Uthappa)
आटा उत्तप्पा रेसिपी
साहित्य
१ वाटी गव्हाचं पीठ
१ टीस्पून बेकिंग सोडा
१ टेबलस्पून तेल
छोट्या- मोठ्या आजारांवर अतिशय गुणकारी ठरणारी ५ औषधी रोपं! बाल्कनीतल्या छोट्या कुंडीतही छान फुलतील..
मोहरीसाठी हिंग, जिरे, मोहरी
२ ते ३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, लसूण, आलं आणि कोथिंबीर
बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो
चवीनुसार लाल तिखट आणि मीठ
२ चमचे दही
कृती
सगळ्यात आधी एका मोठ्या भांड्यामध्ये गव्हाचं पीठ घ्या. त्यामध्ये दही, बेकिंग सोडा आणि मीठ घाला. त्यामध्ये गरम पाणी घालून पीठ भिजवून घ्या.
यानंतर गॅसवर एक लहान कढई गरम करायला ठेवा. त्यामध्ये तेल घाला आणि हिंग, मोहरी, जिरे, कडिपत्ता, हिरव्या मिरच्या, आलं, लसूण घालून फोडणी करून घ्या. ही फोडणी तयार केलेल्या उत्तप्पा बॅटरमध्ये घाला आणि १० मिनिटे ते पीठ तसेच झाकून ठेवा.
दिवाळीच्या कामांमुळे मान- पाठ- कंबर गळून गेली? हातावरचा 'हा' पॉईंट दाबा, पेनकिलर घेण्याची गरजच नाही
यानंतर डोसा करण्याचा तवा गॅसवर गरम करायला ठेवा. तवा तापल्यानंतर त्यावर तेल घाला. यानंतर उत्तप्पा बॅटर तव्यावर टाकून थोडं पसरवून घ्या. वरच्या बाजुने टोमॅटो आणि कांदा घाला.
जेव्हा उत्तप्प्याची खालची बाजू भाजून होईल तेव्हा तो उलटवून घ्या आणि पुन्हा खमंग भाजून घ्या. त्यावर थोडं तेल सोडा. खमंग, चवदार उत्तप्पा तयार.
