आजकाल लहान मुलांना पिझ्झा ,बर्गर असे पदार्थ फार आवडतात. त्यात अनेक असे पदार्थ असतात जे फारच महाग आणि आरोग्यासाठी वाईटही असतात. (Indian tadka, Let's make something desi! Special food for kids, eat hot desi burgers during monsoon)पण एकदा का तुम्ही हा बर्गर खाऊन पाहीला की आपल्या देशी स्टाईलमध्येच कराल. चवीला एकदम मस्त आणि करायला सोपा आहे. लहान मुलांना आणि सगळ्यांनाच फार आवडेल. संध्याकाळी किंवा डब्यासाठी एकदम मस्त रेसिपी आहे.
साहित्य
कांदा, सिमला मिरची, पनीर, टोमॅटो, लसूण, तेल, बटर, मीठ, बर्गर बन, लाल तिखट, हळद, आमचूर पूड, शेजवान सॉस , टोमॅटो सॉस , कोथिंबीर ,पाणी
कृती
१. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. पनीरचे तुकडे करायचे आणि लसूणही बारीक चिरायचा. जरा जास्त लसूण घ्या. सिमला मिरचीचे लांब पातळ काप करायचे. तसेच टोमॅटो चिरायचा. बारीकच चिरा. कोथिंबीर एकदम बारीक चिरायची.
२. पॅनमध्ये बटर घालायचे आणि जरा वितळले की त्यात लसूण घालायची. लसूण मस्त खमंग परतायची आणि त्यात कांदा घालायचा. कांदा गुलाबी परतायचा. कांदा मस्त परतून घ्यायचा. मग त्यात सिमला मिरची घालायची. छान परतायची. टोमॅटो घालायचा आणि पाणी सुटल्यावर त्यात मसाले घालायला घ्यायचे.
३. मीठ घाला. जरा कमीच घाला इतर सॉसमध्ये मीठ असते. मीठ घातल्यावर हळद घाला आणि लाल तिखट घाला. मस्त परता आणि मग थोडी आमचूर पूड घालायची. सगळं छान परता. किंचित पाणी घाला म्हणजे मसाले शिजतील. शेवटी त्यात पनीरचे तुकडे घाला आणि ढवळून घ्या. शेजवान सॉस घाला आणि चमचाभर टोमॅटो सॉसही घाला. सगळं मस्त मिक्स करा.
४. बर्गर बनला तयार मसाला लावायचा भरपूर लावा आणि तव्यावर शेकवा. मात्र त्यासाठी आधी तव्यावर मस्त तेल आणि थोडे बटर घाला त्यावर लाल तिखट घाला कोथिंबीर घाला आणि ढवळा. मग त्यावर तयार बर्गर खमंग कुरकुरीत परता. एकदम मस्त आणि चविष्ट होतो.