Join us

वजन कमी करायचं तर रोज ‘हे’ चविष्ट सूप प्या, तब्येत सुधारते-केस गळणंही थांबते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2025 18:31 IST

If you want to lose weight, drink this delicious soup every day, it improves your health and also stops hair loss, special weight loss drink : हे सूप रोज पिणे ठरेल आरोग्यासाठी फायद्याचे. पाहा कसे कराल वेटलॉस सूप.

वजन कमी करण्यासाठी व्यायाम करणे गरजेचेच आहे. मात्र योग्य आहारा घेणे फार महत्त्वाचे असते. विविध पौष्टिक रेसिपी आपण खाऊन पाहतो. तशीच ही एक रेसिपी आहे. वजन कमी करण्यासाठी अगदी फायद्याची आहे तसेच पोट भरीची आहे. (If you want to lose weight, drink this delicious soup every day, it improves your health and also stops hair loss, special weight loss drink )हे सूप फक्त वजन कमी करण्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही चांगले आहे. केस गळत असतील तर केसांनाही पोषण मिळेल. आठवड्यातून दोन ते तीन वेळातरी वाटीभर असे सूप प्या. नक्कीच फायदा होईल. शेवगा फार आरोग्यदायी असतो. लाल भोपळाही पौष्टिक असतो. टोमॅटोमुळे वजन आटोक्यात राहण्यास मदत होते. त्यामुळे हे सूप आहारात नक्की घ्या.  

साहित्य लाल भोपळा, लसूण, मीठ, शेवग्याच्या शेंगा, टोमॅटो, पाणी, काळीमिरी पूड

कृती१. छान ताज्या शेवग्याच्या शेंगा घेऊन या. शेवगा फार पौष्टिक असतो. लाल भोपळ्याची भाजी आपण घरी करतोच. मस्त ताजा असा लाल भोपळा घेऊन यायचा. त्याचे जाड तुकडे करायचे. तसेच शेवग्याच्या शेंगा धुवायच्या आणि त्याचे तुकडे करायचे. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. टोमॅटोचे बारीक तुकडे करायचे.  

२. एका कुकरमध्ये लाल भोपळ्याचे तुकडे घ्यायचे. त्यात शेवग्याच्या शेंगा घालायच्या. तसेच लसणाच्या पाकळ्या घालायच्या. पाणी ओतायचे. सगळे पदार्थ बुडतील एवढे पाणी हवे. टोमॅटोचे तुकडे घालायचे आणि कुकरचे झाकण लावायचे. 

३. कुकरच्या शिट्या काढून घ्यायच्या. सगळे पदार्थ मऊ व्हायला हवेत. छान शिजले की गॅस बंद करायचा आणि पदार्थ गार करत ठेवायचे. सगळं व्यवस्थित गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे. एकदम पातळ छान वाटून घ्यायचे. शेंगा भोपळा व्यवस्थित वाटला जाईल याची काळजी घ्यायची. गरज असेल तर आणखी पाणी घालायचे. 

४. वाटलेली पेस्ट गाळणीने किंवा पातळ कॉटनच्या स्वच्छ फडक्याने गाळून घ्यायची. गाळून झाल्यावर पुन्हा एकदा पातेल्यात सूप ओतायचे. त्यात चमचाभर काळीमिरी पूड घालायची. चवी पुरते मीठ घालायचे आणि छान ढवळायचे. ढवळून झाल्यावर सूप उकळू द्यायचे. उकळल्यावर गरमागरम प्यायचे. 

टॅग्स :अन्नवेट लॉस टिप्सपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.आहार योजना