Lokmat Sakhi >Food > झणझणीत फोडणीच सांगेल पदार्थ आहे लै भारी! पाहा लसूण भाताची झटपट चमचमीत रेसिपी

झणझणीत फोडणीच सांगेल पदार्थ आहे लै भारी! पाहा लसूण भाताची झटपट चमचमीत रेसिपी

If you love spicy must try this recipe, garlic rice recipe, Indian tadka recipies : लसणाची फोडणी देऊन असा भात नक्की करा. चवीला एक नंबर. सगळ्यांनाच आवडेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2025 20:38 IST2025-07-02T18:56:26+5:302025-07-02T20:38:36+5:30

If you love spicy must try this recipe, garlic rice recipe, Indian tadka recipies : लसणाची फोडणी देऊन असा भात नक्की करा. चवीला एक नंबर. सगळ्यांनाच आवडेल.

If you love spicy must try this recipe, garlic rice recipe, Indian tadka recipies | झणझणीत फोडणीच सांगेल पदार्थ आहे लै भारी! पाहा लसूण भाताची झटपट चमचमीत रेसिपी

झणझणीत फोडणीच सांगेल पदार्थ आहे लै भारी! पाहा लसूण भाताची झटपट चमचमीत रेसिपी

विविध प्रकारच्या फोडणी भारतात केल्या जातात. मात्र लसणाच्या फोडणीला तोड नाही. फारच चविष्ट आणि साधी अशी ही फोडणी दिल्यावर पदार्थ जाम भारी लागतो. (If you love spicy must try this recipe, garlic rice recipe, Indian tadka recipies  )अशीच फोडणी देऊन जर भात केला तर मग खायला मज्जाच येईल. पाहा लसूण भात कसा करायचा. अगदी सोपी रेसिपी पाहा आणि नक्की करा. 


साहित्य 
लसूण, तांदूळ, मोहरी, तेल, उडदाची डाळ, लाल तिखट, धणे पूड, हळद, हिरवी मिरची, कोथिंबीर, शेंगदाणे, कडीपत्ता, मीठ

कृती
१. लसणाच्या चांगल्या आठ, दहा पाकळ्या सोलून घ्यायच्या. सोलून झाल्यावर ठेचायच्या. शेंगदाण्याची सालं काढून घ्यायची. उडदाची डाळ पाण्यात भिजत ठेवायची. चमचाभर डाळ घ्यायची. हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करायचे. लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या. 

२. कुकरमध्ये भात लावायचा. तांदूळ स्वच्छ धुवायचे आणि मग पाणी ओतून भात लावायचा. भातात पाणी जरा कमी ठेवा म्हणजे तो मोकळा होतो. तसेच भातात थोडे मीठ घालायचे त्यामुळे भात फुलतो. भात छान फुलल्यावर पसरट ताटात किंवा परातीत काढून घ्यायचा आणि पसरवून ठेवायचा. गार होऊ द्यायचा. त्याचा लगदा नको व्हायला. 

३. एका कढईत तेल घ्यायचे. तेल तापल्यावर त्यात मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की त्यात कडीपत्ता घालायचा. कडीपत्ताही मस्त फुलला की शेंगदाणे घालायचे आणि परतून घ्यायचे. भिजवलेली उडदाची डाळ घालायची. डाळीचा रंग बदलेपर्यंत परतायची. गॅस कमीच ठेवा. पदार्थ करपवू नका. त्यात लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या घाला आणि खमंग परतून घ्या. परतून झाल्यावर त्यात लाल तिखट घाला आणि हळदही घाला. तसेच धणे पूड घाला आणि ढवळा. थोडे पाणी घाला म्हणजे मसाला करपणार नाही. लाल तिखट जळणार नाही. 

४. लसूण छान खमंग कुरकुरीत झाली की त्यात शिजवलेला भात घालायचा. भात आणि मसाला छान मिक्स करायचा आणि ढवळून घ्यायचे. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि एकजीव करायचे. झाकून ठेवा आणि छान वाफ काढून घ्या. भात मस्त लाल दिसायला लागेल. गॅस बंद करा. जास्त तिखट वाटला तर वरतून लिंबाचा रस पिळा. 

Web Title: If you love spicy must try this recipe, garlic rice recipe, Indian tadka recipies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.