lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > भरपूर टोमॅटो विकत आणले पण लगेच खराब होतात ? १ सोपी ट्रिक- १० दिवस टोमॅटो राहतील फ्रेश...

भरपूर टोमॅटो विकत आणले पण लगेच खराब होतात ? १ सोपी ट्रिक- १० दिवस टोमॅटो राहतील फ्रेश...

How To Store Tomato For Long Time : टोमॅटो खराब होऊ नये, सडू नयेत म्हणून १ सोपी ट्रिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2023 07:30 AM2023-09-21T07:30:36+5:302023-09-21T07:55:13+5:30

How To Store Tomato For Long Time : टोमॅटो खराब होऊ नये, सडू नयेत म्हणून १ सोपी ट्रिक...

How to Store Tomatoes to Preserve Their Freshness and Taste. | भरपूर टोमॅटो विकत आणले पण लगेच खराब होतात ? १ सोपी ट्रिक- १० दिवस टोमॅटो राहतील फ्रेश...

भरपूर टोमॅटो विकत आणले पण लगेच खराब होतात ? १ सोपी ट्रिक- १० दिवस टोमॅटो राहतील फ्रेश...

'टोमॅटो' हा असा पदार्थ आहे की जो रोजच्या जेवणात आपल्याला लागतोच. टोमॅटो शिवाय जेवण बनवणे शक्यच होणार नाही. डाळ, भाजी, ग्रेव्ही भाजी पदार्थ कोणताही असो त्यात टोमॅटो हा गरजेचा असतोच. स्वयंपाक घरामधील कुठलीही भाजी अथवा रेसिपी करायचे असेल तर टोमॅटोची गरज भासतेच. त्यामुळे टॉमॅटोला स्वयंपाक घरातील बादशहा असे म्हटले जाते. टोमॅटो हे दिसायला सुंदर खाण्यासाठी चविष्ट आणि पौष्टिक असतात. टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन आणि कॅल्शियम असते. त्यामुळे टोमॅटो आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. आपल्या किचनमध्ये कांदा, बटाटा, टोमॅटो कायम उपलब्ध असतातच. तसे कांदा, बटाटा, टोमॅटो वर्षाचे बाराही महिने बाजारांत विकत मिळतात(How To Store Tomato For Long Time).

कधी बाजारांत टोमॅटोची आवक जास्त झाल्यावर त्याचा दर पडून टोमॅटो अतिशय स्वस्त किमतीत उपलब्ध होतात, तर कधी फारच महाग विकले जातात. अशावेळी दर पाहून घरची गृहिणी काहीवेळा जास्तीचे टोमॅटो विकत घेऊन ते (How to Store Tomatoes to Preserve Their Freshness and Taste) फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवते. परंतु हे जास्तीचे टोमॅटो खरेदी केल्यानंतर काही कालांतराने फ्रिजमध्ये ठेवून खराब (How to store tomatoes in fridge for long time) होण्याची शक्यता असते. अशावेळी हे विकत घेतलेले टोमॅटो खराब (1 Easy Ways To Preserve Tomatoes And Extend Their Shelf Life) न होता दीर्घकाळ आहेत तसेच स्टोअर (Tips to keep tomatoes fresh for a long duration) करून ठेवण्याची एक सोपी ट्रिक पाहुयात. या सोप्या ट्रिकचा वापर करुन आपण एकदा विकत घेतलेले टोमॅटो किमान १० ते १५ दिवस खराब न होता स्टोअर करुन ठेवू शकतो(Best way to store tomatoes for months, 1 Easy Tomato Preservation Tip).

टोमॅटो दीर्घकाळ स्टोअर करुन ठेवण्याची सोपी पद्धत... 

१. बाजारांतून विकत आणलेले टोमॅटो सर्वप्रथम एका भांड्यात काढून ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत. 

२. हे टोमॅटो स्वच्छ धुवून झाल्यानंतर एका स्वच्छ कापडाने ते व्यवस्थित पुसून कोरडे करुन घ्यावेत. 

३. टोमॅटो कापडाने पुसून स्वच्छ करुन घ्यावेत, आपण जर हे टोमॅटो असेच ओले स्टोअर करुन ठेवले तर ते लगेच खराब होण्याची शक्यता असते. 

गुलाबजामचा उरलेला पाक फेकून न देता करा झटपट होणारे गुलगुले, पाक वाया न जाता बनेल नवीन गोड पदार्थ...

सणावाराला भाज्या करताना करा झणझणीत ग्रेव्ही, ग्रेव्ही चमचमीत होण्यासाठी १३ सोप्या टिप्स, बेत जमेल मस्त...

४. आता एक मेणबत्ती पेटवून घ्यावी. 

५. त्यानंतर प्रत्येकी एक एक टोमॅटो घेऊन, टोमॅटोच्या देटाकडील भागावर मेणबत्तीचे मेण वितळवून सोडावे. 

६. अशाप्रकारे देटाकडील भागावर मेणबत्तीचे मेण सोडून टोमॅटोचा देट सील करुन घ्यावा. 

७. त्यानंतर हे टोमॅटो एका हवाबंद डब्यांत भरुन मग फ्रिजमध्ये स्टोअर करुन ठेवावे. 

नैवेद्याचे पंचामृत उरले तर त्याला थोडासा मॉर्डन टच देऊन झटपट बनवा पंचामृत केक...

ही सोपी ट्रिक वापरुन आपण बाजारातून विकत आणलेले टोमॅटो दीर्घकाळासाठी खराब न होता व्यवस्थित स्टोअर करुन ठेवू शकतो.

 

 

Web Title: How to Store Tomatoes to Preserve Their Freshness and Taste.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.