Lokmat Sakhi >Food > मोड आलेली कच्ची उसळ चिकट होते, आंबूस वास येतो ? १ भन्नाट ट्रिक, उसळ राहील फ्रेश...

मोड आलेली कच्ची उसळ चिकट होते, आंबूस वास येतो ? १ भन्नाट ट्रिक, उसळ राहील फ्रेश...

HOW TO KEEP BEAN SPROUTS FRESH LONGER ? : कडधान्य व्यवस्थित स्टोअर केले नाही तर लगेच दुर्गंधीयुक्त आणि चिकट होतात, त्यांना दीर्घकाळ फ्रेश ठेवण्यासाठी अशा प्रकारे करा स्टोअर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2023 06:36 PM2023-08-30T18:36:23+5:302023-08-30T18:53:29+5:30

HOW TO KEEP BEAN SPROUTS FRESH LONGER ? : कडधान्य व्यवस्थित स्टोअर केले नाही तर लगेच दुर्गंधीयुक्त आणि चिकट होतात, त्यांना दीर्घकाळ फ्रेश ठेवण्यासाठी अशा प्रकारे करा स्टोअर...

How to Store Sprouts : Tips for Keeping them Fresh and Crisp. | मोड आलेली कच्ची उसळ चिकट होते, आंबूस वास येतो ? १ भन्नाट ट्रिक, उसळ राहील फ्रेश...

मोड आलेली कच्ची उसळ चिकट होते, आंबूस वास येतो ? १ भन्नाट ट्रिक, उसळ राहील फ्रेश...

मोड आलेल्या कडधान्याला 'सुपरफूड' असं म्हटलं जातं. कडधान्यात असलेल्या अनेक उपयुक्‍त घटकांमुळे शरीराला भरपूर फायदा होतो. त्यामुळे शरीर सुदृढ आणि आरोग्य निरोगी ठेवायचं असेल तर आपल्या आहारात नियमित मोड आलेली कडधान्ये असायलाच हवीत. मोड आलेली कडधान्ये आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त मानली जातात. हा अतिशय पोषक आहार मानला जातो. कोणत्याही कडधान्याला मोड आणल्यामुळे त्यांची पौष्टिकता वाढते. 

 आपल्या रोजच्याआहारात कडधान्यांची भाजी, उसळ किंवा कोशिंबीर असे वेगवेगळे पदार्थ करुन खातो. काहीवेळा आपण कडधान्यांना मोड आणण्यासाठी ते घरीच भिजवतो तर कधी मोड आणलेले कडधान्य बाहेरूनच विकत आणतो. असे असले तरीही आपण शक्यतो सध्या कडधान्य घरीच भिजवण्याच्या भानगडीत पडत नाही. बाहेरून विकत आणलेली मोड आलेली कडधान्य खरेदी करताना ती सहसा प्लॅस्टिकच्या पिशवी किंवा कंटेनरमध्ये पॅकिंग करुन दिली जातात. आपण ही विकतची पॅकिंग करुन आणलेली कडधान्य अशीच प्लॅस्टिकमध्ये ठेवून मग फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवतो. कडधान्य अशाप्रकारे फ्रिजमध्ये स्टोअर (How to Keep Bean, Sprouts Fresh Longer for a Month) करून ठेवल्यास त्याला कुबट दुर्गंधी येते किंवा ते लगेच खराब होतात. यामुळे ही कडधान्य वापरण्यायोग्य न राहिल्याने फेकून द्यावी लागतात. बाजारांतून कडधान्य विकत घेतल्यानंतर, त्याचा लगेच वापर करायचा नसल्यास ती नेमकी कोणत्या पद्धतीने स्टोअर करून ठेवावी हे पाहूयात(How to Store Sprouts : Tips for Keeping them Fresh and Crisp).

कडधान्य विकत आणल्यानंतर सर्वात आधी हे कराच... 

कडधान्य बाजारातून विकत आणल्यानंतर ती तशीच प्लॅस्टिकच्या पिशवी किंवा कंटेंनरमध्ये ठेवल्यास लगेच खराब होतात. याशिवाय कडधान्य बराच काळ फ्रिजच्या बाहेर स्टोअर करून ठेवल्यास देखील त्यांना एक प्रकारची कुबट दुर्गंधी येऊ लागते. असे होऊ नये म्हणून कडधान्य बाहेरुन विकत आणल्यानंतर सर्वप्रथम त्यातील खराब कडधान्यांचे दाणे निवडून बाहेर काढून टाकावेत. त्यानंतर कडधान्य पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यावे. आता हे धुतलेले कडधान्य एका सुती कापडावर पसरवून संपूर्णपणे वाळवून घ्यावे. त्यातील पाण्याचा अंश संपूर्णपणे निघून जाईल याची खात्री करून घ्यावी. नंतर हे वाळलेले कडधान्य फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवावेत. 

उरलेले पनीर फ्रिजमध्ये ठेवले तरी लगेच शिळे - पिवळे दिसते, १ सोपी ट्रिक- पनीर राहील ताजे फ्रेश!

उकडलेले गरम बटाटे सोलण्याची १ सोपी ट्रिक, हात न पोळता साल काढा झटपट...

कडधान्यची सालं वेगळी काढा... 

कडधान्यांच्या सालीमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात फायबर असते, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. पण जर आपल्याला कडधान्य दीर्घकाळासाठी स्टोअर करून ठेवायचे असल्यास, त्याच्या साली काढून ते वेगळे करणे आवश्यक आहे. कारण या सालींमुळे कडधान्य लवकर खराब होण्याची प्रक्रिया गतिमान होते. 

उरलेला शिळा ब्रेड ताजा करण्याची १ जादूई ट्रिक, शेफ पंकज भदौरिया सांगतात...

कडधान्य दीर्घकाळ स्टोअर करुन ठेवण्यासाठी... 

१. जर आपल्याला बाजारांतून विकत आणलेले कडधान्य लगेच वापरायचे नसतील तर ते व्यवस्थित स्टोअर करून ठेवावे. कडधान्य स्टोअर करून ठेवण्यासाठी एका काचेच्या भांड्याच्या तळाशी टिश्यू पेपर अंथरून घ्यावा. मग त्यात स्वच्छ करुन घेतलेले कडधान्य ओतावे. काचेच्या कंटेनरमध्ये कडधान्य भरुन ठेवल्यास ते चांगले टिकण्यास मदत होते. टिश्यू पेपर घातल्याने कडधान्यांतील सर्व आर्द्रता टिश्यू पेपर शोषून घेतो. ज्यामुळे कडधान्य लगेच खराब होत नाही. अशाप्रकारे कडधान्य स्टोअर करुन मग फ्रिजमध्ये ठेवावे.

महागडा सुकामेवा पावसाळ्यात सादळू नये म्हणून ४ टिप्स, बदाम-काजू-अंजीर टिकतील छान...

२. कडधान्य जास्त काळ खराब होऊ नयेत म्हणून आपण त्यांना प्लॅस्टिकच्या पिशवीत पॅक करू शकता. पण हे लक्षात ठेवा की ते खूप घट्ट पॅक केले जाऊ नये. तसेच प्लॅस्टिकच्या पिशवीत थोडी हवा ठेवावी.

Web Title: How to Store Sprouts : Tips for Keeping them Fresh and Crisp.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.