lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > पालक लवकर खराब होतो, २- ३ दिवसांतच सडतो? बघा सोपा उपाय- आठवडाभर राहील फ्रेश

पालक लवकर खराब होतो, २- ३ दिवसांतच सडतो? बघा सोपा उपाय- आठवडाभर राहील फ्रेश

How To Store Spinach For Long: पालक फ्रिजमध्ये ठेवला तरी २- ३ दिवसांतच त्याची पानं काळी पडू लागतात. असं होऊ नये म्हणून काय उपाय करावा ते पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2024 10:37 AM2024-04-16T10:37:02+5:302024-04-16T10:39:00+5:30

How To Store Spinach For Long: पालक फ्रिजमध्ये ठेवला तरी २- ३ दिवसांतच त्याची पानं काळी पडू लागतात. असं होऊ नये म्हणून काय उपाय करावा ते पाहा.

How to store spinach for long, how to keep spinach fresh for long | पालक लवकर खराब होतो, २- ३ दिवसांतच सडतो? बघा सोपा उपाय- आठवडाभर राहील फ्रेश

पालक लवकर खराब होतो, २- ३ दिवसांतच सडतो? बघा सोपा उपाय- आठवडाभर राहील फ्रेश

Highlightsआठवडाभर पालकाची पानं छान फ्रेश, हिरवीगार राहावीत म्हणून काय उपाय करावे, ते पाहा..

दररोज जाऊन ताजी भाजी घेऊन येणं काही सगळ्यांसाठीच सोयीचं नसतं. त्यामुळे मग आपलं काम सोयीस्कर व्हावं म्हणून आपण एकदाच २- ३ दिवसांची किंवा कधी कधी तर त्यापेक्षाही जास्त दिवसांची भाजी घेऊन येतो. काही भाज्या टिकतात तर काही भाज्या खराब होतात. लवकर खराब होणाऱ्या भाज्यांपैकी एक भाजी म्हणजे पालक. फ्रिजमध्ये ठेवला तरी पालकाची पाने लगेचच काळी पडतात (how to keep spinach fresh for long). सडून जातात. असं होऊ नये आणि आठवडाभर पालकाची पानं छान फ्रेश, हिरवीगार राहावीत म्हणून काय उपाय करावे, ते पाहा.. (How to store spinach for long)

 

पालकाची भाजी फ्रिजमध्ये साठवून ठेवण्याचा उपाय 

पालकाच्या भाजीची हिरवीगार पाने २- ३ दिवसांतच खराब होऊन काळी पडू नयेत, म्हणून ती भाजी कशा पद्धतीने फ्रिजमध्ये साठवून ठेवावी, याविषयी माहिती देणारे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर आपल्याला दिसतात.

फक्त २० रुपयांत चमकेल चेहरा, बघा कोरियन तरुणींसारखी सुंदर त्वचा मिळविण्याचा खास उपाय

सगळ्यात आधी पालक व्यवस्थित निवडून घ्या आणि १० ते १५ मिनिटांसाठी एका वर्तमान पत्रावर पसरून ठेवा. जेणेकरून त्यांच्यातला जो थोडा फार ओलावा असेल तो निघून जाईल. 

उन्हाळा स्पेशल दही- भात रेसिपी, उरलेल्या भाताला साजूक तुपाचा सुगंधी तडका- बघा चवदार रेसिपी 

पालकाची जी पानं आपल्याला थोडी काळी पडलेली किंवा ओलसर आहेत, असं लक्षात आलं तर ती पानं लगेच वेगळी काढून टाका. कारण अशा सडक्या पानांमुळे चांगल्या पानांचीही नासाडी होते.

 

यानंतर आता तुमचं भाजीचं जे कंटेनर आहे त्यामध्ये एक पेपर नॅपकीन टाका. त्यावर पालकाची भाजी ठेवा. त्याच्यावर पुन्हा पेपर नॅपकीन ठेवा. ताे अशा पद्धतीने ठेवा की भाजी पुर्णपणे झाकून जाईल. हा डबा आता झाकण लावून फ्रिजमध्ये ठेवा. पालकाची भाजी फ्रेश राहील.

आपण चांगले पालक आहोत हे आईबाबांनी कसे ओळखायचे? सद्गुरू सांगतात एक खास गोष्ट...

पालकाची भाजी जास्त दिवस टिकवून ठेवण्यासाठी आणखी एक पद्धत आहे. त्यानुसार निवडलेली पालकाची पानं पेपर नॅपकीनमध्ये गुंडाळा आणि त्यानंतर झिपलॉक बॅगमध्ये टाकून फ्रिजमध्ये असणाऱ्या व्हेजिटेबल टबमध्ये ठेवून द्या. पालकाची भाजी ८ दिवस टिकेल. पण त्यापेक्षा जास्त दिवस पालक साठवू नये. 

 

Web Title: How to store spinach for long, how to keep spinach fresh for long

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.