lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > समर स्पेशल : करा पारंपरिक पद्धतीचा दहीभात, उरलेल्या भाताला साजूक तुपाचा सुगंधी तडका- पोटाला मिळेल थंडाव

समर स्पेशल : करा पारंपरिक पद्धतीचा दहीभात, उरलेल्या भाताला साजूक तुपाचा सुगंधी तडका- पोटाला मिळेल थंडाव

Summer Special Curd Rice Recipe: भात उरला असेल तर उन्हाळ्यात फोडणीचा भात करण्याऐवजी या खास रेसिपीने दही- भात करा... घरातले सगळेच खुश होतील. (How to make curd rice)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2024 05:07 PM2024-04-15T17:07:54+5:302024-04-15T19:26:35+5:30

Summer Special Curd Rice Recipe: भात उरला असेल तर उन्हाळ्यात फोडणीचा भात करण्याऐवजी या खास रेसिपीने दही- भात करा... घरातले सगळेच खुश होतील. (How to make curd rice)

How to make curd rice, summer special curd rice recipe, how to make curd rice in 5 minutes  | समर स्पेशल : करा पारंपरिक पद्धतीचा दहीभात, उरलेल्या भाताला साजूक तुपाचा सुगंधी तडका- पोटाला मिळेल थंडाव

समर स्पेशल : करा पारंपरिक पद्धतीचा दहीभात, उरलेल्या भाताला साजूक तुपाचा सुगंधी तडका- पोटाला मिळेल थंडाव

Highlightsथंडगार दही घालून मनाला आणि शरीराला थंडावा देणारा स्पेशल दही भात करून पाहा

काही जण पक्के भातप्रेमी असतात. त्यांना गरमागरम वरण भात, तूप मीठ भात जसा आवडतो तेवढ्याच प्रेमाने ते फोडणी दिलेला शिळा भातही खाऊ शकतात. भात उरला की त्याला फोडणी घालायची, हे बहुतांश घरातलं नेहमीचंच काम. हा भात तर चवदार होताेच. पण आता उन्हाळ्याच्या दिवसांत मात्र थंडगार दही घालून मनाला आणि शरीराला थंडावा देणारा स्पेशल दही भात करून पाहा (How to make curd rice). रेसिपी अगदीच सोपी आहे आणि शिवाय झटपट होणारी. (summer special curd rice recipe)

 

उन्हाळा स्पेशल दही- भात रेसिपी

खास उन्हाळ्यात हा दही- भात कसा करावा, याची रेसिपी smitadeoofficial या पेजवर शेअर करण्यात आली आहे.

साहित्य

३ वाट्या उरलेला भात

२ ते ३ वाट्या दही

१ वाटी दूध किंवा पाणी

कबुतरांच्या त्रासाने वैतागलात? बाल्कनीत ५ रोपं लावा, कबुतरांना कायमचं दूर पळवणारा हिरवागार उपाय

२ टेबलस्पून तूप

१ बारीक चिरलेली मिरची

२ वाळलेल्या लाल मिरच्या

चवीनुसार मीठ

कडिपत्त्याची ४ ते ५ पाने

चेहऱ्यावर पिगमेंटेशन, हाताचे कोपरे- अंडरआर्म्सही काळवंडले? बघा नितळ त्वचेसाठी १ आयुर्वेदिक उपाय

चिमूटभर साखर आणि हिंग

फोडणीसाठी मोहरी आणि जीरे

कृती

 

सगळ्यात आधी भातामध्ये दही आणि दूध टाका. रेसिपीमध्ये पाणी टाकताना दाखवलं आहे. पण दूध टाकलं तर त्या भाताला आणखी छान चव येऊ शकते.

आता दूध, दही घातलेला भात चवीनुसार मीठ घालून छान कालवून घ्या. 

हाय रे तेरा झुमका! नवरीसाठी बघा खास लग्नसराई स्पेशल कस्टमाईज कानातल्यांचे ७ सुंदर डिझाईन्स

एक छोटी कढई गॅसवर गरम करायला ठेवा. त्यात तूप घालून जिरे, मोहरी, हिरवी मिरची, लाल मिरची, कडिपत्ता आणि हिंग टाकून फोडणी करून घ्या. 

ही फोडणी आता दही आणि दूध घालून कालवलेल्या भातावर घाला. त्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. हा थंडगार भात उन्हाळ्यातली शरीराची उष्णता कमी करण्यास नक्कीच मदत करेल.

तुपाची फोडणी घालताना तुम्ही फोडणीमध्ये थोडे शेंगदाणे, उडीद डाळ, तूर डाळही घालू शकता. भाताची चव आणखी खुलून येईल. 


 

Web Title: How to make curd rice, summer special curd rice recipe, how to make curd rice in 5 minutes 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.