Lokmat Sakhi >Food > भाजलेल्या शेंगदाण्यांची सालं काढणं खूप अवघड- वेळखाऊ वाटतं? घ्या खास ट्रिक- १ मिनिटांत होईल काम

भाजलेल्या शेंगदाण्यांची सालं काढणं खूप अवघड- वेळखाऊ वाटतं? घ्या खास ट्रिक- १ मिनिटांत होईल काम

Kitchen Tips: शेंगदाण्याची सालं काढण्याचं काम खूप अवघड आणि वेळखाऊ वाटत असेल तर हा एक सोपा उपाय लगेचच करून पाहा..(1 simple trick to peel off roasted peanut)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2025 18:17 IST2025-07-04T17:29:35+5:302025-07-04T18:17:37+5:30

Kitchen Tips: शेंगदाण्याची सालं काढण्याचं काम खूप अवघड आणि वेळखाऊ वाटत असेल तर हा एक सोपा उपाय लगेचच करून पाहा..(1 simple trick to peel off roasted peanut)

how to peel off roasted peanut skin quickly, 1 simple trick to peel off roasted peanut | भाजलेल्या शेंगदाण्यांची सालं काढणं खूप अवघड- वेळखाऊ वाटतं? घ्या खास ट्रिक- १ मिनिटांत होईल काम

भाजलेल्या शेंगदाण्यांची सालं काढणं खूप अवघड- वेळखाऊ वाटतं? घ्या खास ट्रिक- १ मिनिटांत होईल काम

Highlightsआषाढीच्या निमित्ताने एकदा या पद्धतीने शेंगदाण्यांची सालं काढून पाहा. 

आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) निमित्ताने घरात कोणकोणते उपवासाचे पदार्थ करायचे, याची तयारी आता घरोघरी सुरू झालेली असणार. कारण हौशीने म्हणा किंवा भक्तीभावाने म्हणा.. बहुतांश लोक हा उपवास करतातच. त्यामुळे मग साबुदाण्याची खिचडी, भगर- आमटी, भाजणीचे थालिपीठ, शेंगदाण्याचे लाडू असे पदार्थ केले जातात. या पदार्थांमध्ये घातला जाणारा एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे शेंगदाण्याचा कूट. आता शेंगदाण्याचा कूट करायचा म्हटलं की शेंगदाणे भाजून घेणे, त्याची सालं काढणे ही कामे आलीच. आता ही कामे अनेकजणींना वेळखाऊ वाटतात (how to peel off roasted peanut skin quickly?). पण एक सोपी ट्रिक जर तुम्ही पाहिली तर अवघ्या एका मिनिटांत तुम्हाला किलोभर शेंगदाण्यांची सालं काढता येतील. त्यासाठी काय करायचं ते पाहा..(1 simple trick to peel off roasted peanut)

 

शेंगदाण्यांची टरफलं झटपट कशी काढायची?

शेंगदाण्यांची सालं काढायची असतील तर सगळ्यात आधी ती भाजून घेणं गरजेचं आहे. शेंगदाणे भाजण्यासाठी नेहमी पसरट आकाराची कढई घ्यावी. कारण तिच्यात शेंगदाणे व्यवस्थित भाजले जातात.

ओपन पोअर्समुळे चेहरा खराब दिसतो? गुलाबजल आणि ग्लिसरीन 'या' पद्धतीने लावा, पिगमेंटेशनही जातील 

तसेच शेंगदाणे भाजण्यासाठी शेगडी नेहमी मंद ते मध्यम आचेवर ठेवावी. मोठ्या आचेवर शेंगदाणे भाजल्यास ते करपण्याची किंवा त्याच्यावर जळाल्याचे काळे डाग पडण्याची शक्यता जास्त असते.

साबुदाण्याची खिचडी खूप गचका, चिकट होते? बघा काय चुकतं- खिचडी मोकळी, दाणेदार होण्यासाठी... 

आता भाजून घेतलेले शेंगदाणे जेव्हा बऱ्यापैकी कोमट झालेले असतात तेव्हा ते एका मोठ्या पसरट नॅपकिनवर किंवा टॉवेलवर घ्या. त्यामध्ये थोडंसं मीठ घाला. 

 

यानंतर टॉवेल शेंगदाण्याभोवती पक्का गुंडाळून घ्या आणि ओट्यावर किंवा फरशीवर ठेवा आणि हाताने त्यावर थोडा जोर देऊन तो पुढे- मागे या पद्धतीने हलवा. १५ ते २० सेकंद जरी तुम्ही असं केलं तरी शेंगदाण्यांची सालं मोकळी होतील.

रोपांनाही खाऊ घाला थोडीशी साखर! भरपूर फुलं येण्यासोबतच होतील ३ जबरदस्त फायदे

यानंतर हे शेंगदाणे एका चाळणीमध्ये घेऊन चाळा. सालं जमिनीवर पडतील आणि शेंगदाणे अगदी स्वच्छ होतील. आषाढीच्या निमित्ताने एकदा या पद्धतीने शेंगदाण्यांची सालं काढून पाहा. 

 

Web Title: how to peel off roasted peanut skin quickly, 1 simple trick to peel off roasted peanut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.