lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > तळल्यावर पुऱ्या तेलकट होतात? पीठ भिजवताना घाला १ पांढरा पदार्थ, पुऱ्या तेलकट होणारच नाहीत

तळल्यावर पुऱ्या तेलकट होतात? पीठ भिजवताना घाला १ पांढरा पदार्थ, पुऱ्या तेलकट होणारच नाहीत

How to make without oil\oil free poori in simple steps : पुरी तळताना कणिक नीट मळून घेणं गरजेचं..टम्म फुललेल्या पुऱ्या हव्या असेतील तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2024 03:37 PM2024-04-08T15:37:18+5:302024-04-08T20:56:46+5:30

How to make without oil\oil free poori in simple steps : पुरी तळताना कणिक नीट मळून घेणं गरजेचं..टम्म फुललेल्या पुऱ्या हव्या असेतील तर..

How to make without oil\oil free poori in simple steps | तळल्यावर पुऱ्या तेलकट होतात? पीठ भिजवताना घाला १ पांढरा पदार्थ, पुऱ्या तेलकट होणारच नाहीत

तळल्यावर पुऱ्या तेलकट होतात? पीठ भिजवताना घाला १ पांढरा पदार्थ, पुऱ्या तेलकट होणारच नाहीत

सणावाराला प्रत्येक घरात श्रीखंड-पुरीचा बेत आखला जातो (Oil Free Poori). पुरी भाजी, पुरी श्रीखंड, पुरी आम्रखंड आपण आवडीने खातो. पुरी प्रत्येकाला आवडते, पण पुरी जर तेलकट होत असेल तर, आपण खाणं टाळतो (Gudhi Padava). बऱ्याचदा पुरीच्या आत तेल जमा होते, आणि मग खाताना हे तेल हाताला आणि संपूर्ण ओठांवर लागते (Cooking Tips). तेलकट पुरी खाल्ल्याने वजन तर वाढतेच, शिवाय इतरही आजार ग्रासतात (Kitchen Tips).

फिटनेस फ्रिक लोक पुरी पूर्णपणे खाणं टाळतात. पुरी तेलकट न होण्यासाठी कणिक मळण्यापासून ते तळण्यापर्यंत काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. यामुळे पुरी करताना त्यात तेल भरणार नाही. शिवाय टम्म फुलतील, आणि चवीलाही उत्कृष्ट लागतील. पुरी करण्यासाठी कणिक कशापद्धतीने भिजवायची? पाहूयात(How to make without oil\oil free poori in simple steps).

पुरी करण्यासाठी कणिक कशी भिजवायची?

- ज्यापद्धतीने आपण चपाती करण्यासाठी कणिक मळतो, त्याचप्रमाणे कणिक मळून घ्यावे. चपाती करताना आपण कणिक सैलसर मळतो, पण पुरीसाठी जर आपण कणिक मळत असाल तर, घट्टसर मळा. पाण्याचा वापर कमी करा.

थुलथुलीत मांड्या - हिप्सवरची चरबी वाढली? करा ४ गोष्टी- व्यायाम न करताही घटेल चरबी

- कणिक तयार करण्यासाठी एका परातीत २ वाट्या गव्हाचे पीठ घ्या. त्यात एक चमचा साखर, चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. साखरेमुळे कणिक पांढरे राहील आणि मिठामुळे पुऱ्या चवीला लागतील.

- आता गव्हाच्या पीठामध्ये अर्धा कप दूध आणि अर्धा कप पाणी घालून मिक्स करा. हळूहळू पाणी आणि दूध घालून कणिक मळून घ्या. अशाप्रकारे आपले कणिक योग्यरित्या मळून तयार होईल. शिवाय घट्टसर तयार होईल.

-  कणिक मळून झाल्यानंतर ब्रशने तेल लावा.

बॅड कोलेस्टेरॉल ते वेट लॉस : 'ही' दाक्षिणात्य पांढरी चटणी खाल्ल्याने शरीराला मिळतील ५ फायदे

- आता कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. कणकेचा गोळा घ्या, व पुऱ्या लाटून घ्या. गरम तेलात सोडून पुऱ्या तळून घ्या.

- पुऱ्या तळताना गॅस मध्यम आचेवर ठेवा, व पुऱ्या ब्राऊन होईपर्यंत तळा, व तळलेल्या पुऱ्या चाळणीमध्ये काही वेळासाठी काढून ठेवा. अशा प्रकारे कमी तेलकट पुऱ्या खाण्यासाठी रेडी.

Web Title: How to make without oil\oil free poori in simple steps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.