Join us

Navratri 2025 : साबुदाण्याची तिखट खीर खा, उपवासातला हलका आहार-पित्ताचाही त्रास नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2025 17:40 IST

Navratri Fast 2025: साबुदाणा खिचडी, साबुदाण्याची खीर असं आपण नेहमीच खातो. आता साबुदाण्याची तिखट खीर करून खाऊन पाहा...(how to make spicy sabudana kheer?)

नवरात्रोत्सव आता पुढच्या काही दिवसांतच सुरू होणार आहे. आता नवरात्र म्हटलं की अनेक घरांमध्ये देवीचे भक्तीभावाने उपवास केले जातात. अगदी ९ दिवस उपवास करून नवमीच्या दिवशी उपवास सुटतात. साबुदाणा खिचडी, साबुदाणा खीर, भगर, थालिपीठ असे तेच ते पदार्थ खाऊन कधी कधी कंटाळाही येतोच. म्हणूनच यावेळी नवरात्रीच्या उपवासासाठी थोडासा वेगळा पदार्थ करून पाहा. साबुदाण्याची खिचडी आणि साबुदाण्याची खीर यांचं कॉम्बिनेशन असणारी तिखट साबुदाणा खीर.. करायला सोपा आणि चवीत थोडा बदल म्हणून हा पदार्थ उत्तम आहे.(how to make spicy sabudana kheer?)

साबुदाण्याची तिखट खीर कशी करायची?

 

साहित्य

१ वाटी साबुदाणा

१ मध्यम आकाराचा बारीक कापलेला बटाटा

९० टक्के लोकांना वाटतं की 'या' पदार्थांमधून भरपूर प्रोटीन्स मिळतात! पण तसं नसतं, बघा ते कोणते

१ ते २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या

चवीनुसार तिखट आणि मीठ

१ टीस्पून जिरे

१ टेबलस्पून तूप

कृती

 

साबुदाण्याची तिखट खीर करण्यासाठी सगळ्यात आधी साबुदाणा २ ते ३ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर तो ७ ते ८ तास भिजत घाला.

यानंतर कढई गॅसवर गरम करायला ठेवा. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तूप घाला. तूप तापल्यानंतर जिऱ्याची फोडणी करून घ्या. त्यानंतर हिरव्या मिरच्या आणि बटाटे परतून घ्या.

इंचभर केस वाढायलाही ६ महिने लागतात? 'हे' घरगुती तेल लावा, केस वाढतील भराभर- लांबसडक होतील

यानंतर भिजवलेला साबुदाणा कढईमध्ये घाला आणि एखाद्या मिनिटासाठी परतून घ्या. आता दुसरीकडे गॅसवर थोडं गरम पाणी करा. ते पाणी साबुदाणा असलेल्या कढईमध्ये घाला. साबुदाणा भिजायला हवा एवढं पाणी कढईमध्ये घाला. यानंतर त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तिखट आणि मीठ घाला आणि सगळी खीर एकदा हलवून घ्या. जेव्हा खीर छान आळून येईल आणि साबुदाणा तसेच बटाटा व्यवस्थित शिजेल तेव्हा गॅस बंद करा. ही खीर अतिशय चवदार लागते आणि पोटासाठीही दमदार आहे. 

 

टॅग्स :नवरात्रीअन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सनवरात्री उपवास आणि पदार्थ २०२४