Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > चपात्या वातड होतात-फुगत नाही? कणकेत हा पांढरा पदार्थ मिसळा, मऊ-फुगलेल्या होतील चपात्या

चपात्या वातड होतात-फुगत नाही? कणकेत हा पांढरा पदार्थ मिसळा, मऊ-फुगलेल्या होतील चपात्या

How To Make Soft Chapati At Home : काहीजणांच्या हातच्या चपात्या खूपच सॉफ्ट असतात तर काहीजणांच्या एकदम कडक.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 21:35 IST2026-04-07T21:29:13+5:302026-04-07T21:35:45+5:30

How To Make Soft Chapati At Home : काहीजणांच्या हातच्या चपात्या खूपच सॉफ्ट असतात तर काहीजणांच्या एकदम कडक.

How To Make Soft Chapati At Home : How To Remain Chapati Soft And Tasty | चपात्या वातड होतात-फुगत नाही? कणकेत हा पांढरा पदार्थ मिसळा, मऊ-फुगलेल्या होतील चपात्या

चपात्या वातड होतात-फुगत नाही? कणकेत हा पांढरा पदार्थ मिसळा, मऊ-फुगलेल्या होतील चपात्या

चपाती हा भारतीय स्वयंपाकाचा एक महत्वाचा भाग आहे. दुपारचं  जेवण असो की रात्रीचं जेवण असतो बरेच लोक आवडीनं चपात्या खातता.  मस्त, गोल चपात्या करणं ही सुद्धा एक कला आहे.  काहीजणांच्या हातच्या चपात्या खूपच सॉफ्ट असतात तर काहीजणांच्या एकदम कडक (How To Remain Chapati Soft And Tasty). प्रत्येकाच्या हातच्या चपात्या या चवीला आणि टेक्चरला वेगवेगळ्या असतात.  काही छोट्या टिप्स तुमचं काम सोपं करू शकतात ज्यामुळे चपात्या मऊसूत होतील. (How To Make Soft Chapati At Home)

पिठात काय काय मिसळावे?

हा सगळ्यात कॉमन प्रश्न आहे की चपाती करण्यासाठी कणकेत काय मिसळावं. चपातीच्या पिठात थोडं मीठ मिसळायला हवं. ज्यामुळे चपातीची चव दुप्पटीनं वाढते. नंतर साध्या पाण्यानं पीठ मळून घ्या. पीठ जास्त घट्ट नसेल किंवा जास्त सैल नसेल याची काळजी घ्या.

कणीक मळून झाल्यानंतर लगेच चपात्या करायला घेऊ नका. कमीत कमी २० ते २५ मिनिटं पीठ तसंच राहू द्या. त्यानंतर हळूहळू चपात्या करायला घ्या.  यामुळे चपात्या मऊ होतील. कारण पीठ मळल्यानंतर काहीवेळ तसंच ठेवल्यास त्यातील ग्लुटेन सक्रीय होते.

चपाती करताना पोळपाट आणि लाटण्याला चिकटू नये म्हणून थोडं सुकं पीठ लावलं जातं पण तुम्हाला मऊ चपात्या हव्या असतील तर  सुकं पीठ वापरण्याऐवजी तुम्ही तुपाचे काही थेंब लाटण्याला लावू शकता नंतर चपाती लाटा. ही सिक्रेट टिप वापरल्यानं चपाती एकदम मऊसूत होईल.

चपाती थेट आचेवर शेकू नका.

 चपाती तव्यावर शेकल्यानतर थेट आचेवर शेकली जाते. ज्यामुळे चपाती कडक होते तर कधी जास्त शिजते. म्हणून चपाती नेहमी तव्यावर शेका.  चपाती दोन्ही बाजूंनी शेकून घ्या.नंतर कापडाच्या मदतीनं हलकं दाबून व्यवस्थित शेका. ज्यामुळे चपात्या मऊ , फुललेल्या आणि सॉफ्ट होतात. तुम्ही या चपात्यांवर तूपसुद्धा लावू शकता. २ ते ३ दिवस या चपात्या सॉफ्ट राहतात. चपाती शेकल्यानंतर एका सुती कापडात बांधून किंवा सुती कापड वरून झाकून ठेवू शकता. ज्यामुळे चपात्या जास्तवेळ मऊ राहतात.

Web Title : नरम चपाती रहस्य: एकदम सही, फूली हुई रोटी के लिए आटे के टिप्स

Web Summary : नरम, फूली हुई चपाती बनाने के लिए आटे में नमक डालें और 20-25 मिनट के लिए छोड़ दें। सूखे आटे के बजाय घी का उपयोग करें। तवे पर पकाएं, हल्के से दबाएं, फिर लंबे समय तक नरम रखने के लिए कपड़े में लपेटकर रखें।

Web Title : Soft Chapati Secrets: Flour Tips for Perfect, Puffed Indian Bread

Web Summary : Achieve soft, puffed chapatis by adding salt to the dough and resting it for 20-25 minutes. Skip dry flour, using ghee instead. Cook on a griddle, pressing gently, then store wrapped in cloth for lasting softness.