Lokmat Sakhi >Food > ना गॅस-ना पापड खार, उरलेल्या भाताचे करा कुरकुरीत पापड; १५ मिनिटात बनतील ५० पापड

ना गॅस-ना पापड खार, उरलेल्या भाताचे करा कुरकुरीत पापड; १५ मिनिटात बनतील ५० पापड

How to make rice papad recipe with leftover rice : रात्रीचा भात जास्तच उरला आहे? फोडणीचा भात न करता करा क्रिस्पी पापड..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2024 10:00 AM2024-04-02T10:00:05+5:302024-04-02T10:05:01+5:30

How to make rice papad recipe with leftover rice : रात्रीचा भात जास्तच उरला आहे? फोडणीचा भात न करता करा क्रिस्पी पापड..

How to make rice papad recipe with leftover rice | ना गॅस-ना पापड खार, उरलेल्या भाताचे करा कुरकुरीत पापड; १५ मिनिटात बनतील ५० पापड

ना गॅस-ना पापड खार, उरलेल्या भाताचे करा कुरकुरीत पापड; १५ मिनिटात बनतील ५० पापड

नेहमीच्या जेवणानंतर बऱ्याचदा भात, भाजी किंवा आमटी उरतेच (Leftover Rice). उरलेलं जेवण आपण पुन्हा गरम करून खातो. बऱ्याचदा भात उरला तर, आपण त्याला फोडणी देतो, आणि फोडणीचा भात खातो. फोडणीचा भात चवीला जबरदस्त लागतो (Papad Recipe). पण तोच-तोच फोडणीचा भात खाऊन कंटाळाही येतो (Cooking Tips). किंवा आपण फोडणी देण्याची पद्धत वेगळी देऊन पाहतो (Summer Special). भात उरला असेल तर फोडणीचा भात किंवा लेमन राईस, करण्यापेक्षा आपण महिनाभर टिकणारा एक पदार्थ बनवू शकता.

आता तुम्ही म्हणाल महिनाभर टिकणारा पदार्थ ते ही उरलेल्या भाताचे कसं शक्य आहे? तर हो, उरलेल्या भाताचे आपण क्रिस्पी पापड तयार करू शकता. ही वाळवणाची रेसिपी तशी सोपी. शिवाय कमी वेळात, कमी मेहनत घेता ही रेसिपी तयार होते. जर रात्रीचा भात जास्त प्रमाणात उरला असेल तर, ही रेसिपी नक्कीच करून पाहा. कुरकुरीत पापड प्रत्येकाला आवडतील(How to make rice papad recipe with leftover rice).

उरलेल्या भाताचे पापड करण्यासाठी लागणारं साहित्य

उरलेला भात

जिरं

चिली फ्लेक्स

ना उडीद डाळ -ना सोडा; १५ मिनिटात करा इन्स्टंट मेदू वडे; ऑथेटिंक चव, क्रिस्पी वडे

मीठ

कृती

सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात उरलेला भात काढून घ्या. त्यात गरजेनुसार पाणी घालून गुळगुळीत पेस्ट तयार करा. ज्याप्रमाणे डोश्याचं बॅटर करताना ज्यापद्धतीने पीठ दळतो, त्याप्रमाणे गुळगुळीत पेस्ट तयार करा. तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात एक चमचा जिरं, चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.

केस प्रचंड गळतात? पांढरेही होतात? कपभर कडीपत्त्याचा १ सोपा उपाय; केस होतील इतके दाट की..

आता प्लास्टिकच्या पेपरला थोडे ब्रशने तेल लावा. चमचाभर बॅटर ओतून पसरवा. कडकडीत उन्हात किंवा पंख्याच्या हवेखाली पापड वाळवून घ्या. अशा प्रकारे उरलेल्या भाताचे पापड रेडी. जेव्हा इच्छा होईल तेव्हा आपण हे पापड तळून खाऊ शकता. तेलात तळताच हे पापड दुप्पट फुलतात, शिवाय खायला कुरकुरीत चविष्ट लागतात. 

Web Title: How to make rice papad recipe with leftover rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.