Lokmat Sakhi >Food > मेदू वडे फसतात - क्रिस्पी होत नाही? डाळ वाटताना त्यात घाला बर्फाचे तुकडे; मेदू वडे होतील परफेक्ट

मेदू वडे फसतात - क्रिस्पी होत नाही? डाळ वाटताना त्यात घाला बर्फाचे तुकडे; मेदू वडे होतील परफेक्ट

Trick to make perfect medu vada || hotel style crispy medu vada : अण्णाच्या स्टॉलवर मिळतो तसा परफेक्ट मेदूवडा करण्याची सोपी कृती..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2024 12:06 PM2024-05-14T12:06:45+5:302024-05-14T14:54:38+5:30

Trick to make perfect medu vada || hotel style crispy medu vada : अण्णाच्या स्टॉलवर मिळतो तसा परफेक्ट मेदूवडा करण्याची सोपी कृती..

Trick to make perfect medu vada || hotel style crispy medu vada | मेदू वडे फसतात - क्रिस्पी होत नाही? डाळ वाटताना त्यात घाला बर्फाचे तुकडे; मेदू वडे होतील परफेक्ट

मेदू वडे फसतात - क्रिस्पी होत नाही? डाळ वाटताना त्यात घाला बर्फाचे तुकडे; मेदू वडे होतील परफेक्ट

साऊथ इंडिअन पदार्थ सर्वांनाच आवडतात (Medu Vada). इडली, डोसा, मेदू वडे, अप्पे त्यासोबत चटणी आणि सांबार अप्रतिम लागते. या सगळ्यात सर्वात जास्त आवडणारा पदार्थ म्हणजे मेदू वडे (Cooking Tips). आतून सॉफ्ट बाहेरून कुरकुरीत मेदू वडे कोणाला नाही आवडत. पण घरी तयार करताना मेदू वडे मनासारखे तयार होत नाही. कधी पीठ बिघडतं तर कधी करण्याची पद्धत चुकते.

मेदू वडे करायला सोपे वाटतात, पण साहित्यांचे प्रमाण चुकलं तर, अशावेळी मेदू वडे फसतात. जर आपल्याला घरच्या घरी अण्णाच्या स्टॉलवर मिळतात तसे मेदू वडे घरी करायचे असतील तर, एकदा या रेसिपीला फॉलो करा. पीठ वाटताना त्यात बर्फाचे तुकडे घाला. मेदू वडे परफेक्ट फ्लफी आणि कुरकुरीत तयार होतील(Trick to make perfect medu vada || hotel style crispy medu vada).

साऊथ इंडिअन स्टाईल मेदू वडे करण्यासाठी लागणारं साहित्य

उडीद डाळ

हिरवी मिरची

जिरं

आलं

किलोभर लसूण सोलण्याची युनिक ट्रिक! फक्त अर्धा चमचा बेकिंग सोड्याचा वापर कसा करावा, पाहा..

बर्फाचे तुकडे

पाणी

तेल

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये २ वाटी उडीद डाळ घ्या. त्यात २ कप पाणी घालून डाळ धुवून घ्या. डाळ धुवून झाल्यानंतर त्यात २ कप पाणी घाला आणि त्यावर झाकण ठेवा. ५ ते ६ तासांसाठी डाळ भिजत ठेवा.

व्यायाम-डाएट करूनही वजन कमी होईना? जेवण करण्याची पाहा योग्य पद्धत; वेट लॉस की गॅरण्टी

६ तासानंतर मिक्सरच्या भांड्यात भिजलेली उडीद डाळ घाला. नंतर त्यात बर्फाचे काही तुकडे घालून वाटून घ्या. तयार गुळगुळीत पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर हातानेच फेटून घ्या. यामुळे मेदू वडे फ्लफी तयार होतील. आता त्यात चवीनुसार मीठ, चमचाभर जिरं, ठेचलेली हिरवी मिरची आणि आलं, व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हाताने मिक्स करा.

दुसरीकडे कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात तेल घाला. आता फ्राईंग चमचा अर्थात झाऱ्याला फॉइल पेपर लावून कव्हर करा. त्यावर हाताने थोडे पाणी लावा. थोडं बॅटर चमच्यावर ठेवा आणि त्याला मेदू वड्याचा आकार द्या. हळुवारपणे गरम तेलात सोडा, व दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्या. अशा प्रकारे मेदू वडे खाण्यासाठी रेडी.

Web Title: Trick to make perfect medu vada || hotel style crispy medu vada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.