Lokmat Sakhi >Beauty > केस प्रचंड गळतात? पांढरेही होतात? कपभर कडीपत्त्याचा १ सोपा उपाय; केस होतील इतके दाट की..

केस प्रचंड गळतात? पांढरेही होतात? कपभर कडीपत्त्याचा १ सोपा उपाय; केस होतील इतके दाट की..

1 way to use curry leaves for voluminous hair : केसांच्या वाढीसाठी कडीपत्त्याचा वापर कसा करावा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2024 06:24 PM2024-04-01T18:24:15+5:302024-04-01T18:25:18+5:30

1 way to use curry leaves for voluminous hair : केसांच्या वाढीसाठी कडीपत्त्याचा वापर कसा करावा?

1 way to use curry leaves for voluminous hair | केस प्रचंड गळतात? पांढरेही होतात? कपभर कडीपत्त्याचा १ सोपा उपाय; केस होतील इतके दाट की..

केस प्रचंड गळतात? पांढरेही होतात? कपभर कडीपत्त्याचा १ सोपा उपाय; केस होतील इतके दाट की..

लांबसडक, घनदाट, काळेभोर केस कोणाला नाही आवडत (Hair Care Tips). केसांची शोभा वाढवण्यासाठी त्यांची निगा राखणं गरजेचं आहे. आजकालच्या केमिकल रसायनयुक्त उत्पादनांमुळे केस आणखीन खराब होतात. शिवाय केसांना पोषण मिळाले नाही तरी, कमकुवत होऊ शकतात (Hair Growth). केसांवर उत्पादनांचा खर्च करण्यापेक्षा आपण नैसर्गिक साहित्यांचा वापर करूनही केसांची निगा राखू शकता (Curry Leaves).

केसांच्या आरोग्यासाठी कडीपत्ता प्रभावी मानली जाते. कडीपत्त्यात अनेक जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. जे केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. शिवाय त्यात अनेक खनिजे आणि पोषक घटक असतात. जे केस मजबूत करण्यास मदत करतात. पण केसांसाठी कडीपत्त्याचा वापर कसा करावा? याचे केसांसाठी असणारे फायदे किती?(1 way to use curry leaves for voluminous hair).

कडीपत्त्याचे केसांसाठी होणारे फायदे

केसांसाठी पोषक

कडीपत्त्यात जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. जे केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. त्यात खनिजे आणि पोषक घटक असतात जे केस मजबूत करण्यास मदत करतात.

महागडे डी-टॅन कशाला? बेसनात मिसळा २ गोष्टी; चेहरा होईल क्लिन-दिसेल नैसर्गिक चमक

केसांची वाढ

कढीपत्त्यात आढळणारे बीटा-कॅरोटीन आणि मुबलक अँटीऑक्सिडंट केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात, ज्यामुळे केस अधिक मजबूत होतात.

केस काळे होतात

कडीपत्त्याचा वापर केसांसाठी केल्याने अनेक समस्या सुटतात. त्यात व्हिटॅमिन सी आणि बी, प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. कडीपत्त्यामुळे स्काल्पच्या रक्ताभिसरणाला चालना मिळते. ज्यामुळे नवीन केस आणि पांढरे केस काळे करण्यास मदत मिळते.

केस मुलायम होतात

कडीपत्त्यात असलेले खनिजे आणि पोषक घटक केसांना मुलायम आणि चमकदार बनविण्यास मदत करतात.

केसांना तेल-मास्क लावूनही वाढ होत नाही? आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश; मुळे आतून मजबूत होतील

दही-कडीपत्ता हेअरमास्क

केसांच्या वाढीसाठी आपण दही-कडीपत्त्याचा हेअरमास्क वापरू शकता. यासाठी मिक्सरच्या भांड्यात कडीपत्त्याची पानं घालून पेस्ट तयार करा. एका भांड्यात कडीपत्त्याची पेस्ट काढून घ्या. त्यात दोन ते तीन चमचे दही मिक्स करा. तयार मिश्रण स्काल्पवर आणि केसांना लावा.

Web Title: 1 way to use curry leaves for voluminous hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.