lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > केसांना तेल-मास्क लावूनही वाढ होत नाही? आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश; मुळे आतून मजबूत होतील

केसांना तेल-मास्क लावूनही वाढ होत नाही? आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश; मुळे आतून मजबूत होतील

Iron-Copper for Hair Growth & Hair Health : केसगळती कमी करण्यासाठी 'या' गोष्टींचा आहारात समावेश करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2024 10:10 AM2024-03-27T10:10:50+5:302024-03-27T10:15:02+5:30

Iron-Copper for Hair Growth & Hair Health : केसगळती कमी करण्यासाठी 'या' गोष्टींचा आहारात समावेश करा

Iron-Copper for Hair Growth & Hair Health | केसांना तेल-मास्क लावूनही वाढ होत नाही? आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश; मुळे आतून मजबूत होतील

केसांना तेल-मास्क लावूनही वाढ होत नाही? आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश; मुळे आतून मजबूत होतील

हल्ली केसांविषयी अनेक जणांच्या तक्रारी वाढल्या आहेत. कोणाचे केस गळतात, तर कोणाच्या केसात कोंडा, तर कोणाचे केस कमी वयात पांढरे होतात (Hair Growth). जीवनशैलीत बदल किंवा रासायनिक उत्पादनांमुळे केसांचे नुकसान होते. याशिवाय आहाराचा देखील केसांवर परिणाम होतो (Hair Care Tips).

केस गळण्यामागे अनेक कारणे असू शकतात. ज्यात शरीरात पोषणाची कमतरता, तणाव आणि हार्मोनल असंतुलनामुळे केसांची वाढ खुंटते (Hair Growth Diet).  यावर उपाय म्हणून आपण आपल्या आहारात आयर्न आणि कॉपर रिच पदार्थांचा समावेश करू शकता. परंतु, आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा? याची माहिती आहारतज्ज्ञ मनप्रीत यांनी दिली आहे(Iron-Copper for Hair Growth & Hair Health).

केस गळती कमी करण्यासाठी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा?

- केस गळण्याचे मुख्य कारण शरीरात आयर्न आणि कॉपरची कमतरता असू शकते.

कंबर-मंड्या-पोट सुटलं? आयुर्वेदात सांगितलेल्या ६ गोष्टी फॉलो करा; वजन घटेल-दिसाल सुपरफिट

- केसगळती कमी करण्यासाठी अनेकदा लोक त्यांच्या आहारात आयर्नयुक्त पदार्थांचा समावेश करतात. पण केवळ हे फायदेशीर नाही. केसांची बाहेरून देखील योग्य निगा राखायला हवी.

- आपल्या पेशींना ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम हिमोग्लोबिन करते. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आयर्न गरजेचं. आयर्नच्या कमतरतेमुळे केस कमकुवत आणि निर्जीव होतात आणि गळू लागतात.

- शरीरातील आयर्नच्या कमतरतेवर मात करण्यासाठी खजूर, डाळिंब, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, काळे मनुके आणि मोरिंगा यांचा आहारात समावेश करा.

- आपण आपल्या आहारात डाळिंबाच्या रसाचा देखील समावेश करू शकता.

- याशिवाय सफरचंद, गाजर आणि बीटरूटचा रस देखील शरीरातील आयर्नची कमतरता भरून काढते.

मेहनत घेऊनही वजन घटत नाही? सकाळी ४ गोष्टी महिनाभर करा; पोट - मांड्या सगळंच कमी होईल

- आपण ड्रायफ्रुट्सने देखील शरीरातील आयर्नची कमतरता दूर करू शकता. आहारात बदाम, काजू, पिस्ता, तीळ, भोपळ्याच्या बिया, मशरूम आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करा. यात कॉपर देखील आढळते.

Web Title: Iron-Copper for Hair Growth & Hair Health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.