lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > कपभर तांदुळाच्या पीठाचे करा चौपट फुलणारे कुरकुरीत पापड; कुकरच्या एका शिट्टीत-पापड होतील झटपट

कपभर तांदुळाच्या पीठाचे करा चौपट फुलणारे कुरकुरीत पापड; कुकरच्या एका शिट्टीत-पापड होतील झटपट

How to make " Rice Flour Papad" Recipe : कुकरच्या एका शिट्टीत तांदुळाचे खिचीया पापड करण्याची सोपी कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2024 11:27 AM2024-02-29T11:27:34+5:302024-02-29T11:29:48+5:30

How to make " Rice Flour Papad" Recipe : कुकरच्या एका शिट्टीत तांदुळाचे खिचीया पापड करण्याची सोपी कृती

How to make " Rice Flour Papad" Recipe | कपभर तांदुळाच्या पीठाचे करा चौपट फुलणारे कुरकुरीत पापड; कुकरच्या एका शिट्टीत-पापड होतील झटपट

कपभर तांदुळाच्या पीठाचे करा चौपट फुलणारे कुरकुरीत पापड; कुकरच्या एका शिट्टीत-पापड होतील झटपट

उन्हाळा सुरु होताच महिलांची वाळवणं करण्यासाठी लगबग सुरु होते. पापड, कुरडई, सांडगे यासह इतर पदार्थ आवर्जून केले जातात. जेवताना तोंडी लावण्यासाठी आपण हे कुरकुरीत पदार्थ आवर्जून तयार करून खातो. काही लोकं वेळ काढून पापड तयार करतात. पण ज्यांना धकाधकीच्या जीवनातून वेळ मिळत नाही, ते लोकं विकतचे पापड आणतात (Summer Special Papad).

जर आपल्याला कमी वेळात झटपट पापड तयार करायच्या असतील तर, तांदुळाचे पापड तयार करा. तेलात तळताच हे पापड दुप्पट फुलतात, शिवाय काही मिनिटात तयार होतात (Cooking Tips). यासह साठवून ठेवल्यास वर्षभरही टिकतात (Rice Flour Papad). जर आपल्याला घरच्याघरी झटपट तांदुळाचे पापड तयार करायच्या असतील तर, प्रेशर कुकरच्या एका शिट्टीत ही रेसिपी नक्कीच करून पाहा(How to make " Rice Flour Papad" Recipe).

तांदुळाचे पापड करण्यासाठी लागणारं साहित्य

तांदुळाचं पीठ

पाणी

पापड खार

जिरे

घरी केलेले वेफर्स काळे पडतात? यंदा उन्हाळ्यात करा पांढरेशुभ्र वेफर्स, पाहा ही युक्ती

तीळ

मीठ

कृती

सर्वप्रथम, एका भांड्यात २ कप पाणी घालून गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात एक चमचा पापड खार आणि मीठ घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. आता प्रेशर कुकरच्या भांड्यात एक कप तांदुळाचं पीठ घाला. त्यानंतर त्यात एक चमचा तीळ, जिरं आणि गरम पाणी ओतून मिक्स करा.

दुसरीकडे प्रेशर कुकरमध्ये पाणी घाला. त्याच्या आत स्टॅण्ड ठेवा, व स्टॅण्डवर कुकरचं भांडं ठेवून त्यावर झाकण ठेवा. नंतर कुकरचं झाकण लावा. गॅस मध्यम आचेवर ठेवा, व एक शिट्टी आल्यानंतर गॅस बंद करा. कुकर थंड झाल्यानंतर झाकण उघडून भांडं बाहेर काढा. तांदुळाचे तयार पीठ एका प्लास्टिकवर काढून ठेवा, व लाटण्याने पीठ मळून घ्या. पीठ मळून झाल्यानंतर त्याचे गोळे तयार करा.

अरे बापरे भाजी करपली? ४ टिप्स; भाजी फेकण्याची वेळच येणार नाही

प्लास्टिकला थोडे तेल लावा, व त्यावर पिठाचा छोटा गोळा ठेवून प्लास्टिकने कव्हर करा, व त्यावर प्लेट ठेवून हलका दाब द्या. अशारित्या न लाटता पिठाला गोलाकार येईल. आपण हे पापड फॅनखाली देखील वाळत घालू शकता. पापड सुकल्यानंतर आपण हवाबंद डब्यात साठवून ठेवू शकता. अशा प्रकारे कपभर तांदुळाच्या पीठाचे पापड रेडी.

Web Title: How to make " Rice Flour Papad" Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.