हिवाळ्याच्या दिवसांत तळलेले पदार्थ बरेच खाण्यात येत असतात. त्यात सण उत्सव म्हटलं की पुरी, भाजी असे पदार्थ आलेच. पण तळलेल्या पुऱ्या बरेचजण खाणं टाळतात कारण आरोग्यासाठी ते फारसं चांगलं नसतं. सध्या लोक ऑईल फ्री पुऱ्यासुद्धा बनवत आहेत. (How To Make Puri In Cooker Without Using Oil)
कुकरमध्ये मऊसूत आणि वरून टम्म फुगलेल्या पुऱ्या करणं एकदम सोपं आहे. ऐकायला नवीन वाटत असलं तरी सध्या कुरकमध्ये पुरी करण्याचा ट्रेंड सुरू आहे. साधारणपणे लोक कढईत तेल घालून पुऱ्या तळतात पण ही पद्धत एकदम नवीन आहे. कुकरमध्ये पुरी करण्याची सोपी पद्धत पाहूया. (Special Trick Make Puri In Cooker Without Using Oil)
सगळ्यात आधी एका भांड्यात २ कप गव्हाचं पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ घाला. १ चिमूट ओवा घाला. हळूहळू पाण्याचा अंदाज घेत कमी पाणी घालून घट्ट कणीक मळून घ्या. हे पीठ १० ते १५ मिनिटांसाठी तसंच झाकून ठेवा. नंतर कणकेचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्या आणि पुरीच्या आकारात लाटून घ्या. पुरी लाटताना खूप पातळ लाटू नका.
कुकरचा वापर कसा करावा?
कुकरमध्ये १ ते २ ग्लास पाणी घाला. त्यावर एक स्टॅण्ड ठेवा. नंतर एक अशी प्लेट घ्या जी कुकरमध्ये सहज मावेल. या प्लेटला तेल लावून घ्या. जेणेकरून पुऱ्या चिकटणार नाहीत. या प्लेटवर पुऱ्या ठेवा आणि आणि कुकरमधल्या स्टॅण्डवर ही प्लेट ठेवा. नंतर कुकरचं झाकण बंद करा आणि शिट्टी काढून टाका. त्यानंतर ३ ते ५ मिनिटं शिजू द्या. वाफेमुळे पुऱ्या व्यवस्थित फुलतील आणि छान शिजतील. वाफ निघाल्यानंतर झाकण उघडून तुम्ही पुऱ्या सर्व्ह करू शकता.
आईच्या जुन्या साडीचा शिवा सुंदर अनारकली ड्रेस; १२ पॅटर्न्स, साध्या ड्रेसमध्ये युनिक लूक मिळेल
जर तुम्ही पुऱ्या तळण्याऐवजी कुकरमध्ये वाफवून घेतल्या तर आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. यात तेलाचा वापर नगण्य असतो. ज्यामुळे कॅलरीज कमी होतात आणि पचायला हलके असते. काही लोक कढईऐवजी कुकरचा वापर करतात.
हॉटेलस्टाईल शाही पनीर घरच्याघरी करा; ८ टिप्स, जेवणाला झटपट बनेल चवदार शाही पनीर
कुकरचा आकार उंच असल्यामुळे तेल उडण्याची भिती कमी असते. गरम तेल उडून गॅस किंवा ओटा खराब होत नाही. कुकरचे तोंड कढईपेक्षा अरूंद असू शकते. यामुळे एकावेळी जास्त पुऱ्या न टाकता एक-एक पुरी तळणं सोयीचे ठरते.
