lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > गुढीपाडवा स्पेशल : कमीतकमी तेलात बघा कशा तळायच्या टम्म फुगणाऱ्या पुऱ्या! एवढ्याशा तेलात तळा भरपूर पुऱ्या

गुढीपाडवा स्पेशल : कमीतकमी तेलात बघा कशा तळायच्या टम्म फुगणाऱ्या पुऱ्या! एवढ्याशा तेलात तळा भरपूर पुऱ्या

How To Make Poori With Minimum Oil: गुढीपाडव्याला श्रीखंड पुरीचा बेत करणार असाल तर पुऱ्या खूप जास्त तेलकट होऊ नये म्हणून काही गोष्टी पाहून ठेवा. (Gudhi padva 2024 special recipe)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2024 09:18 AM2024-04-07T09:18:47+5:302024-04-08T13:46:23+5:30

How To Make Poori With Minimum Oil: गुढीपाडव्याला श्रीखंड पुरीचा बेत करणार असाल तर पुऱ्या खूप जास्त तेलकट होऊ नये म्हणून काही गोष्टी पाहून ठेवा. (Gudhi padva 2024 special recipe)

How to make poori with minimum oil, puri recipe using little oil, how to make oil free pooris | गुढीपाडवा स्पेशल : कमीतकमी तेलात बघा कशा तळायच्या टम्म फुगणाऱ्या पुऱ्या! एवढ्याशा तेलात तळा भरपूर पुऱ्या

गुढीपाडवा स्पेशल : कमीतकमी तेलात बघा कशा तळायच्या टम्म फुगणाऱ्या पुऱ्या! एवढ्याशा तेलात तळा भरपूर पुऱ्या

Highlightsत्यासाठी नेमकं काय करायचं आणि काय नाही करायचं ते पाहा...

गुढीपाडव्याच्या सणाला सगळ्यात जास्त मान असतो तो श्रीखंड पुरीचा. त्यामुळे एरवी तेलकट होतात म्हणून जे लोक पुऱ्या करणं टाळतात, ते सुद्धा गुढीपाडव्याच्या दिवशी हमखास पुरीचा बेत करताना दिसतात. पुऱ्या तेलकट होऊ नयेत म्हणून काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. साध्या- सोप्या टिप्स पाहिल्या तर पुऱ्या नक्कीच कमी तेलात तळल्या जातील शिवाय छान खुसखुशीत होतील (poori recipe using little oil). त्यासाठी नेमकं काय करायचं आणि काय नाही करायचं ते पाहा...(How to make poori with minimum oil)

 

पुऱ्या जास्त तेलकट होऊ नयेत म्हणून काय करावं?

१. पुऱ्या जास्त तेलकट होऊ नये म्हणून कणिक घट्ट भिजवा. सैलसर कणिक असेल तर पुऱ्या जास्त तेल पितात.

कोण म्हणतं श्रीखंड करायला खूप वेळ लागतो? बघा ५ मिनिटांत कसं करायचं पातेलंभर श्रीखंड

२. पुऱ्या करण्यासाठी जे गव्हाचं पीठ घ्याल त्यात थोडा रवादेखील घाला. साधारण १ वाटी गव्हाचं पीठ असेल तर त्यात एक ते दिड चमचा रवा घाला. यामुळे कमी तेल लागेल, शिवाय पुऱ्या खुसखुशीत होतील.

गुढीपाडवा विशेष: मराठी नववर्षाची सुरुवात गोड करणारे ६ पारंपरिक पदार्थ; यातला तुमच्या आवडीचा कोणता?

३. पुऱ्या करताना भिजवलेलं पीठ जास्त वेळ झाकून ठेवू नका. ५ ते ७ मिनिटे झाकून ठेवलं तरी ते पुरेसं आहे. 

 

४. पुऱ्या नेहमी लहान आकाराच्या आणि जाडसर लाटा. यामुळे तेल कमी लागेल आणि पुऱ्या छान टम्म फुगतील.

लग्नात डिझायनर महागडे लेहेंगे टाळणाऱ्या ७ बॉलीवूड अभिनेत्री, पाहा नवरी अशी नटली की..

५. पुऱ्या तळण्यासाठी नेहमी लहान आकाराची कढई वापरा. यामुळे कमी तेलात जास्त पुऱ्या तळून होतील. शिवाय गॅसचीही बचत होईल.

६. हल्ली बाजारात फ्राय पावडर मिळतं. ते तेलामध्ये टाकल्याने पुऱ्या खूप कमी तेल पितात. ते वापरून पाहायलाही हरकत नाही. 

 

Web Title: How to make poori with minimum oil, puri recipe using little oil, how to make oil free pooris

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.