Join us

१ वाटी रव्याचे करा खमंग मेदूवडे; डाळ न दळता-न भिजवता पटकन होईल मेदूवड्यांचा बेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 18:41 IST

How to Make Poha Rava Meduvada : डाळ न दळता, न भिजवता पोहे आणि बटाटे वापरून तुम्ही क्रिस्पी वडे बनवू शकता.

मेदू वडे घरी बनवायचं म्हणजे अनेकजण कंटाळा करतात. मेदूवडे घरी करण्यासाठी  डाळ दळा, भिजवा ही सगळी प्रक्रिया करावी लागते. इतका वेळ नसल्यामुळे अनेकजण बाहेरून मेदूवडे मागवून  खातात. (How to Make Meduvada At Home) मेदूवडे करण्यासाठी तुम्हाला फार साहित्य लागणार नाही. (Breakfast Recipe)

डाळ न दळता, न भिजवता पोहे आणि बटाटे वापरून तुम्ही क्रिस्पी वडे बनवू शकता. मेदू वड्यांची सोपी रेसिपी पाहूया. (Poha Medu Vada) मुलांना शाळेत डब्यात देण्यासाठी किंवा दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाला खाण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

इस्टंट मेदू वडा कसा करायचा (How To Make Medu Vada)

१) पोहे-  अर्धी वाटी

२) रवा- १ वाटी

३) उकडलेले बटाटे- अर्धा कप

४) योगर्ट - १ कप

५) सॉल्ट- १ टिस्पून

६) हिरव्या मिरचीची  पेस्ट - १ टिस्पून

७) आलं- अर्धा टिस्पून

८) कढीपत्ते- १० ते १२ पानं

९) कोथिंबीर- १ टिस्पून

१०) काळी मिरी पावडर- १ टिस्पून

११) बेकिंग सोडा- १ टिस्पून

पोह्यांचे मेदू वडे करण्याची लागणारं साहित्य  (Instant Medu Vada Recipe)

१) सगळ्यात आधी पोहे दळून एका ताटात काढून घ्या, त्यात कपभर रवा घाला, १ कप दही घालून चमच्याच्या साहाय्याने मिश्रण एकजीव करून घ्या.  चवीनुसार मीठ आणि उकडून मॅश केलेले बटाटे त्यात घाला.

कोण म्हणतं शिळं खाऊ नये; तज्ज्ञ सांगतात नाश्त्याला शिळी चपाती खाण्याचे ५ जबरदस्त फायदे

२) हिरव्या मिरचीची पेस्ट, आलं पेस्ट, कढीपत्ता घालून मिश्रण एकजीव करून घ्या, कोथिंबीर, काळी मिरी घालून एकजीव करून घ्या.  बेकिंग सोडा घालून सर्व पदार्थ एकजीव करून गोळा तयार करून घ्या. 

थकवा येतो-अंगदुखी जाणवते? मॅग्नेशियमने खच्चून भरलेत ७ पदार्थ, रोज खा-निरोगी राहाल रक्त वाढेल

३) हाताला तेल लावून त्यावर मेदू वड्याचे पीठ घेऊन व्यवस्थित गोलाकार थापून  घ्या. तेल गरम करून तेल त्यात एकामागोमाग एक वडे घालून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. १० मिनिटांत गरमागरम मेदू वडे तयार होतील.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स