lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > आपण खाताय ते पोही हेल्दी आहेत? वेट लॉससह इतर फायदे हवे असतील तर, पोहे 'या' तेलात करा..

आपण खाताय ते पोही हेल्दी आहेत? वेट लॉससह इतर फायदे हवे असतील तर, पोहे 'या' तेलात करा..

How to make poha for a low calorie breakfast : पोहे करताना लक्षात ठेवा ६ गोष्टी; हेल्दी पोह्यांचं सुपर सिक्रेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2024 05:00 PM2024-03-31T17:00:07+5:302024-03-31T17:01:33+5:30

How to make poha for a low calorie breakfast : पोहे करताना लक्षात ठेवा ६ गोष्टी; हेल्दी पोह्यांचं सुपर सिक्रेट

How to make poha for a low calorie breakfast | आपण खाताय ते पोही हेल्दी आहेत? वेट लॉससह इतर फायदे हवे असतील तर, पोहे 'या' तेलात करा..

आपण खाताय ते पोही हेल्दी आहेत? वेट लॉससह इतर फायदे हवे असतील तर, पोहे 'या' तेलात करा..

धावपळीच्या जीवनात सकाळी नाश्ता तयार करण्याची घाई प्रत्येकाला असते. अशावेळी झटपट आणि चविष्ट पोहे (Pohe Recipe) तयार करण्याव्यतिरिक्त उत्तम पर्याय उरत नाही. पोहे खाण्याचे अनेक फायदे आहेत. हे  चवदार असण्यासोबतच आरोग्यदायी देखील आहे. पोहे ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध डिश आहे. अनेक घरांमध्ये पोहे विविध प्रकारे केले जातात.

अनेकजण आपल्या रोजच्या आहारात पोह्यांचे सेवन नक्कीच करतात (Breakfast). पण जर आपण चुकीच्या पद्धतीने याचे सेवन करत असाल तर, वजन वाढण्यासोबत शरीरासाठी हानिकारक ठरू शकते (Healthy Tips). त्यामुळे पोह्याला हेल्दी पद्धतीने बनवा. पोहे तयार करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्याने, साधे पोहे देखील कैक पटीने हेल्दी तयार होतील(How to make poha for a low calorie breakfast).

पोह्यात प्रोटीन मिक्स करा

पोहे हा एक हलका आहार आहे. ज्यामुळे आपल्याला लंचपर्यंत भूक लागू शकते. जर पोहे हेल्दीसोबत टेस्टी लागावे असे वाटत असेल तर, त्यात प्रोटीन मिक्स करा. त्यात किसलेले चीज, पनीर, टोफू किंवा स्प्राउट्स घालून मिक्स करा. या पदार्थांमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे अधिक वेळ भूक लागत नाही. शिवाय वेट लॉससाठीही मदत होईल.

अर्धा लिटर दूध-३ ब्रेड स्लाइज, थंडगार व्हॅनिला आईस्क्रीमची सोपी कृती; १५ मिनिटात आईस्क्रीम तयार..

मीठ आणि साखर कमी प्रमाणात मिक्स करा

अनेकांना पोह्यामध्ये मीठ आणि साखर घालण्याची सवय असते. पण पोह्यामध्ये जास्त प्रमाणात मीठ किंवा साखर मिसळू नका. यामुळे पचन बिघडू शकते. निरोगी पर्यायासाठी, आपण रॉक मिठाचा वापर करू शकता. आणि गोडपणासाठी, आपण त्यात मध मिक्स करू शकता. यामुळे त्याची चव आणि पोषक दोन्ही गोष्टी वाढतील.

भाज्या मिक्स करा

पोहे हेल्दी बनवण्यासाठी त्यात जास्तीत जास्त भाज्या घाला. भाज्यांमध्ये फायबर असते. ज्यामुळे पोटाचे विकार दूर राहतात. आपण त्यात आपल्या आवडीच्या कितीही प्रमाणात भाजी घालून मिक्स करू शकता. यामुळे शरीराला  पौष्टीक घटक मिळतील.

ड्रायफ्रुट्स घाला

पोह्यांमध्ये ड्रायफ्रुट्स घालून मिक्स करा. ड्रायफ्रुट्समधून शरीराला हेल्दी फॅट्स मिळतील. शिवाय इतर पौष्टीक घटक मिळतील. आपण त्यात काजू, बदाम आणि शेंगदाणे घालू शकता.

कपभर रव्याचे करा ५० पळी पापड, तेलात फुलतात दुप्पट; करायला सोपे-टिकतात भरपूर

हेल्दी कुकिंग ऑइल वापरा

पोहे बनवण्यासाठी कोणते तेल वापरावे हे बहुतेकांना माहीत नाही. जर आपण पोहे बनवताना चुकीचे तेल वापरत असाल तर, त्यातील पोषक घटक शरीराला पुरेपूर मिळणार नाही. त्यामुळे पोहे तयार करताना खोबरेल, ऑलिव्ह किंवा मोहरीचे तेल वापरा. यासह पोहे बनवताना कमी तेलाचा वापर करा.

पोह्यात लिंबाचा रस मिक्स करा

पोहे तयार करताना त्यात लिंबाचा रस घातल्याने त्याची चव वाढते. यासोबत आपल्याला व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळते.  जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. जर आपण चहा-कॉफीसोबत पोहे खात असाल तर त्यात लिंबू घालू नका. 

Web Title: How to make poha for a low calorie breakfast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.