Lokmat Sakhi >Food > पराठा कोणताही असो मसाला घाला एकच! चिमूटभर मसाला पराठा करेल टेस्टी, शाळेचा डबा संपेल पटकन...

पराठा कोणताही असो मसाला घाला एकच! चिमूटभर मसाला पराठा करेल टेस्टी, शाळेचा डबा संपेल पटकन...

Tips To Make Masala Mix For Tasty Paratha : Homemade Dry Masala Powder For Paratha : How to make Paratha Masala Powder At Home : काहीवेळा भरपूर मेहनत करुन पराठे केले तरीही त्याला हवी तशी चव येत नाही, अशावेळी त्यात मिक्स करा होममेड सिक्रेट मसाला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2025 18:00 IST2025-03-04T15:12:54+5:302025-03-04T18:00:21+5:30

Tips To Make Masala Mix For Tasty Paratha : Homemade Dry Masala Powder For Paratha : How to make Paratha Masala Powder At Home : काहीवेळा भरपूर मेहनत करुन पराठे केले तरीही त्याला हवी तशी चव येत नाही, अशावेळी त्यात मिक्स करा होममेड सिक्रेट मसाला...

How to make Paratha Masala Powder At Home Tips To Make Masala Mix For Tasty Paratha Homemade Dry Masala Powder For Paratha | पराठा कोणताही असो मसाला घाला एकच! चिमूटभर मसाला पराठा करेल टेस्टी, शाळेचा डबा संपेल पटकन...

पराठा कोणताही असो मसाला घाला एकच! चिमूटभर मसाला पराठा करेल टेस्टी, शाळेचा डबा संपेल पटकन...

'पराठा' हा असा पदार्थ आहे की जो आपण सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही खाऊ शकतो. रोजच्या चपातीचा कंटाळा आला की आपण काहीतरी वेगळं म्हणून पराठा (How to make Paratha Masala Powder At Home) करतो. पराठ्यांचे अनेक प्रकार असतात. काहीवेळा आपण भाज्या चिरुन त्या कणकेत मिक्स करुन पराठे करतो तर कधी स्टफिंग बनवून ते कणकेत भरुन त्याचे पराठे करतो. अशा अनेक पद्धतींनी पराठे तयार करता येतात(Homemade Dry Masala Powder For Paratha).

 वेगवेगळ्या पद्धतींनी पराठ्यांचे अनेक प्रकार तयार करता येत असले तरीही, ते चवीला स्वादिष्ट असणे गरजेचे असते. पराठे हा अगदी झटपट होणारा पदार्थ असला तरीही काहीवेळा पराठ्यांची चव पाहिजे तशी लागत नाही. अशावेळी ते पराठे आवडीने खाल्ले जात नाही. यासाठीच आपण घरच्याघरी पटकन तयार होणारा आणि दीर्घकाळ टिकणारा पराठ्यांसाठीचा मसाला तयार करुन ठेवू शकतो. हा चिमूटभर मसाला पराठ्यांच्या स्टफिंगमध्ये घातला तर पराठे टेस्टी लागतात. पराठे अधिक स्वादिष्ट (Tips To Make Masala Mix For Tasty Paratha) होण्यासाठी हा मसाला कसा तयार करायचा त्याची रेसिपी पाहूयात. 

साहित्य :- 

१. धणे - १ टेबलस्पून 
२. जिरे -  १ टेबलस्पून 
३. बडीशेप -  १ टेबलस्पून 
४. काळीमिरी -  १ टेबलस्पून 
५. लवंग - ५ ते ६ लवंग काड्या 
६. काश्मिरी लाल सुकी मिरची - १० ते १२ सुक्या मिरच्या 
७. हिंग - १/२ टेबलस्पून 
८. आमचूर पावडर - १ टेबलस्पून 
९. काळे मीठ - १ टेबलस्पून 
१०. साधे मीठ -  १ टेबलस्पून 

वाळवणाचे पदार्थ करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' १० गोष्टी, पदार्थ न फसता-वर्षभर टिकतील चांगले..


अरे देवा ! पॅनमध्ये बटर घालताच करपते - जळका वास येतो? ६ टिप्स, बटर न जळता स्वाद होईल दुप्पट...

कृती :- 

१. सगळ्यांत आधी एक पॅन घेऊन त्यात धणे, जिरे, बडीशेप घालून हलकेच ३ ते ४ मिनिटे मंद आचेवर कोरडे भाजून घ्यावेत. 
२. आता यात लवंग काड्या आणि काळीमिरी घालावी. त्यानंतर ५ ते ६ मिनिटे येऊ सगळे जिन्नस मंद आचेवर कोरडे भाजून घ्यावेत. 
३. त्यानंतर गॅस बंद करून त्यात काश्मिरी लाल सुक्या मिरच्या घालाव्यात. त्यानंतर हे मिश्रण थोडे थंड होऊ दयावे. 

४. मिश्रण थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात हे भाजलेले मिश्रण घेऊन ओतावे. 
५. त्यानंतर या मिक्सर जारमध्ये हिंग, आमचूर पावडर, काळे मीठ, साधे मीठ घालून सगळे जिन्नस मिक्सर फिरवून एकत्रित बारीक करून घ्यावेत. 
६. मिक्सरमधील सगळे जिन्नस व्यवस्थित वाटून त्याची थोडी जाडसर भरड करून घ्यावी.

आपला पराठा मसाला वापरण्यासाठी तयार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे पराठे तयार करताना आपण पराठ्यांच्या स्टफिंग किंवा कणकेत हा पराठा मसाला मिक्स करून पराठा तयार करु शकता. हा मसाला आपण एअर टाईट कंटेनरमध्ये स्टोअर करुन ठेवू शकता. 

Web Title: How to make Paratha Masala Powder At Home Tips To Make Masala Mix For Tasty Paratha Homemade Dry Masala Powder For Paratha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.