lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > उन्हाळ्यात खायला हवीच कैरी-टोमॅटोची चमचमीत चटणी, जेवणाची वाढते रंगत-दोन घास जेवा जास्त

उन्हाळ्यात खायला हवीच कैरी-टोमॅटोची चमचमीत चटणी, जेवणाची वाढते रंगत-दोन घास जेवा जास्त

How To Make Kairi Tomato Chutney: उन्हाळ्यात आधीच जेवण जात नाही आणि त्याच त्या चवीच्या भाज्या तर मुळीच खाव्या वाटत नाहीत. म्हणूनच बघा ही खास रेसिपी...(summer special food) 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2024 04:51 PM2024-05-04T16:51:42+5:302024-05-06T15:54:59+5:30

How To Make Kairi Tomato Chutney: उन्हाळ्यात आधीच जेवण जात नाही आणि त्याच त्या चवीच्या भाज्या तर मुळीच खाव्या वाटत नाहीत. म्हणूनच बघा ही खास रेसिपी...(summer special food) 

how to make kairi tomato chutney, tasty recipe of raw mango and tomato chutney | उन्हाळ्यात खायला हवीच कैरी-टोमॅटोची चमचमीत चटणी, जेवणाची वाढते रंगत-दोन घास जेवा जास्त

उन्हाळ्यात खायला हवीच कैरी-टोमॅटोची चमचमीत चटणी, जेवणाची वाढते रंगत-दोन घास जेवा जास्त

Highlightsही चटणी करायला अतिशय सोपी आहे, शिवाय जेवणाची रंगत वाढविणारी आहे.

उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेवणाची इच्छा तशी कमीच झालेली असते. या दिवसांत काही खावंसं वाटत नाही, त्यात त्या चवीचं जेवण तर अगदी नकोसं होऊन जातं, अशी अनेकांची तक्रार असते. शिवाय या दिवसांत भाज्याही खूप काही ताज्या नसतात. अशावेळी भाजीच्या ऐवजी कैरी- टोमॅटोची ही चटपटीत चटणी करून पाहा. ही चटणी करायला अतिशय सोपी आहे, शिवाय जेवणाची रंगत वाढविणारी आहे. पोळी, पुरी, पराठा, भाकरी यासोबत तुम्ही ती खाऊ शकता. शिवाय जेवणात तेांडी लावायलाही घेऊ शकता. अशी आंबट, तिखट चवीची ही चटणी उन्हाळ्यात तोंडी लावायला असेल तर नक्कीच जेवणाची मजा वाढत जाईल. (tasty recipe of raw mango and tomato chutney)

 

कैरी- टोमॅटोची चटपटीत चटणी करण्याची रेसिपी

कैरी टोमॅटोची चटणी कशी करायची याची रेसिपी Maharashtrian Recipes या युट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आली आहे.

साहित्य

अर्धी कैरी

२ ते ३ मध्यम आकाराचे टाेमॅटो

काही सेकंदातच चमकतील तांब्यांची भांडी, घासण्याचीही गरज नाही- फक्त 'या' जादुई पाण्यात टाकून कमाल पाहा

३ ते ४ हिरव्या मिरच्या

५ ते ६ लसूण पाकळ्या

१ लहान आकाराचा कांदा

७ ते ८ पुदिन्याची पानं

चवीनुसार मीठ

१ टीस्पून काश्मिरी लाल तिखट

१ टेबलस्पून गूळ

अर्धा टेबलस्पून तेल

१ टेबलस्पून कोथिंबीर

 

कृती

१. सगळ्यात आधी एक पसरट कढई घ्या. त्यामध्ये तेल टाकून ते सगळीकडे पसरवून घ्या.

२. कैरीचे मधोमध २ काप करून घ्या. तसेच टोमॅटोच्याही मोठमोठ्या फोडी करा. 

घरच्याघरी कुकरमध्ये तयार केली हॉटेलपेक्षाही भारी तंदूर रोटी, बघा भन्नाट रेसिपीचा व्हायरल व्हिडिओ...

३. तेल तापल्यानंतर त्यावर कैरी आणि टोमॅटोचे काप तसेच लसूण पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या ठेवा. कढईवर झाकण ठेवा आणि २ मिनिटे गॅस मध्यम आचेवर ठेवून वाफ येऊ द्या.

४. त्यानंतर पुन्हा टाेमॅटो आणि कैरीची बाजू पलटून घ्या आणि पुन्हा एखदा मिनिटे झाकण ठेवून वाफ येऊ द्या. अशा पद्धतीने कैरी आणि टोमॅटो चांगले भाजून- वाफवून घ्या.

 

५. यानंतर भाजून घेतलेले पदार्थ थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर टाेमॅटो, लसूण, मिरच्या कैरीचा गर असं सगळं चॉपरमध्ये टाका. चॉपर नसेल तर मिक्सर वापरलं तरी चालेल.

बघा हात न लावताही काही सेकंदातच कशी भिजवायची कणिक, पोळ्याही होतील एकदम मऊ....

तसेच चिरलेला कांदा, तिखट, मीठ, कोथिंबीर, पुदिना असं सगळं चॉपरमध्ये टाका आणि बारीक करून घ्या. कैरी टोमॅटोची चटपटीत चटणी झाली तयार.

या रेसिपीमध्ये गूळ घातलेला नाही. पण कैरी आणि टोमॅटो या दोन्ही पदार्थांचा आंबटपणा बॅलेन्स करण्यासाठी या चटणीत थोडा गूळ घातला तरी चालेल. चटणीला छान आंबट- तिखट, गोड चव येईल.

 

Web Title: how to make kairi tomato chutney, tasty recipe of raw mango and tomato chutney

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.