Join us
Daily Top 2Weekly Top 5

होली आयी रे.. गारेगार थंडाईशिवाय होळीची मजाच नाही, घ्या होळी स्पेशल थंडाईची सोपी रेसिपी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2026 14:58 IST

How to Make Holi Special Thandai?: होळी स्पेशल थंडाई करणं अगदी सोपं आहे. त्याचीच ही खास रेसिपी (easy recipe of making thandai for holi celebration)

होळीचा सण म्हटलं की रंगाची उधळण डोळ्यासमोर येते. अंगणात पेटलेली होळी आणि पुरणाची पोळीही आठवते. त्यासोबतच आणखी एक गोष्टदेखील आठवते आणि ती म्हणजे गारेगार थंडाई. होळीच्या वेळी उन्हाचा चटका जाणवायला सुरुवात झालेली असते. अशावेळी गारेगार थंडाईचा एखादा घोट घेतला तरी बरं वाटतं. अशी ही होळीस्पेशल थंडाई करायलाही खूप सोपी आहे (How to Make Holi Special Thandai?). त्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांची जुळवाजुळव मात्र करावी लागते. ते पदार्थ कोणते आणि त्यांच्यापासून थंडाई कशी करायची ते पाहा..(easy recipe of making thandai for holi celebration)

होळी स्पेशल थंडाई करण्याची रेसिपी

 

साहित्य

२ ग्लास दूध

८ ते १० बदाम आणि तेवढेच काजू आणि पिस्ता

१ टेबलस्पून खसखस आणि तेवढ्याच टरबूज बिया

२ टीस्पून बडिशेप आणि ४ ते ५ काळी मिरी

Virosh Wedding: रश्मिका मंदानाचे सुंदर दागिने पाहिले का? कासूमाला, वड्डानम दक्षिणी पारंपरिक दागिन्यांनी सजली नवरी

जायफळ पावडर आणि वेलची पावडर प्रत्येकी एकेक टीस्पून

गुलाबाच्या ८ ते १० पाकळ्या आणि ८ ते १० केशराच्या काड्या

४ टेबलस्पून साखर आणि २ टेबलस्पून गुलकंद

कृती

 

थंडाई करण्यासाठी सगळ्यात आधी काजू, बदाम, पिस्ता ८ ते १० तास पाण्यामध्ये भिजवून घ्या. त्यासोबतच एका दुसऱ्या भांड्यात मिरे, बडिशेप, खसखस, टरबूज बिया असे पदार्थही ८ ते १० तास भिजत घाला.

चहा गाळणी कळकट, घाण झाली म्हणून फेकू नका- 'या' पद्धतीने स्वच्छ करा, नव्यासारखी चकाचक होईल

दुध गॅसवर गरम करायला ठेवा. त्यानंतर त्यामध्ये साखर आणि केशराच्या काड्या घाला. यानंतर भिजलेले बदाम, काजू, पिस्ता मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्या. तसेच भिजलेली बडिशेप, खसखस, टरबूज बिया हे देखील अगदी बारीक वाटून घ्या. ही मसाल्याची पेस्ट एका सुती कपड्याने गाळून घ्या. 

 

आता गरम करून कोमट झालेल्या दुधामध्ये मसाल्याची पेस्ट, काजु, बदामची पेस्ट, मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेलं गुलकंद असं सगळं घाला. दूध व्यवस्थित हलवून घ्या आणि फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्या. फ्रिजमधली गारेगार थंडाई बर्फाचे तुकडे घालून सर्व्ह करा. थंडाई जेवढी जास्त थंड तेवढी ती पिण्याची मजा वाढत जाते. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Holi Special Thandai: Easy recipe to enjoy the festive drink.

Web Summary : Celebrate Holi with refreshing Thandai! This easy recipe blends nuts, seeds, spices, and milk for a cool, festive treat. Soak ingredients, grind, and mix for a delicious, chilled beverage.
टॅग्स :होळी 2026अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स