आल्याचा चहा (Tea) म्हणजे केवळ पेय नाही तर तर एक अनुभव आहे. थंडी असो, पावसाळा असो किंवा मग साध्या डोकेदुखीवर उपाय. आल्याचा गरमागरम चहा भारतीयांसाठी संजीवनाच ठरतो. पण हा चहा नुसता करणं आणि तो फक्कड परफेक्ट होणं यात फरक आहेत. तुमच्या चहाला एक अविस्मरणीय चव देण्यासाठी या काही खास आणि महत्वाच्या टिप्स फॉलो करा. (How To Make Ginger Tea)
आल्याचा चहा परफेक्ट होण्यासाठी टिप्स
चहाच्या उत्कृष्ट चवीची सुरूवात उत्तम आल्यापासून होते. ताज्या आल्याचा वापर केल्यास चहाला चांगली चव येते. नेहमी ताजे, रसरशीत आणि घट्ट आलं वापरा. वाळवलेले किंवा तंतूमय आले चहाला चांगली चव देत नाहीत. (How To Make Ginger Tea)
दोन कप चहासाठी अंदाजे १ इंच आलं पुरेसं आहे. जास्त आलं घातल्यास चहा कडवट होऊ शकतो. आल्याला किसण्याऐवजी खलबत्त्यात हलके ठेचून घ्या. ठेचल्यानं आल्याचे नैसर्गिक तेल आणि रस चहात चांगल्या प्रकारे उतरतो ज्यामुळे चहाची चव अधिक तीव्र होते. पाण्याची गुणवत्ता आणि चहापत्तीचे प्रमाण चहाचा बेस ठरवते.
सर्वप्रथम पातेल्यात आवश्यकतेनुसार पाणी घेऊन त्याला चांगली उकळ येऊ द्या. चहाची पत्ती नेहमी तुमच्या आवडीनुसार आणि उच्च दर्जाची वापरा. फक्कड चहासाठी पाण्याचे प्रमाण आणि २:१ असावे. जर तुम्हाला अधिक चवदार चहा हवा असेल तर आल्यासोबत एक लवंग किंवा काळी मिरीचा दाणा ठेचून घाला. यामुळे चहा अधिक पाचक आणि आरोग्यदायी होईल.
आल्याच्या चहाची खरी मजा त्याला दिलेल्या योग्य वेळेत आणि उकळवण्याच्या पद्धतीत आहे. उकळत्या पाण्यात ठेचलेलं आलं आणि चहा पावडर घाला. या मिश्रणाला ४ ते ५ मिनिटं व्यवस्थित उकळ येऊ द्या. यामुळे आल्याचा आणि पावडरचा अर्क पाण्यात पूर्णपणे उतरतो ही प्रक्रिया महत्वाची असते.
चहाचा रंग गडद झाल्यावरच दूध घाला. दूध घातल्यावर पुन्हा २ ते ३ मिनिटं चांगली उकळ येऊ द्या. साखर किंवा गूळ तुमच्या आवडीनुसार घाला. दूध घालण्यापूर्वी चहा चांगला उकळला तरच चव वाढते. चहा कपमध्ये गाळण्यापूर्वी एकदा चमच्यानं ढवळून घ्या. आल्याच्या चहाची खरी मजा त्याच्या गरमपणात आहे. बिस्किटं किंवा टोस्टसोबत लगेच सर्व्ह करा.
