उन्हाळ्याच्या दिवसांत घरोघरी वर्षभर पुरेल एवढे वाळवण तयार करून ठेवले जाते. वर्षभराचे धान्य चांगले ऊन देऊन भरून ठेवले जाते. वेगवेगळे मसाले आणि लाल तिखटही याच दिवसांत केले जाते. म्हणूनच तुमच्याघरी मसाले तयार करण्याची तयारी सुरू होण्यापुर्वी काळा मसाला तयार करण्याची ही रेसिपी एकदा पाहून घ्या (Marathwada Special Kala Masala Recipe). मराठवाड्यातील बहुतांश घरांमध्ये या पद्धतीने काळा मसाला तयार केला जातो (how to make garam masala?). जर तुम्हाला मराठवाडी चवीचा स्वयंपाक किंवा भाज्या आवडत असतील तर नक्कीच हा मसाला घरी तयार करून ठेवू शकता.(kala masala or garam masala recipe)
मराठवाडी काळा मसाला करण्याची रेसिपी
१. मसाला तयार करायचा म्हणजे सगळ्यात आधी मसाल्याचे पदार्थ एकेक करून भाजून घ्यावे लागतात. त्यासाठी सगळ्यात आधी गॅसवर थोड्या मोठ्या आकाराची कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाली की त्यामध्ये एखादा चमचा तेल घालून ५०० ग्रॅम धने भाजून घ्या.
योग अभ्यासक सांगतात रोज ३ मिनिटे मानेला मसाज करा- औषधांशिवाय अनेक आजार बरे होतील
२. यानंतर भाजून घेतलेले धने कढईच्या बाहेर काढा आणि त्यामध्ये २० ग्रॅम लवंग आणि २० ग्रॅम काळी मिरी टाकून भाजून घ्या.
३. यानंतर ५ ग्रॅम त्रिफळा, १० ग्रॅम बादियान आणि २५ ग्रॅम दालिचनी टाकून भाजून घ्या. हे सगळे पदार्थ भाजून घेताना जर कढई खूपच कोरडी वाटली तर अधूनमधून थोडे थोडे तेल घालत राहा.
४. नंतर ५ ग्रॅम सुंठ, २० ग्रॅम बडीशेप आणि १५ ग्रॅम जिरे घालून परतून घ्या.
५. यानंतन ५ ग्रॅम राम पत्री, १५ ग्रॅम शहाजिरे, १० ग्रॅम जावित्री, ५ ग्रॅम काळी वेलची आणि १ जायफळ घालून भाजून घ्या. ते झाल्यानंतर ५ ग्रॅम वेलची, ५ ग्रॅम कपूर चिनी, ५ ग्रॅम खसखस, ५ ग्रॅम हिंग असं सगळं कढईमध्ये घालून भाजून घ्या.
उन्हाळ्यात नाश्त्याला करून खायलाच हवेत दह्यातले पाेहे! पोटाला थंडावा देणारी पौष्टिक रेसिपी
६. वरील पदार्थ भाजून झाल्यानंतर २५ ग्रॅम दगडफूल आणि २५ ग्रॅम तेजपत्ता एकानंतर एक या पद्धतीने थोडं थोडं तेल टाकून भाजून घ्या.
७. आता मसाल्याच्या या शेवटच्या टप्प्यात ५०० ग्रॅम किसलेले खोबरे, २५० ग्रॅम वाळवलेला पांढरा कांदा आणि १ किलो लाल मिरची थोडी थोडी करून भाजून घ्या. यामध्ये अधूनमधून तेल घालत राहावे.
वयाची तिशी येताच ५ गोष्टी बदला- वय वाढलं तरी तारुण्य आणि फिटनेस टिकून राहील..
भाजून घेतलेले सगळे मसाले थंड झाल्यावर एकत्रित करा आणि तुमच्या शहरात ज्याठिकाणी तिखट, मसाले दळून दिले जातात त्याठिकाणी देऊन दळून घ्या.. गरम मसाला किंवा काळा मसाला झाला तयार..