Join us

विरजण नसेल तर दही कसं लावायचं? ४ ट्रिक्स- १५ मिनिटांत घट्ट, मलाईदार दही होईल तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 10:25 IST

How to Make Curd Without Curd :  विरजण नसताना दही लावण्याची सोपी रेसिपी पाहूया. (How to Make Curd At Home)

ऊन्हाळ्याच्या दिवसांत दही, दूध असे पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. शरीराला गारवा देण्यासाठी दही-दूधाचे सेवन फायदेशीर ठरते. (Easy Ways To Make Curd Without A Curd Starter) घरात विरजण नसेल तर दही कसं लावायचं असा प्रश्न अनेकदा पडतो. नेहमीच बाहेरून दही आणायाला वेळ मिळतोच असं नाही घरच्याघरी विजरण नसल्यानंतरही तुम्ही पटकन दही लावू शकता.  विरजण नसताना दही लावण्याची सोपी रेसिपी पाहूया. (How to Make Curd At Home)

दही लावण्याच्या सोप्या ट्रिक्स

१) हिरवी मिरची

सगळ्यात आधी दूध हलके गरम करा. नंतर हे कोमट दूध एका भांड्यात ठेवा. आता गरम दुधात दोन हिरव्या मिरच्या घाला. मात्र, लक्षात ठेवा की मिरचीला देठ असणे आवश्यक आहे. मिरची पूर्णपणे दुधात बुडवावी. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, दूध गरम ठिकाणी 6 तास झाकून ठेवा. दही विरजण न घालता सेट होईल.

२) लिंबाचा रस

लिंबापासून दही बनवण्यासाठी तुम्हाला कोमट दुधाचीही आवश्यकता असेल. तुम्हाला २ चमचे लिंबाचा रस पिळून कोमट दुधात घाला. नंतर दूध झाकून 6 ते 7 तास उबदार ठिकाणी ठेवा. असे केल्याने दही चांगले राहते.

३) चांदीचे नाणे

कोमट दुधात चांदीचे नाणे किंवा चांदीची अंगठी घाला. नंतर 8 तास दूध कोमट जागी झाकून ठेवा. दही बनवण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. 

४) लाल मिरच्या

फक्त हिरव्या मिरच्याच नव्हे तर लाल मिरच्या घालूनही दही सहज तयार करता येते. जर तुमच्या घरात हिरवी मिरची नसेल आणि लाल मिरची असेल तर तुम्ही आंबट न घालता सहज दही बनवू शकता. लाल मिरचीपासून दही बनवण्यासाठी तिखट मिरची लागते. कोमट दुधात लाल मिरची 7 ते 8 तास भिजत ठेवा आणि स्वच्छ आणि उबदार ठिकाणी ठेवा. असे केल्याने दही चांगले  लागते. 

दही लावताना या गोष्टींची काळजी घ्या

दही लावताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. यासाठी नेहमी फुल क्रीम दूध वापरावे. तसेच दूध मंद आचेवर चांगले उकळावे. यानंतर, दही कोमट झाल्यावरच सेट करा. दही सेट करताना त्याची क्रीम देखील वापरा. दुधापासून वेगळे काढू नका. बऱ्याच वेळा दही लावल्यानंतर भांडे हलवल्याने दह्याला पाणी सुटते, म्हणून भांडे ठेवल्यावर पुन्हा पुन्हा उचलू नका.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्ससुंदर गृहनियोजन