ब्रेड पकोडा हा अनेकांचा अतिशय आवडीचा पदार्थ. पण तो खूप जास्त तेलकट असतो. कारण ब्रेडमध्ये खूप तेल शोषून घेतलं जातं. एवढं जास्त तेल एकाचवेळी पोटात जाणं म्हणजे आपल्या तब्येतीवर साहजिकच खूप अत्याचार करण्यासारखं आहे. म्हणूनच खूप आवडत असूनही अनेक लोक ब्रेड पकोडा खाणं टाळतात (bread pakoda without oil recipe). तुम्हीही फक्त ऑईली असतो म्हणून ब्रेड पकोडा खाणं टाळत असाल तर पुढे सांगितलेली बिनातेलाच्या ब्रेड पकोड्याची रेसिपी एकदा ट्राय करून पाहा (oil free bread pakoda recipe). हा पकोडाही अतिशय चवदार होतो..(How to Make Bread Pakoda Without Oil?)
बिनातेलाचा ब्रेड पकोडा करण्याची रेसिपी
साहित्य
ब्रेडच्या स्लाईस
उकडलेले बटाटे
आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट
किचनमधला कचरा आणि चमचाभर गूळ.. रोपांसाठी उत्कृष्ट खत तयार करण्याची सोपी पद्धत, फुलं येतील भरपूर..
चवीनुसार गरम मसाला आणि मीठ
बेसन पीठ आणि चिमूटभर आमचूर पावडर
बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना
कृती
बटाटे उकडल्यानंतर त्याची सालं काढून घ्या आणि ते मॅश करा. आता त्यामध्ये आमचूर पावडर, आलं, लसूण, मिरची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना असं सगळं घाला. चवीनुसार मीठ, धनेपूड, जिरेपूड घालून सगळं मिश्रण एकत्र करून घ्या.
नेहमीच्याच भाज्या खाऊन कंटाळलात? पोळीसोबत खा मसाला दही, ५ मिनिटांत होणारी चटपटीत रेसिपी
एका पसरट भांड्यामध्ये बेसन कालवून ठेवा. त्यामध्ये लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घाला. यानंतर ब्रेडची स्लाईस घ्या. त्यामध्ये बटाट्याचं सारण भरा. यानंतर त्यावर पुन्हा दुसरा ब्रेड ठेवा. ही स्लाईस आता बेसनामध्ये बुडवून नॉन स्टिक पॅनवर ठेवा.
हवं तर पॅनला थोडासा साजूक तुपाचा किंवा बटरचा हात लावा. दोन्ही बाजूंनी ब्रेड स्लाईस चांगली भाजून घेतली की बिना तेलाचा ब्रेड पकोडा झाला तयार. या पकोड्यावर झाकण ठेवून तुम्ही तो वाफवूनही घेऊ शकता.
