बटाटेवडे हा अनेकांचा अतिशय आवडीचा पदार्थ. गरमागरम खमंग बटाटेवडे समोर आले की ते खाण्याचा मोह खवय्यांना टाळताच येत नाही. वारंवार बाहेरचे वडे खाणं नको वाटतं. म्हणून मग आपण ते घरी करण्याचा प्रयत्न करतो. अगदी जय्यत तयारी करतो. पण नंतर मात्र असं लक्षात येतं की विकतच्यासारख्या बटाटेवड्यांची स्पेशल चव आपण घरी केलेल्या वड्यांना आलेलीच नाही..(perfect recipe for Alu vada or batata vada) असं तुमच्याही बाबतीत होत असेल तर अगदी गाड्यावर मिळतात तसे चटपटीत बटाटेवडे घरच्याघरी कसे करायचे ते पाहूया...(how to make batata vada at home?)
गाड्यावर मिळतात तसे खमंग बटाटेवडे करण्याची रेसिपी
साहित्य
३ ते ४ उकडलेले बटाटे
१ मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा
किचनमधला ओला कचरा रोपांसाठी ठरतो उत्कृष्ट खत- 'या' पद्धतीने वापरा, बाग कायम राहील हिरवीगार
४ ते ५ हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर
१ टीस्पून जिरे आणि एका लिंबाचा रस
२ वाट्या बेसन, चवीनुसार तिखट आणि मीठ, थोडासा चाट मसाला
कृती
उकडलेले बटाटे मॅश करून घ्या आणि त्यामध्ये बारीक चिरलेला कच्चा कांदा घाला.
यानंतर हिरव्या मिरच्या, आलं, जिरे, कोथिंबीर खलबत्त्यामध्ये घालून कुटून घ्या किंवा मग मिक्सरमध्ये फिरवून त्याची बारीक पेस्ट करून घ्या. ही पेस्ट बटाट्यांमध्ये घाला.
पांढऱ्या केसांमुळे कमी वयातच म्हातारे दिसताय? 'या' पद्धतीने आवळा वापरा- केस काळेभोर राहतील
त्यात थोडं लिंबू पिळून हळद आणि चवीनुसार मीठ आणि थोडा चाट मसाला घाला. यानंतर बेसन पीठ पाणी घालून कालवून घ्या. त्यामध्ये मीठ, तिखट, धणेपूड आणि हळद घाला. यानंतर वडे तळून घ्या. बघा या वड्यांना अगदी विकतच्या वड्यांसारखी खमंग चव येईल.
Web Summary : Craving street-style Batata Vada? This recipe shows you how to create delicious, crispy Batata Vada at home. Use mashed potatoes, spices, and a gram flour batter for an authentic taste.
Web Summary : बाज़ार जैसे बटाटा वड़ा खाने का मन है? यह रेसिपी आपको घर पर स्वादिष्ट, कुरकुरे बटाटा वड़ा बनाने का तरीका बताती है। प्रामाणिक स्वाद के लिए मसले हुए आलू, मसाले और बेसन के घोल का उपयोग करें।