आवळा (Amla) तब्येतीसाठी फायदेशीर ठरतो. यात व्हिटामीन सी तसंच बरीच पोषक तत्व असतात. ज्यामुळे इम्युनिटी वाढवण्यास मदत होते. आवळ्याच्या सेवनानं पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. तसंच आवळ्याचा मोरावळाही करू शकता. लहान मुलांना इतर स्नॅक्स खायला आवडतात अशावेळी तुम्ही मुलांना घरात केलेली ही पौष्टीक अशी आवळा कॅण्डी खायला देऊ शकता. (How To Make Amla Candy At Home)
लोक आपल्या घरांत कॅन्डी तयार करतात. अनेकदा या रेसिपीची योग्य माहिती नसल्यामुळे योग्य पद्धतीनं आवळा कॅण्डी करता येत नाही. प्रसिद्ध शेफ पारूल गुप्तानं आपल्या युट्यूब चॅनलवर याबाबत अधिक माहिती दिली आहे. या पद्धतीनं तुम्ही सोप्या पद्धतीनं आवळा कॅण्डी तयार करू शकता. यामुळे तुम्हाला आवळा उन्हात सुकवावा लागणार नाही. (Amla Candy Recipe)
आवळा कॅण्डी करण्याची सोपी रेसिपी (Amla Candy Recipe In Marathi)
आवळा कॅण्डी तयार करण्यासाठी आवळा व्यवस्थित धुवून उकळवून घ्या. जेव्हा आवळा व्यवस्थित शिजेल तेव्हा छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये चिरून घ्या. नंतर एका मिक्सरच्या भांड्यात आवळ्याचे तुकडे आणि आल्याचे जाडसर काप घालून पेस्ट तयार करून घ्या.
आराध्या बच्चन शाळेत जाताना डब्याला काय नेते? शेफ संजीव कपूर यांनी ठरवलाय मेन्यू!
एका भांड्यात थोडं तूप गरम करा. जेव्हा तूप व्यवस्थित गरम होईल तेव्हा आवळ्याची पेस्ट, साखर, मीठ आणि काळं मीठ घालून व्यवस्थित शिजवून घ्या. काहीवेळानंतर ही पेस्ट घट्ट होईल. नंतर यात लिंबाचा रस आणि कॉर्न फ्लोरचं पाणी घालून मिसळा. नंतर यात एक छोटा चमचा तूप घालून व्यवस्थित शिजवून घ्या.
जेव्हा हे मिश्रण आटायला सुरूवात होईल तेव्हा गॅस बंद करा. एका ट्रेमध्ये पेपर पसरवून घ्या आणि त्यावर हे मिश्रण घाला. हे मिश्रण पूर्णपणे सेट होईपर्यंत थांबा. नंतर आपल्या गरजेनुसार हे मिश्रण सुरीनं कापून घ्या. शेवटी यात वाटलेली साखर आणि थोडा चाट मसाला घालून कॅण्डीच्या तुकड्यांवर कोटींग करा. या पद्धतीनं तुम्ही घरच्याघरी सोप्या पद्धतीनं आवळा कॅण्डी करू शकता. हा पदार्थ १० ते १५ दिवस आरामात चांगला राहतो. दिवसातून २ ते ३ वेळा आवळा कॅण्डी खाल्ल्यानंही तब्येतीला बरेच फायदे मिळतील.
Web Summary : Make amla candy easily at home without sun-drying! Boil amla, blend with ginger, cook with sugar, lemon juice, and cornflour. Coat with sugar and chaat masala. This boosts immunity and stays fresh for days.
Web Summary : धूप में सुखाए बिना घर पर आसानी से आंवला कैंडी बनाएं! आंवला उबालें, अदरक के साथ मिलाएं, चीनी, नींबू का रस और कॉर्नफ्लोर डालकर पकाएं। चीनी और चाट मसाला से कोट करें। यह रोग प्रतिरोधक क्षमता बढ़ाता है और दिनों तक ताजा रहता है।