Lokmat Sakhi >Food > पावसाळ्यात जेवणात हवीच गरमागरम कढी, चविष्ट कढी पकोडा करण्याची पाहा रेसिपी

पावसाळ्यात जेवणात हवीच गरमागरम कढी, चविष्ट कढी पकोडा करण्याची पाहा रेसिपी

Hot Kadhi is a must-have for your meal during the monsoon season, see the recipe for making delicious Kadhi pakodas : पावासाळ्यात जेवणात कढी तर हवीच पण त्याबरोबर पकोडा असेल तर आणखी मज्जा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2025 08:50 IST2025-05-28T08:45:21+5:302025-05-28T08:50:01+5:30

Hot Kadhi is a must-have for your meal during the monsoon season, see the recipe for making delicious Kadhi pakodas : पावासाळ्यात जेवणात कढी तर हवीच पण त्याबरोबर पकोडा असेल तर आणखी मज्जा.

Hot Kadhi is a must-have for your meal during the monsoon season, see the recipe for making delicious Kadhi pakodas | पावसाळ्यात जेवणात हवीच गरमागरम कढी, चविष्ट कढी पकोडा करण्याची पाहा रेसिपी

पावसाळ्यात जेवणात हवीच गरमागरम कढी, चविष्ट कढी पकोडा करण्याची पाहा रेसिपी

गरमागरम कढी असली की वाट्याच्या वाट्या प्यायल्या जातात. मात्र भातावर कढी पकोडा असेल तर जेवणाची मज्जा काही औरच असते. (Hot Kadhi is a must-have for your meal during the monsoon season, see the recipe for making delicious Kadhi pakodas)कोणी फक्त बेसनाचा पकोडा करते तर कोणाला पालकाचा आवडतो. पकोडा कोणताही असो कढी पकोडा कायम हिटच आहे. पाहा सोपी रेसिपी.  

साहित्य 
बेसन, ताक, मीठ, कडीपत्ता, कांदा, लसूण, आलं, लाल मिरची, मेथी दाणे, मीठ, कोथिंबीर, कसुरी मेथी, तेल, हळद, लाल तिखट, पाणी, हिंग

कृती
१. एका खोलगट भांड्यात बेसन घ्या. त्यात चमचाभर मीठ घालायचे. तसेच त्यात हळद घालायची. मग गरजेनुसार ताक घालून पातळ मिश्रण तयार करुन घ्यायचे. जास्त पातळही नाही आणि अति घट्टही नाही. छान खमंग कढी करता येईल असे मिश्रण करुन घ्यायचे. 

२. एका कढईत चमचाभर तेल घ्यायचे. त्यात मेथीचे काही दाणे घालायचे त्यात भरपूर कडीपत्ता घाला आणि परता. मग लसूण घाला आणि परता तसेच कांदा घाला खमंग गुलाबी होऊ द्या. कांदा छान परतल्यावर त्यात ताक बेसनाचे मिश्रण ओता आणि ढवळा. गरजेनुसार पाणी घाला. कढी छान उकळून घ्यायची. 

३. एका खोलगट भांड्यात बेसन घ्यायचे त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा. भरपूर कोथिंबीर घालायची आणि मग चवीपुरते मीठ घालायचे. बेसन कमी घ्या. म्हणजे छान कुरकुरीत भजी तळता येईल. त्यात थोडे गरम तेल घाला आणि मग छान कालवायचे. 

४. गॅसवर तेल गरम करत ठेवा. तेल तापल्यावर त्यात भजी सोडा आणि मस्त खमंग कुरकुरीत भजी तयार करुन घ्या. उकळत्या कढीत भजी घालायची जास्त वेळ तशीच राहिली तर भजी मऊ होते. त्यामुळे गरजे एवढ्याच भजी सोडायच्या थोडी भजी बाजूला काढून ठेवा. 

५. कढी तयार झाल्यावर एका फोडणी पात्रात थोडं तेल तापवायचे आणि त्यात चमचाभर हिंग घालायचे. त्यात कडीपत्याची पाने घालायची आणि मग लाल तिखट घालायचे. गरमगरम फोडणी तिखट जळण्याआधीच कढीवर ओतायचे.   

Web Title: Hot Kadhi is a must-have for your meal during the monsoon season, see the recipe for making delicious Kadhi pakodas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.