Join us
Daily Top 2Weekly Top 5

Holi 2026 Special Food: पारंपरिक गुजिया नाही खाल्ल्या तर होळी रंगेल कशी? पाहा गुजियांची परफेक्ट रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2026 18:24 IST

Holi 2026 Special Food: recipe for making traditional Gujiya, See the perfect dish for holi : होळीसाठी खास गुजिया रेसिपी. नक्कीच खा.

होळी आली की घरोघरी पारंपरिक पदार्थ केले जातात. त्यापैकीच एक म्हणजे गुजिया. होळीच्या सणाला खास करणारा हा पदार्थ उत्तर भारतात विशेष लोकप्रिय आहे. हा तिकडचा पारंपरिक गोड पदार्थ आहे. सणासुदीच्या आनंदात रंगांसोबत गोडाधोडाची रेलचेल असते आणि त्यात गुजियाला खास स्थान आहे. (Holi 2026 Special Food: recipe for making traditional Gujiya, See the perfect dish for holi )गुजिया हा अर्धचंद्राकृती आकाराचा तळलेला गोड पदार्थ असतो. करंजीसारखाच असतो. मात्र जरा वेगळा. बाहेरुन तो कुरकुरीत आणि आतून मऊ, गोड सारणाने भरलेला असतो. त्याचे आवरण मैद्यापासून तयार केले जाते, तर आतमध्ये खवा पिठीसाखर, सुका मेवा जसे बदाम, काजू, मनुका आणि वेलची पूड यांचे मिश्रण भरलेले असते. 

साहित्य खवा, तूप, रवा, वेलची, काजू, बदाम, मैदा, साखर, पाणी, सुकं खोबरं

कृती१. एका पॅनमध्ये थोडे तूप घ्यायचे त्यावर मावा परतायचा आणि त्याला तूप सुटेपर्यंत परतायचा. जरा रंग गडद झाला की काढून घ्यायचा आणि गार करत ठेवायचा. पॅनमध्ये थोडा रवा घ्यायचा. तुपावर छान खमंग परतायचा. अगदी थोडाच घ्यायचा. बदाम, काजू आणि इतर आवडता सुकामेवा बारीक चिरायचा. नंतर मिश्रणात घालायचा. मावा, सुकामेवा आणि रवा एकत्र करा. त्यात किसलेलं सुकं खोबरं घाला. 

२. साखर मिक्सरमधून वाटून घ्यायची. साखरही मिश्रणात घालायची आणि मिक्स करायचे. एका परातीत मैदा घ्यायचा. त्यात गरम तूप घालायचे. थोडे मीठ घालायचे आणि मग त्यात कोमट पाणी घालून पीठ मळून घ्यायचे. पुरीसाठी मळता तसे पीठ मळायचे.  ओलसर कपड्याने झाकून दहा मिनिटे ठेवायचे. 

३. नंतर त्याच्या पुऱ्या लाटायच्या. जरा जाडसरच लाटा. त्यात तयार सारण भरायचे. नंतर दोन्ही टोकं जोडून करंजीचा आकार द्यायचा. टोकाला लहान गोल तयार करुन गुजियांसारखा आकार द्यायचा. पुरी जाडसरच लाटा म्हणजे फटणार नाही. तेल गरम करुन घ्यायचे. तेलात तयार गुजिया खमंग परतायच्या. रंग बदलेपर्यंत परतायच्या. 

४. एका पातेल्यात साखर घ्यायची. त्यात थोडे पाणी घालायचे आणि पाक तयार करायचा. छान एकतारी पाक तयार झाल्यावर तो गुजियांना लावायचा आवडत असल्यास सुकामेवाही त्यावर चिकटवायचा. अख्खा नको तुकडे चिकटवा. खमंग होते आणि फारच चविष्ट लागते.  

English
हिंदी सारांश
Web Title : Holi 2026: Make perfect Gujiya; a traditional festive treat.

Web Summary : Gujiya, a popular North Indian sweet, is essential for Holi celebrations. This recipe details making crispy, flavorful Gujiya with a filling of khoya, nuts, and spices. A must-try!
टॅग्स :अन्नहोळी 2026कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सहोम रेमेडीपाककृती