Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > Holi 2026 : मऊसूत पुरणपोळी करण्याच्या ८ ट्रिक्स; परफेक्ट बनेल पुरणपोळी

Holi 2026 : मऊसूत पुरणपोळी करण्याच्या ८ ट्रिक्स; परफेक्ट बनेल पुरणपोळी

Holi 2026 Holi Special Puranpoli Making Tips : पोळी करायला सुरूवात केल्यानंतर पूरण पातळ होणं किंवा पोळी तुटणं या समस्यांमुळे हिरमोड होऊ शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 12:50 IST2026-03-01T20:56:52+5:302026-03-02T12:50:37+5:30

Holi 2026 Holi Special Puranpoli Making Tips : पोळी करायला सुरूवात केल्यानंतर पूरण पातळ होणं किंवा पोळी तुटणं या समस्यांमुळे हिरमोड होऊ शकतो.

Holi 2026 : How To Make Perfect Puranpoli For Holi Puran Poli Making Tips | Holi 2026 : मऊसूत पुरणपोळी करण्याच्या ८ ट्रिक्स; परफेक्ट बनेल पुरणपोळी

Holi 2026 : मऊसूत पुरणपोळी करण्याच्या ८ ट्रिक्स; परफेक्ट बनेल पुरणपोळी

होळीचा सण (Holi 2026) म्हटलं की पुरणपोळी आलीच. बऱ्याचजणांना पुरणपोळी खायला खूप आवडते पण  घरी करायला जमत नाही म्हणून काहीजण विकत पुरणपोळी आणतात. पुरणपोळी परफेक्ट करणं ते ही घरच्याघरी हे अगदी सोपं आहे. त्यासाठी तुम्हाला फार काही करावं लागणार नाही (Holi  Special Puran Poli Making Tips). पोळी करायला सुरूवात केल्यानंतर पुरण पातळ होणं किंवा पोळी तुटणं या समस्यांमुळे हिरमोड होऊ शकतो. परफेक्ट पुरणपोळी होण्यासाठी काही टिप्स पाहूया. (How To Make Perfect Puranpoli)

पुरणपोळी चुकू नये परफेक्ट व्हावी यासाठी खास टिप्स

 १) चण्याची डाळ मऊ शिजवून घ्या. पण त्यात पाणी जास्त घालू नका. शिजलेली डाळ चाळणीवर निथळत ठेवा. जेणेकरून अतिरिक्त पाणी निघून जाईल. डाळ शिजवलेलं पाणी फेकून न देता शेवटी आमटीसाठी वापरा.

 २) पुरण शिजवताना मंद आचेवर सतत ढवळत राहा. पुरण कडेनं सुटू लागले आणि गोळी होऊ लागले की समजा पुरण तयार आहे.

उन्हाळ्यात ढसाढसा भरपूर ताक पिता? पाहा कोणी-कसं आणि किती ताक प्यावं

 ३) पुरण पूर्णपणे गार झाल्याशिवाय वाटू नका. गरम असताना ते पातळ वाटू शकते.  पुरण यंत्रातून किंवा पुरण चाळणीतून वाटून घेतल्यावर त्याला १० ते १५ मिनिटनं पुन्हा गॅसवरून परतवून घट्ट करा.

 ४) पोळीसाठी कणीक मळताना त्यात थोडा रवा आणि तेल घालून मळून घ्या. कणिक जितकी मऊ-लुसलुशीत असते तितकी पोळी छान लाटली जाते.

घरीच सुक्या खोबऱ्यापासून करा शुद्ध नारळाचं तेल; सोपी ट्रिक-मशीन न वापरता झटपट निघेल तेल

 ५) कणीक मळल्यानंतर ती किमान ३० मिनिटं एक सुती कापड ओलं करून ते नीट पिळून त्या कापडानं झाकून ठेवा.जेणेकरून त्यात लवचीकता येईल.

६) जर पोळी लाटताना फाटत असेल तर  लगेच त्यावर थोडं पीठ लावून ती जागा बंद करा आणि हलक्या  हातानं हळूवार लाटणं फिरवा.

 ७) तवा मध्यम गरम असावाच पोळी जास्त दाबून शेकू नका. अन्यथा ती कडक होऊ शकते. या टिप्स वापरल्यानं पुरणपोळी छान मऊ होईल आणि टम्म फुगेल.

८) पोळी गरम असतानाच ती एका कॉटनच्या कापडात किंवा कॅसरॉलमध्ये ठेवा. जेणेकरून पोळी मऊसूत राहील.

Web Title : होली स्पेशल: नरम पुरणपोली बनाने के 8 आसान तरीके।

Web Summary : इन आसान टिप्स से घर पर ही बनाएं परफेक्ट पुरणपोली। दाल की भराई को सही तरीके से पकाना, आटे को पूरी तरह से गूंधना और बिना फटे बेलना सीखें। पुरणपोली को सूती कपड़े या कैसरोल में रखकर नरम रखें।

Web Title : Holi Special: 8 tricks for making soft, melt-in-your-mouth Puranpoli.

Web Summary : Make perfect Puranpoli at home with these simple tips. Learn how to cook the lentil filling right, knead the dough perfectly, and roll without tearing. Keep Puranpoli soft by storing in cotton cloth or casserole.