Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > Holi 2026 : परफेक्ट पुरणपोळी करण्यासाठी ५ टिप्स- न चुकता करा मऊसूत पुरणपोळ्या अगदी सहज

Holi 2026 : परफेक्ट पुरणपोळी करण्यासाठी ५ टिप्स- न चुकता करा मऊसूत पुरणपोळ्या अगदी सहज

Holi 2026: 5 tips to make perfect Puranpoli- Make soft Puranpoli without fail, very easy tips : होळीच्या दिवशी करा मस्त पुरणपोळी. एकदम चविष्ट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2026 16:49 IST2026-03-02T16:46:28+5:302026-03-02T16:49:25+5:30

Holi 2026: 5 tips to make perfect Puranpoli- Make soft Puranpoli without fail, very easy tips : होळीच्या दिवशी करा मस्त पुरणपोळी. एकदम चविष्ट.

Holi 2026: 5 tips to make perfect Puranpoli- Make soft Puranpoli without fail, very easy tips | Holi 2026 : परफेक्ट पुरणपोळी करण्यासाठी ५ टिप्स- न चुकता करा मऊसूत पुरणपोळ्या अगदी सहज

Holi 2026 : परफेक्ट पुरणपोळी करण्यासाठी ५ टिप्स- न चुकता करा मऊसूत पुरणपोळ्या अगदी सहज

पुरणपोळी म्हटली की अनेकांच्या कपाळावर आठ्या येतात. 'खूप कटकटीचं काम आहे', 'पोळी तुटते', 'पुरण बाहेर येतं', 'मऊ होत नाही' अशा तक्रारी ऐकायला मिळतात. पण खरं सांगायचं तर पुरणपोळी ही कसरत नसून संयम, योग्य प्रमाण आणि थोडी काळजी घेतली तर अगदी छान, मऊ आणि खुसखुशीत होते.

सगळ्यात आधी डाळ शिजवताना घाई करू नये. हरभर्‍याची डाळ चांगली स्वच्छ धुऊन किमान अर्धा तास भिजत ठेवली तर ती छान फुलते. डाळ कुकरमध्ये शिजवताना ती अगदी मऊ झाली पाहिजे, पण पाणी जास्त राहणार नाही याची काळजी घ्या. (Holi 2026: 5 tips to make perfect Puranpoli- Make soft Puranpoli without fail, very easy tips)जास्त पाणी असेल तर पुरण सैल होऊन पोळी तुटण्याची शक्यता वाढते. शिजलेली डाळ गाळणीतून किंवा चाळणीतून मऊ करुन काढून घ्यायची. आणि उरलेले पाणी वेगळे ठेवावे, त्यापासून कटाची आमटी करता येते.

पुरण तयार करताना डाळ आणि गूळ एकत्र करून मंद आचेवर एकजीव होऊ द्यायचे. गूळ पूर्णपणे विरघळून मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत राहायचे. पुरण पातळ राहिले तर पोळी लाटताना बाहेर येते. पुरण घट्ट आणि एकसंध झाले की त्यात वेलचीपूड, जायफळ घाला. ताक घुसळण्याचा रवी त्यात ठेवायचा. रवी नीट उभा रहतो म्हणजे पुरण मस्त झाले. तयार पुरण पूर्ण थंड झाल्यावरच गोळे करावेत. गरम पुरण भरल्यास पोळी फुटते.

पोळी लाटताना जर तुम्हाला ती छान वळवता येत नसेल किंवा चिकटत असेल तर अगदी सोपी कृती करायची. लाटताना त्याला गव्हाचे पीठ लावायचे किंवा तांदूळाचे पीठ लावायचे. पोळी अजिबात चिकटत नाही. तव्यावर टाकली की फक्त हलक्या हाताने पीठ झटकून टाकायचे.  

पोळी पोळपाटावरुन काढून तव्यावर टाकणं जरा कठीणच. त्यासाठी कागदाचा वापर करायचा. हातात कागद घ्यायचा त्यावर पोळी ओढून घ्यायची आणि तशीच तव्यावर टाकायची. उलथतानाही अगदी हीच कृती करायची. तव्यावरुन कागदावर घ्यायची आणि पलटी मारायची. अगदी सोपी पद्धत आहे, नक्की करुन पाहा. जर तसे जमत नसेल तर पोळीचा आकार जरा लहान करायचा. 

मैदा छान मळायचा. पीठ तिंबून घ्यायचे. म्हणजे पोळी अजिबात फुटत नाही. मैदा नीट तिंबला गेला तर तो घट्ट आवरणासारखा होतो. त्यातून पुरण बाहेर येत नाही. त्यामुळे मैदा वापरणे फायद्याचेच ठरते. पोळी कडेकडेने लाटायची. मधेच लाटली तर चिकटते आणि कडा जाड राहतात. त्यामुळे एका बाजुने लाटत राहायची.    

Web Title : होली 2026: परफेक्ट पुरणपोली - मुलायम बनाने के 5 आसान टिप्स

Web Summary : परफेक्ट पुरणपोली बनाने के लिए धैर्य, सही अनुपात और देखभाल की आवश्यकता है। दाल को भिगोकर अच्छी तरह पकाएं, और पुरण को गाढ़ा रखें। बेलते समय चावल का आटा या गेहूं का आटा प्रयोग करें और पोली को तवे पर स्थानांतरित करने के लिए कागज का उपयोग करें। अच्छे परिणाम के लिए आटे को अच्छी तरह गूंध लें।

Web Title : Holi 2026: Perfect Puranpoli - 5 Easy Tips for Soft Results

Web Summary : Making perfect puranpoli requires patience, correct proportions, and care. Soak the dal, cook it well, and ensure the puran is thick. Use rice flour or wheat flour while rolling and use paper for transferring the poli onto the pan. Knead the dough well for best results.