Join us
Daily Top 2Weekly Top 5

भजी खा, वजन घटवा! तज्ज्ञांचा सल्ला- मॅजिकल हाय-प्रोटीन नाश्ता, वजन कमी करणारी सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2026 09:30 IST

How to lose weight eating snacks: Air fryer healthy pakora recipes: हाय प्रोटिन भजी कशी बनवायची पाहूया.

आपण वजन कमी करणं किंवा डायटिंगचा विचार करतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर उकडलेले अन्न, सलाड आणि बेचव पदार्थ येतात.(Low calorie high protein Indian snacks) तमिळनाडूपासून ते महाराष्ट्रापर्यंत भजी हा असा पदार्थ आहे जो पाहातच कोणाच्याही तोंडाला पाणी सुटते. पण दुर्दैवाने, तेलात तळलेले असल्यामुळे आपण वजन वाढण्याच्या भीतीने त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो.(Best breakfast for weight loss in India)
डायटिशियनच्या मते, वजन कमी करण्याचा अर्थ उपाशी राहणे किंवा आवडीचे पदार्थ सोडणे असा होत नाही. न्यूट्रिशनिस्ट डॉ. शिखा सिंह यांनी हाय प्रोटिन पकोड्यांची रेसिपी शेअर केली आहे. जे तेलाशिवाय बनवता येतात, ज्यामुळे वजनही कमी होऊ शकते. यात ३० ते ३२ ग्रॅम प्रोटिन असल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि वारंवार भूकही लागत नाही. हाय प्रोटिन भजी कशी बनवायची पाहूया. (Vegetarian protein rich breakfast ideas)

उन्हाळ्यात खा आंबटगोड कैरीची आईस कँडी, मुलं म्हणतील आई अजून हवं.. आणि तुम्हालाही आठवेल लहानपण

साहित्य 

बेसन - ७५ ग्रॅम
लो फॅट पनीर - ५० ग्रॅम
चिरलेले बटाटे - १०० ग्रॅम
कांदे - १
हिरव्या मिरच्या - २ ते ३
मीठ - चवीनुसार 
लाल तिखट - १ चमचा
हळद - १ चमचा
पाणी - आवश्यकतेनुसार

कृती 

1. सगळ्यात आधी कांदा, हिरव्या मिरच्या बारीक चिरुन घ्या. त्यानंतर एका बाऊलमध्ये लो फॅट पनीर, बटाटे कुस्करुन घ्या. यात बेसन, चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, मीठ, लाल तिखट, हळद आणि आवश्यकेतनुसार पाणी घालून बॅटर तयार करा. 

2. आता एअर फ्रायरमध्ये बटर पेपर सेट करा. त्यात चमच्याने बॅटरचे छोटे गोळे ठेवा. १८० डिग्रीवर सुमारे १५ ते २० मिनिटे शिजवा. व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर हिरव्या चटणीसोबत खा. 

3. यात बेसन आणि पनीर असल्यामुळे प्रथिनांचे चांगले स्त्रोत आहे. प्रथिने फक्त शरीराच्या स्नायू मजबूत करत नाही तर वजनही नियंत्रणात ठेवतात. आरोग्य तज्ञांच्या मते, उच्च-प्रथिनयुक्त आहारामुळे अति खाणे कमी होऊ शकते आणि शरीरातील ऊर्जा वाढू शकते.

4. हे पकोडे आपण फक्त नाश्त्यात नाही तर दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणातही खाऊ शकतो. जर आपल्याला वजन कमी करायचे असेल पण चवीशी तडजोड करायची नसेल तर हाय - प्रोटिनयुक्त पकोडे हे सगळ्यात उत्तम पर्याय आहे. 
 


English
हिंदी सारांश
Web Title : Eat Bhaji, Lose Weight! Expert Advice: High-Protein Breakfast Recipe

Web Summary : Enjoy bhaji without weight gain! This high-protein, air-fried version, shared by a nutritionist, keeps you full longer. Made with besan and paneer, it's a healthy and tasty alternative for breakfast, lunch, or dinner.
टॅग्स :अन्नपाककृतीआरोग्यवेट लॉस टिप्स